ताड (Palmyra palm)

नीरा या पेयासाठी आणि ताडगोळा या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुलातील…

तमाल (Indian cassia)

लॉरेसी कुलातील एक सदापर्णी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम तमाला आहे. भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्र (तेजपात) म्हणून या वनस्पतीची पाने वापरली जातात. हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात सस. पासून ९००–२४००…

तंबाखू (Tobacco)

सोलॅनेसी कुलातील निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतींना सामान्यपणे तंबाखू म्हणतात. धोतरा ही वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहे. प्राचीन काळापासून मनुष्याने तंबाखूच्या पानांचा वापर चघळण्यासाठी, तपकिरीसाठी व धूम्रपानासाठी केलेला आहे. या पानांनादेखील ‘तंबाखू’ म्हणतात.…

टेंबुर्णी (Indian persimmon)

टेंबुर्णी हा सदाहरित वृक्ष एबेनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पिरॉस एंब्रियॉप्टेरिस आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील आहे, असे मानतात. डा. पेरेग्रिना या शास्त्रीय नावानेही तो…

ज्येष्ठमध (Liquorice)

ज्येष्ठमध ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ग्लिसिऱ्हायझा ग्लॅब्रा आहे. ती मूळची यूरोप आणि आशियाच्या भागातील असून चीन, रशिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन व हंगेरीत रानटी अवस्थेत सापडते.…

जैविक युद्धतंत्र (Biological warfare)

युद्धनीतीचा भाग म्हणून शत्रुराष्ट्रातील लोक, प्राणी आणि पिके इत्यादींना अपायकारक ठरतील अशा सूक्ष्मजीवांचा किंवा जीवविषांचा केलेला वापर म्हणजे जैविक युद्धतंत्र होय. यासाठी जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा जीवविष अशा कारकांचा वापर…

जैव संचयन (Bio-accumulation)

अन्न आणि पर्यावरणातील विषारी घटक सजीवांच्या शरीरात साचत जाण्याच्या क्रियेला जैव संचयन म्हणतात. या विषारी घटकांमध्ये मुख्यत: कीटकनाशके, काही धातू (पारा, शिसे इत्यादी) आणि अन्न काही कार्बनी पदार्थांचा समावेश होतो.…

जैवतंत्रज्ञान (Biotechnology)

सूक्ष्मजीवांचा किंवा पेशीघटकांचा मनुष्याच्या आणि इतर सजीवांच्या वापरासाठी करण्याकरिता नवीन पदार्थ किंवा प्रक्रिया शोधण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान म्हणतात. इ.स.पू. ४००० वर्षांपूर्वीपासून द्राक्षापासून मदय तयार करणे, दुधापासून दही व चीज तयार करणे…

निलगिरी (Eucalyptus)

मिर्टेसी कुलातील ही उंच व बहुपर्णी वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव यूकॅलिप्टस ग्लोब्युलस आहे. ब्लू गम किंवा गम ट्री या इंग्रजी नावांनी ही ओळखली जाते. या वनस्पतीचे मूलस्थान ऑस्ट्रेलिया असून…

पपनस (Pomelo)

पपनस ही लिंबाच्या प्रजातीतील एक वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा आहे. पपनसाचे फळ आकाराने नासपतीसारखे असून सिट्रस प्रजातीत सर्वांत मोठे आहे. ही वनस्पती मूळची मलेशिया…

परजीवी (Parasite)

सजीवांच्या आहाराच्या प्रकारानुसार ‘स्वोपजीवी आणि परजीवी’ असे दोन प्रकार आढळतात. बहुसंख्य वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने निसर्गातील मूलद्रव्ये आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून स्वत: अन्न बनवितात. अन्नाची स्वयंनिर्मिती आणि स्वयंवापर यांमुळे वनस्पती…

उंडी (Alexandrian laurel)

एक शोभिवंत व सदापर्णी वृक्ष. ही वनस्पती क्लुसिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅलोफायलम इनोफायलम आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील पूर्व व पश्चिम समुद्रकिनार्‍यांच्या प्रदेशांतील असून म्यानमार, श्रीलंका, अंदमान बेटे, वेस्ट इंडिज…

औषधे (Drugs)

मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा…

किंजळ (Terminalia paniculata)

घोड्याच्या कानाच्या आकारासारखा पानांचा आकार असलेल्या या पानझडी वृक्षाचे कुल क्राँब्रेटेसी आहे. टर्मिनॅलिया पॅनिक्युलॅटा असे शास्त्रीय नाव असलेला हा वृक्ष हिरडा, अर्जुन आणि ऐन यांच्या प्रजातीतील आहे. संस्कृतमध्ये याला अश्वकर्णी म्हणतात. तो…

कोरांटी (Porcupine flower)

मध्यम उंचीचे बहुवार्षिक फुलझाड. ही वनस्पती अ‍ॅकँथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बार्लेरिया प्रिओनिटीस आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांतील उष्ण भागात या वनस्पतीला वज्रदंती असेही म्हणतात. भारतात कोकण, दख्खन पठार…