ॲग्नेसी, मारिया गाएटाना   (१६ मे १७१८ – ९ जानेवारी १७९९).

इटालियन महिला गणिती व तत्त्ववेत्ती. घनवक्रतेच्या कार्यासाठी प्रसिध्द. हा वक्र ‘ॲग्नेसीचे चेटूक’ (The Witch of Agnesi) म्हणून संबोधला जातो.

ॲग्नेसी हिचा जन्म मिलान येथे झाला. तिचे वडील बोलोन्या विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होत. त्यांनी मुलीला शिकविण्यासाठी उत्कृष्ट शिक्षक नेमले होते. नवव्या वर्षापर्यंत तिला ग्रीक, हिब्रू, फ्रेंच, स्पॅनिश, लॅटिन इत्यादी सात भाषा सहज बोलता येत होत्या. यामुळे तिला सात भाषांची स्वर्गवाणी म्हणत. वडीलही अनेकांना आमंत्रित करून मेळावे भरवीत असत आणि ॲग्नेसी हिला गुणवत्ता सादर करण्याची संधी देत. तिच्या भाषणात नैसर्गिक तत्त्वज्ञान व इतिहास या विषयांचे विचार असत. याच भाषणांवरून तयार झालेली Propositiones Philosophicae ही लेखमालिका ॲग्नेसी वीस वर्षांची असताना लॅटिनमध्ये प्रकाशित करण्यात आली (१७३८). फुरसतीच्या वेळात ती धर्मावरील पुस्तके वाचत असे व गणित शिकत असे. ज्या काळात स्त्रियांना उच्च माध्यमिक शिक्षण देण्यास विरोध होता त्या काळात वयाच्या नवव्या वर्षी शिक्षकांच्या मदतीने तिने स्त्री-शिक्षणाची बाजू ठामपणे उचलून धरणारा निबंध लॅटिनमध्ये लिहिला होता.

गणिताच्या अभ्यासाच्या संदर्भात ॲग्नेसी फार सुदैवी ठरली. गणिताचे मार्गदर्शन तिला रोम व बोलोन्या या दोन्ही विद्यापीठांत गणित शिकविणारे प्राध्यापक रमिरो राम्पिनली (Ramiro Rampinelli)यांच्याकडून लाभले. राम्पिनली यांच्या मदतीने तिने रेनीयु (Reyneau) यांच्या गणनशास्त्रावरील पुस्तकाचा अभ्यास केला. राम्पिनली यांच्या आग्रहाखातर तिने Instituzioni analitiche ad uso della gioventu italiana (इं.शी. Analytical Institutions for the use of Indian Youth) हे पाठ्यपुस्तक खास इटालियन तरुण विद्यार्थांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून लिहिले होते. या पुस्तकामध्ये तिने गणितीय विश्लेषण पद्धतींचे सांगोपांग विवेचन आणि गणनशास्त्राच्या आधारे अवकलन केले होते.

राम्पिनली यांनी ॲग्नेसी हिचा परिचय प्रसिद्ध गणिती जे. एफ.रिकेटी (Riccati) यांच्याशी १७४७ मध्ये करून दिला. अवकलन समीकरणाच्या शोधामुळे रकेटी विद्वान गणिती मानले जात होते. त्यामुळे पुढील पुस्तकाच्या छपाईपूर्वी ॲग्नेसीने त्याचे हस्तलिखित रिकेटी यांच्याकडून तपासून घेतले. १७४८ मध्ये Instituzioni analitiche ad uso della gioventu italiana या तिच्या दुसऱ्या पुस्तकाचा पहिला खंड प्रकाशित झाला. याच प्रकारे रिकेटी यांच्याकडून सूचना व मार्गदर्शन मिळवून पुढच्याच वर्षी तिने या पुस्तकाचा दुसरा खंडही प्रकाशित केला. या खंडांमुळेच