ॲबे, अर्न्स्ट कार्ल : ( २३ जानेवारी, १८४० ते १४ जानेवारी, १९०५ )

अर्न्स्ट कार्ल ॲबे यांचा जन्म ऐसेनाच येथे झाला. १८५७ मध्ये ॲबे यांनी ऐसेनाच जिम्नॅशिअमइथून पदवी प्राप्त केली. त्यानंतर गॉटिंगन येथून पीएच. डी. प्राप्त केली. १८६६ मध्ये ॲबे हे  झेईस ऑप्टिकल वर्क्सचे  (Zeiss Optical Works) संशोधन संचालक झाले आणि इ.स. १८६८ मध्ये त्यांनी आपोक्रोमाटीक लेन्सचा शोध लावला. यात तीन विविध तरंग लांबीच्या किरणांना एकाच बिंदूवर केंद्रित केले जाते. त्यामुळे प्रतिमेतील रंगदोष नाहीसे होऊन प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट दिसते.

ॲबेने १८७० मध्ये कंडेन्सरचा महत्त्वपूर्ण शोध लावला. तोच ॲबे कंडेन्सर म्हणून आजही प्रसिद्ध आहे. सूक्ष्मदर्शकाखाली प्रदीपनासाठी (Illumination) त्यांनी प्रथमच कंडेन्सर वापरला. दोन भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शकाखाली मिळणाऱ्या प्रतिमा प्रकाशित व्हाव्या यासाठी ॲबे यांनी शोधून काढलेला कंडेन्सर हा सूक्ष्मदर्शकाचा अत्यंत महत्त्वाचा भाग समजला जातो.

ॲबेने १८७१ मध्ये त्यांनी पहिला रिफ्रॅक्टोमीटर तयार केला. १८७२ मध्ये ॲबे यांनी अतेजस्वी वस्तूची प्रतिमा (Image Of Non-Luminous) कशी तयार होते याचे नियम विकसित केले आहे. १८७२ मध्ये झेईस ऑप्टिकल वर्क्स अतंर्गत सुधारित सूक्ष्मदर्शकाची विक्री केली जात होती. त्यानंतर त्यांनी १८७४ मध्ये ‘अ काँट्रीब्युशन टू दि थेअरी ऑफ दि मायक्रोस्कोपी अँड दि नेचर ऑफ मायक्रोस्कोपिक व्हिजन’ हा प्रबंध प्रकाशित केला. १८७८ मध्ये ॲबे यांनी पहिली  एकजिनसी सूक्ष्मदर्शक विसर्जन प्रणाली तयार केली. १८८६ मध्ये त्यांनी अपोक्रोमॅटिक सूक्ष्मदर्शक विकायला सुरुवात केली. त्यांच्या असे लक्षात आले की सूक्ष्मदर्शकाखाली मिळणारी प्रतिमा वर्धित केल्यास ती अंधुक होत जाते. प्रतिमेच्या वर्धनाबरोबरच त्याची स्पष्टता वाढवण्यासाठी १८७३ मध्ये ॲबे यांनी संशोधन करून सूक्ष्मदर्शकाखाली मिळणाऱ्या प्रतिमेच्या  स्पष्टतेची मर्यादा, ज्याला आपण रिझोल्यूशन म्हणतो, ते वाढवण्याचे सूत्र बनवले.

ते १८७८ मध्ये जेना येथे व खगोलशास्त्रीय आणि हवामान वेधशाळेचे संचालक झाले . १८९५मध्ये त्यांनी दूरदर्शीवर (टेलिस्कोप) काम केल. ॲबे कॅलक्युलेशन्स, आणि फेज कॉन्ट्रास्ट सूक्ष्मदर्शक यावर विशेष काम केल्याबद्दल ॲबे यांना १९५३ मध्ये  नोबेल पुरस्कार मिळाला.

त्यांचा मृत्यू जेना येथे झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे