अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)

घर, कारखाना, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादी वास्तूंमधील प्रदूषणास अंतर्गेही प्रदूषण म्हणतात. धूर, धूळ, मातीचे सूक्ष्मकण, सूक्ष्मजीव, बुरशी, पाळीव प्राण्यांचे केस, पिसवा, केरकचरा, सांडपाणी इ. प्रमुख प्रदूषके वास्तूत असतात. घरात स्वयंपाकासाठी पारंपारिक…

जलसंसाधने (Water resources)

पृथ्वीवरील जल हे एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाचे संसाधन असून त्याने पृथ्वीचा ७१% भाग व्यापलेला आहे. जलसंसाधन हे जीवोत्पत्तीच्या आधीपासून अस्तित्वात असून ते व्यय होऊन पुन:पुन्हा निर्माण होणारे अक्षय्य संसाधन…

जल प्रदूषण (Water pollution)

ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल…

जल परिसंस्था (Aquatic ecosystem)

जल परिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेत सागरी पर्यावरण तसेच सरोवरे, नद्या, तलाव,…

Read more about the article अंटार्क्टिका (Antarctica)
पेंग्विन :अंटार्क्टिकाचे वैशिष्टय.

अंटार्क्टिका (Antarctica)

हे पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते. या खंडाचे क्षेत्रफळ १,४२,००,००० चौ. किमी. आहे. याचा ९८% भाग हिमाच्छादित असून हिमस्तराची…

भूमिपात (Landslide)

एक पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती. भूमिपातामध्ये माती, डबर व खडक यांची राशी गुरुत्वामुळे तीव्र उतारावरून खाली पडण्याची, घसरण्याची अथवा वाहत जाण्याची क्रिया घडून येते. भूपृष्ठाच्या विस्तृत क्षरणाचा हा एक प्रकार असून…

भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical information system; GIS)

कोणत्याही भौगोलिक माहितीचे संग्रहण, संकलन, संघटन आणि विश्‍लेषण करणाऱ्या संगणकीय प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतात. पृथ्वीवरील कोणत्याही स्थळाची भौगोलिक माहिती मिळविणे, साठविणे, तिची मांडणी करणे आणि तिचे सादरीकरण करणे ही…

भूकंप (Earthquake)

एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात. भूकंपाचा धक्का कधीकधी एवढा जोरदार असतो की, त्यामुळे मोठमोठ्या इमारती…

पृथ्वी शिखर परिषद (Earth summit conference)

पर्यावरण आणि विकास यांवरील संयुक्त राष्ट्रांची परिषद. ही परिषद रीओ शिखर परिषद, रीओ परिषद आणि पृथ्वी परिषद अशा नावांनी ओळखली जाते. संयुक्त राष्ट्रांचा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये…

प्रदूषण, पर्यावरणीय (Pollution, Environmental)

सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने पर्यावरण दूषित बनते. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास अशी पर्यावरण…

पारिस्थितिकी (Ecology)

पारिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. सजीवांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, त्यांचा एकमेकांवर कसा परिणाम…