खारकच्छ (Lagoon)

खाजण. समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या, उथळ आणि शांत पाण्याची पट्टी किंवा क्षेत्र म्हणजे खारकच्छ होय. वाळू, खडे, चिखल यांनी बनलेला जमिनीच्या…

अयनदिन (Solstice)

अयनदिन हे वर्षातील दोन दिवस (प्रत्यक्षातील दोन क्षण) असून या दिवशी सूर्य त्याच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या स्थानी असतो. वर्षातील २१ जून व २२ डिसेंबर या दोन दिवशी अशी स्थिती…

द्विनाम नामकरण-पद्धती ( Bionomial nomenclature system)

सर्व सजीवांची शास्त्रीय नावे दर्शविण्यासाठी दोन नावांच्या जोडीचा वापर करतात. या पद्धतीला द्विनाम नामकरण पद्धती म्हणतात. सजीवांची नावे सर्वसाधारणपणे लॅटिन भाषेतून घेतली आहेत. छापताना ती तिरक्या अक्षरात (इटालिक फाँटमध्ये) छापतात.…

एल निनो (El Nino)

दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्‍यावरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला महासागरविज्ञान आणि हवामानशास्त्रात एल निनो म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे वातावरण आणि पॅसिफिक महासागराच्या…

कथिलाच्छादित पत्रे (Tin Plating)

सामान्यपणे कथिलाचा मुलामा दिलेल्या पोलादी पत्र्याला किंवा पट्टीला कथिलाच्छादित पत्रा म्हणतात. कथिल विषारी नसते, त्याचा पातळ मुलामा देता येतो आणि ते पोलादाशी एकजीव होऊ शकते.म्हणून पोलादावर कथिलाचा गंजरोधक मुलामा देतात.मुलाम्यासाठी…

निकेल सिल्व्हर (Nickel Silver)

चांदीसारखा दिसणारा निकेल, तांबे  व जस्त यांचा मिश्रधातू. तांबे  व  निकेल  यांची धातुके  - कच्च्या स्वरूपातील धातू - वितळवून चिनी लोक पाकटाँग  हा  मिश्रधातू तयार करीत असत. मानवाने प्रथम वापरलेल्या…

अमीबाजन्य विकार (Amoebiasis)

अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे. अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा रोग होतो. हा रोग जगातील सर्व देशांत आढळतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका व आग्नेय…

अँपिअरमापक (Ammeter)

(उपकरण). प्रत्यक्ष अँपिअर या एककात विद्युत् प्रवाह मोजणारा विद्युत् प्रवाहमापक म्हणजेच अँपिअरमापक होय. निरनिराळ्या मर्यादांच्या विद्युत् प्रवाहांकरिता व कमी-जास्त अचूकतेसाठी खालील वेगवेगळ्या प्रकारचे अँपिअरमापक वापरले जातात. (१) फिरत्या वेटोळ्याचा अँपिअरमापक…

गोलत्वमापक (Spherometer)

[latexpage] (उपकरण). अंतर्गोल अथवा बहिर्गोल भिंगे (Concave and Convex lenses) किंवा आरसे हे एका मोठ्या गोलाचा भाग असतात. या किंवा अशाच आकाराच्या अन्य वस्तू यांच्या गोलाकाराची त्रिज्या मोजण्यासाठी हे उपकरण…

कल्हई (Tinning)

सामान्यपणे पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप देतात,अशा लेपाला कल्हई म्हणतात. शुद्ध कथिल विषारी नसते व त्याच्यावर हवेचा किंवा आंबट पदार्थांचा परिणाम होत नाही. त्यामुळे कल्हई केलेले पृष्ठ…

अगाधीय क्षेत्रविभाग (Abyssal Zone)

खंडान्त उताराच्या मर्यादेपलीकडचा जास्त खोली असलेला महासागरातील हा जैव भौगोलिक प्रदेश असून महासागराचा हा सर्वांत खोल भाग आहे. याची खोली सु. २,००० ते सु. ६,००० मी. असते. खंदकाच्या बाबतीत प्रकाश…

अवशिष्ट शैल (Monadnock)

झीजरोधक खडकाची झीज न होता अवशेषाच्या रूपात मागे राहिलेली एकटी वा सुटी टेकडी किंवा विस्तीर्ण सपाट स्थलीप्राय प्रदेशातील एकटा आणि सभोवतालच्या क्षेत्राच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा अधिक उंच असा एकटा व एकदम…

अगाधीय सागरी मैदान (Abyssal Plain)

महासागराच्या अनेक द्रोणी (Basin) यांमधील सर्वांत खोल भागातील सपाट व जवळजवळ समतल क्षेत्राला अगाधीय सागरी मैदान म्हणतात. ही मैदाने सामान्यपणे ३,००० ते ६,००० मी. खोलीच्या समुद्रतळावर आढळतात. असे मैदान सामान्यपणे…

अंध दरी (Blind Valley)

दोन्ही काठ उभ्या भिंतीप्रमाणे असलेली व भूमिगत जलप्रवाहांमुळे बनलेली दरी. जलप्रवाहाच्या शेवटी ही दरी तीव्र उताराच्या उभ्या भिंतींनी झाकली जाते व त्यांच्या तळाशी जलप्रवाह दिसेनासा होतो. त्यामुळे तिला अंध किंवा…

अगाधीय टेकडी (Abyssal Hill)

सुस्पष्ट अशी समुद्रांतर्गत असलेली लहान टेकडी. ती अगाधीय (अतिशय खोल) समुद्रतळावर (सु. ३,००० ते ६,००० मी. खोल) काही मीटर ते शेकडो मीटर उंचीची असते. काही टेकड्यांचा व्यास शेकडो मीटरपर्यंतही असतो.…