शेखावत, विजयसिंह : (१ ऑक्टोबर १९३६). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. त्यांचा जन्म भिवानी (हरयाणा राज्य) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धरमपाल सिंह आणि पत्नीचे नाव बिनू. त्यांना दोन मुले आहेत. जुलै १९५६ मध्ये त्यांना भारतीय नौसेनेत कमिशन मिळाले. त्यांनी विविध भारतीय नौसेना जहाजांवर तसेच परदेशातही कामगिरी केली (१९५७-५८). डेप्युटी कमांडंट म्हणून त्यांनी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये काम केले (१९७९−८१). डायरेक्टर, नौसेना मुख्यालय, दिल्ली (१९८२−८४); एसीएनएस, नौसेना मुख्यालय, दिल्ली (१९८४); फ्लॅग ऑफिसर कमांडिंग (ध्वजाधिकारी), पश्चिम आरमार (१९८६-८७), महाराष्ट्र एरिया मुंबई (१९८७-८८); डीजीडीपीएस, संरक्षण मंत्र्यांचे, दिल्ली (१९८८−९०); एफओसी-इन-सी, ईस्टर्न नेव्हल कमांड (१९९०−९२); नौसेना उपप्रमुख (१९९२-सप्टेंबर १९९३); नौसेनाप्रमुख (१ ऑक्टोबर १९९३−३० सप्टेंबर १९९६) वगैरे पदांवर त्यांनी कार्य केले आहे. इंडिया इंटरनॅशनल सेंटर, युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हिमालयन क्लब यांचे ते सदस्य होते. पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वीरचक्र इ. पुरस्कार त्यांना मिळाले.