Read more about the article ट्रॅव्हर्टाइन (Travertine)
ट्रॅव्हर्टाइन खडकातून वाहणाऱ्या नदीने तयार केलेले लहान धबधबे

ट्रॅव्हर्टाइन (Travertine)

गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या (Hot springs) वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. हा खडक प्राचीन काळापासून सुशोभित इमारत बांधकामासाठी जगभर वापरला जातो. बांधकामाचा दगड या अर्थाच्या इटालियन…

ह्यूमाइट (Humite)

इटलीमधील व्हीस्यूव्हिअस (Vesuvius) ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांमध्ये मिळालेल्या या खनिजाचा उल्लेख सर्वप्रथम १८१३ मध्ये आलेला आढळतो. रत्नपारखी व रत्नसंग्राहक सर अब्राहम ह्यूम यांच्यावरून ह्यूमाइट हे नाव पडले असून हे…

स्माल्टाइट (Smaltite)

स्माल्टाइट हे कोबाल्ट जास्त व आर्सेनिक कमी असणारे खनिज आहे. स्माल्ट ही गडद निळ्या रंगाची काच असून तिच्या संदर्भातून स्माल्टाइट हे नाव आले आहे. याचे स्फटिक घनीय आहेत. मात्र हे…

स्कोलेसाइट (Scolecite)

स्कोलेसाइट हे झिओलाइट गटातील खनिज असून नॅट्रोलाइटशी याचे साम्य आहे. कृत्रिम रीतीने बनविलेल्या या निर्जलीकृत खनिजाला मेटास्कोलेसाइट हे नाव मुळात दिले होते. मात्र तापविले असता हे कृमीप्रमाणे कुरळे होते. यामुळे…

सोडा नायटर (Soda Niter)

सोडा नायटर हे सोडियमचे खनिज असून ते नायट्राटाइन (Nitratine), चिली सॉल्टपीटर (Chile saltpeter) व नायट्राटाइट (Nitratite) या नावाने ओळखले जाते. त्याच्या निक्षेपालाही चिली सॉल्टपीटर म्हणतात. सोडियम नायट्रेट (Sodium Nitrate) या…

Read more about the article स्टिल्बाइट (Stilbite)
फिकट गुलाबी रंगातील स्टिल्बाइटचे स्फटिक

स्टिल्बाइट (Stilbite)

झिओलाइट गटातील हे सिलिकेटी खनिज आहे. याला डेस्माइन (Desmine) असेही म्हणतात. याचे एकनताक्ष, प्रचिनाकार, वडीसारखे व पातळ स्फटिक जुडग्यांच्या रूपात आढळतात. याचे क्रूसाकार जुळे स्फटिकही आढळतात. पाटन (010) परिपूर्ण असून…

टुर्मलीन / तोरमल्ली (Tourmaline)

टुर्मलीन म्हणजेच तोरमल्ली हे नाव सिंहली (तमिळ) शब्दकोशानुसार ‘ थोरामल्ली ’ (तारा-मोली) या शब्दावरून आले आहे. टुर्मलीनचे स्फटिक सामान्यतः ३, ६ किंवा ९ बाजू असलेले; कधीकधी गोलाई आलेले किंवा लांब…

डेल्टा धातू (Delta Metal)

डेल्टा धातू हे उच्च तन्यता असलेले पितळ आहे. पितळाच्या संघटनात ३% लोखंड घालून हे पितळ तयार करतात. अशा प्रकारे याच्या एकूण संघटनात तांबे ६०%, जस्त ३७% आणि लोखंड ३% असते;…

खंडीय ढालक्षेत्र (Continental Shield)

भूकवचातील कमी उठाव असलेले मोठे आणि भूसांरचनिक दृष्ट्या स्थिर क्षेत्र म्हणजे खंडीय ढालक्षेत्र होय. ते कँब्रियनपूर्व काळातील स्फटिकी खडकांचे बनलेले आहे. या सर्व खडकांचे वय ५४ कोटी वर्षांहून अधिक असून…

कुंभगर्त (Pothole)

नदी, ओढा वा अन्य जलप्रवाहाच्या पायातील खडकाळ तळावर दगडगोट्यांची घर्षणक्रिया होऊन कुंभाच्या वा रांजणाच्या आकाराचा दंडगोलाकार वा गोलसर खळगा वा छिद्र निर्माण   होते, त्याला कुंभगर्त वा रांजण खळगा म्हणतात.…

कॅस्केड पर्वतश्रेणी (Cascade Mountain Range)

उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील पॅसिफिक पर्वतप्रणालीच्या एका भागाला कॅस्केड पर्वतश्रेणी म्हणतात. कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तर भागातील लासेन शिखरापासून ही पर्वतश्रेणी उत्तरेकडे १,१०० किमी. पेक्षा अधिक अंतरापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेली आहे. ही पर्वतश्रेणी…

ग्रँड कॅन्यन (Grand Canyon)

जगातील सर्वांत मोठी व प्रेक्षणीय कॅन्यन (घळई वा निदरी). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील ॲरिझोना राज्याच्या वायव्य भागात असलेल्या ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क या राष्ट्रीय उद्यानात (स्था. १९१९) जवळजवळ संपूर्ण ग्रँड कॅन्यनचा…

इट्रियम (Yttrium)

इट्रियम हे गट ३ मधील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Y अशी आहे. याचा अणुक्रमांक ३९ असून अणुभार ८८·९०५ इतका आहे. इतिहास : जे. गॅडोलिन यांनी १७९४ मध्ये…

वर्ख (Foil)

धातूच्या पापुद्र्यासारख्या अतिशय पातळ पटलाला वर्ख म्हणतात. वर्ख सामान्यपणे ०·००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो. वर्ख एका धातूचा, मिश्रधातूचा अथवा अनेक धातूंची पटले एकावर एक रचून बनविलेला अनेक पदरीही असतो.…

उत्तर ध्रुववृत्त (Arctic Circle)

आर्क्टिक वृत्त. पृथ्वीगोलावरील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील  ६६° ३०' उ. अक्षांशावरील काल्पनिक अक्षवृत्ताला आर्क्टिक वृत्त किंवा उत्तर ध्रुववृत्त म्हणून संबोधले जाते. पृथ्वीच्या नकाशावर सामान्यपणे विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, उत्तर ध्रुववृत्त आणि दक्षिण ध्रुववृत्त…