अधिकारपृच्छा : अधिकारपृच्छा हा एक न्यायालयीन आदेश आहे. तो कायदेशीर आहे. याचा शब्दशः अर्थ आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात असा होतो. ही संकल्पना सार्वजनिक कार्यालयातील एखाद्याच्या अधिकाराला आव्हान देण्यासाठी वापरली जाते. राज्यघटनेने किंवा कायद्याने निर्माण केलेल्या एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीपाशी योग्य ती पात्रता आहे किंवा नाही याची शहानिशा करून संबंधित व्यक्ती पात्र नसल्यास ते पद तिच्याकडून काढून घेण्याचा आदेश न्यायालय देते. अपात्र व्यक्तीला पद मिळाल्याने ज्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल अशी व्यक्ती वा त्या व्यक्तीची हितसंबंधी व्यक्ती अधिकारपृच्छा आदेशासाठी अर्ज करू शकते. या आदेशाचा उपयोग दिवाणी म्हणून जास्त गणला जातो. तसेच दिवाणी म्हणून केला जातो. शासकीय पदाच्या संदर्भातच हा आदेश दिला जातो. हा आदेश मंत्री पदाविरुद्ध किंवा खाजगी पदाविरुद्ध देता येत नाही.

संदर्भ :

  • व्होरा, राजेंद्र; पळशीकर,सुहास (संपा), राज्यशास्त्र कोश, दास्ताने प्रकाशन, पुणे.