वेल्टनशाउंग (Weltanschauung)

जर्मन भाषेतील ‘वेल्टनशाउंग’ ही संज्ञा इंग्रजीतील 'वर्ल्ड-व्ह्यू' या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. तिचे भाषांतर ‘जगत्-दर्शन’ असे करता येते. ‘वेल्ट' म्हणजे जग व ‘आशाउंग’ म्हणजे दृष्टिकोण, भूमिका. म्हणून ‘वेल्टनशाउंग' म्हणजे जगाकडे…

तत्त्वज्ञानोद्यान (Philosophical Park)

‘फिलॉसफिकल कॅफे’च्या मानाने 'फिलॉसफिकल पार्क’ ही संकल्पना नवी आहे. इ.स. २००० साली इटलीतील काप्री बेटावर स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ गुन्नर ॲडलर कार्लसन याने माउंट सोलॅरोवरील ॲनाकाप्री ह्या गावी जगातील पहिले तत्त्वज्ञानोद्यान उभारले.…

ओखमचा वस्तरा (Occam’s Razor)

तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ विल्यम ऑफ ओखम (१२८५‒१३४७) हा तत्त्वज्ञानात प्रसिद्धी पावला, तो त्याच्या नावाने रूढ झालेल्या या वस्तराच्या संकल्पनेमुळे. गृहितांची संख्या निष्कारण वाढू देऊ नये, असे…

मानववाद व मानवतावाद (Humanism and Humanitarianism)

संघर्ष हा जीत-जेत्यांमध्ये असतो, स्त्री-पुरुषात, मालक-कामगारात, माणूस-निसर्गात, धर्माधर्मांत, राष्ट्राराष्ट्रांत असतो. मार्क्सवाद विरुद्ध भांडवलशाही, स्त्रीवाद विरुद्ध पितृसत्ताक पद्धती, पर्यावरणवाद विरुद्ध आधुनिकवाद, मानववाद विरुद्ध निसर्गवाद या प्रकारच्या विचारसरणींमध्ये असणारा विरोध उघड आहे.…

तत्त्वज्ञान, धर्माचे (Philosophy of Religion)

कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा विचार न करता समग्र धर्मसंस्थेचा विचार चिकित्सकपणे करणाऱ्या शास्त्राला धर्माचे तत्त्वज्ञान म्हटले जाते. जीव-जगत्-ईश्वर (जगदीश) यांचा परस्परांशी असणारा संबंध प्रत्येक धर्म स्पष्ट करतो. तो स्पष्ट करत…

झां-पॉल सार्त्र (Jean-Paul Sartre)

सार्त्र, झां-पॉल : (२१ जून १९०५—१५ एप्रिल १९८०). फ्रेंच साहित्यिक आणि अस्तित्ववाद ह्या आधुनिक तत्त्वज्ञानातील एका प्रमुख व प्रभावी विचारसरणीचा तत्त्ववेत्ता. जन्म पॅरिसचा. त्याचे वडील तो अगदी लहान असतानाच वारले.…

विनोबा भावे (Vinoba Bhave)

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला.…

रामचंद्र दत्तात्रेय रानडे (Ramchandra Dattatraya Ranade)

रानडे, रामचंद्र  दत्तात्रेय : (३ जुलै १८८६—६ जून १९५७). भारतीय तत्त्वज्ञ व संत. काही तत्त्वज्ञांचा दृष्टीकोन विश्वकेंद्रित असतो, तर काहींचा मानवकेंद्रित असतो. गुरूदेव रानडे यांचा ईश्वरकेंद्रित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानात जगाचा…

के. सी. भट्टाचार्य (K. C. Bhattacharya)

भट्टाचार्य, के. सी. : (१२ मे १८७५ ‒ ११ डिसेंबर १९४९). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथील सेरामपूर या गावी झाला. त्यांचे आजोबा उमाकांत तर्कालंकार…

गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar)

आगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले. हालअपेष्टांना…

अनुभववाद, भारतीय (Indian Empiricism)

केवळ अनुभवालाच प्रमाण मानणारा वाद. भारतीय संदर्भात अनुभववादाचा विचार केला, तर न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, अद्वैत, मीमांसादी दर्शनांनी अनुभवाला प्रमाण मानले आहे. मात्र केवळ अनुभवच प्रमाण असतो, ही भूमिका एकट्या चार्वाकांनी घेतली.…