ब्ल्युटूथ हे कमी अंतराच्या दोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील बिनतारी संदेशवहनाद्वारे माहितीचे आदान-प्रदान करणारे मानक तंत्रज्ञान आहे. ब्ल्युटूथ हे बिनतारी रेडिओ तंत्रज्ञानावर आधारित आहे. ब्ल्युटूथला आयईईई ८०२.१५.१(IEEE 802.15.1) मानक म्हणून देखील ओळखले जाते. ते कमी अंतरावरील स्थिर किंवा फिरत्या उपकरणांमधील रेडिओ लहरींच्या २४०० ते २४८० गिगाहर्ट्झ (GHz) मध्ये कार्य करते. मूळतः आर.एस.-३२(RS-32) तारेला पर्याय म्हणून ब्ल्युटूथची कल्पना करण्यात आली होती.

ब्ल्युटूथच्या खालील वैशिष्ट्यांमुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे :

  • ब्ल्युटूथद्वारे विविध प्रकारच्या यंत्रांशी जोडण्याकरिता आणि संवादाकरिता एकसमान संरचना तयार करता येते.
  • ब्ल्युटूथ तंत्रज्ञानाने जागतिक स्वीकृती प्राप्त केली आहे. त्यामुळे एखादे ब्ल्युटूथ सक्षम उपकरण जगातील कुठल्याही ठिकाणच्या दुसऱ्या ब्ल्युटूथ सक्षम उपकरणाशी जोडला जाऊ शकतो.
  • ब्ल्युटूथ तंत्रज्ञानात कमी ऊर्जेचा वापर होतो, सामान्यतः दहा मीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत ब्ल्युटूथ तंत्रज्ञानाची मर्यादा असते.
  • ब्ल्युटूथद्वारे लॅपटाॅपमध्ये तात्पुरते नेटवर्क तयार करून परस्परसंवादी विचारविनिमयाचे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकते.
  • तारा विरहीत संगणक, फोन, मोबाईल, इंटरकाॅम इ. उपकरणांमध्ये ब्ल्युटूथ तंत्रज्ञान सहज वापरतां येते.

ब्ल्युटूथ हे तंत्रज्ञान कार्यकक्षेवर अवलंबून आहे. श्रेणी ३ मध्ये १ मीटर किंवा ३ फूट पर्यंत संदेशवहन केल्या जाते, श्रेणी २ रेडिओची श्रेणी सामान्यत: मोबाईल यंत्रांमध्ये आढळते, जी १० मी. किंवा ३० फूट संदेशवहन करू शकते. श्रेणी १ रेडिओ मुख्यतः औद्योगिक क्षेत्रात वापरली जातात ज्याची कार्यकक्षा १०० मी. किंवा ३०० फूट इतकी विस्तृत आहे.

ब्ल्युटूथ आवृत्ती १.२ हि एकावेळी १ मेगाबाइट (एमबी; MB) प्रती सेकंद इतकी माहिती वाहून नेऊ शकतो आणि आवृत्ती २.० हि एकावेळी ३ एम.बि. प्रती सेकंद माहिती वाहून नेऊ शकतो.

पिकोनेट (Piconets) या उपकरणाद्वारे ब्ल्युटूथ सक्षम असणारे कमी अंतरारावरील उपकरण एकमेकांचा जोडले जाऊ शकतात. ब्ल्युटूथमुळे तात्पुरती संगणकीय नेटवर्किंग संरचना तयार करून उपकरणात मास्टर (Master) व स्लेव्ह (Slave) अशी संरचना तयार होते. एक मास्टर उपकरण आणि एक स्लेव्ह उपकरण अशी सर्वांत सोपी (पाॅइंट टु पाॅइंट; Point to point) संरचना आहे. दोनापेक्षा अधिक ब्ल्युटूथ उपकरण एकमेकांशी जोडले असतांना त्याला पिकोनेट (PICONET) असेही म्हणतात. पिकोनेटमध्ये एका मास्टर याच्या समूहाभोवताल सु. सात स्लेव्ह उपकरण असू शकतात. परंतु मास्टर उपकरण संप्रेषण करण्यासाठी नियंत्रण करतो.

कळीचे शब्द : #माहिती #नेटवर्क #संप्रेषण #मास्टर #स्लेव्ह #पिकोनेट #स्कॅटरनेट

संदर्भ :

समीक्षक : स्वप्नील दिनकरराव वाघमारे