एकसत्तावाद (Monism)

विश्वात किती वस्तू आहेत किंवा किती प्रकारच्या वस्तू आहेत, ह्या प्रश्नांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांवरून एकसत्तावाद आणि त्याला विरोधी असलेले द्वयवाद आणि बहुसत्तावाद असे भिन्न सिद्धांत तत्त्वमीमांसेत रूढ झाले आहेत. उदा.,…

अनंत (Infinity)

गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे विविचेन येथे प्रथम करण्यात आलेले आहे. त्यानंतर धर्मशास्त्र आणि तत्त्वमीमांसा…

जे. एल. ऑस्टिन (J. L. Austin)

ऑस्टिन, जॉन लँगशॉ : (२६ मार्च १९११‒८ फेब्रुवारी १९६०). इंग्रज तत्त्ववेत्ते. जन्म लँकेस्टर येथे. शिक्षण बेलियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १९५२ पासून अखेरपर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. दुसऱ्या महायुद्धात ‘ब्रिटिश इंटेलिजन्स…

अवकाश (Space)

अवकाश ही एक मूलभूत संकल्पना आहे. भौतिक विश्वासंबंधीच्या मूलभूत संकल्पना सुस्पष्ट, नेमक्या करीत जाणे, त्यांचे परस्परांशी असलेले तार्किक संबंध रेखाटणे, हे कार्य तत्त्वज्ञानातही मोडते आणि विज्ञानातही मोडते. अवकाशाच्या स्वरूपासंबंधी भारतीय…

अनुभववाद (Empiricism)

ज्ञानमीमांसेतील एक महत्त्वाची व प्रभावी विचारप्रणाली. इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम आहे आणि मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते, म्हणजे विधानात जे सांगितलेले असते, त्याची अनुभवद्वारा प्रतीती घेऊनच ते…

अंतःप्रज्ञावाद (Intuitionism)

ज्ञानमीमांसेतील एक उपपत्ती. एका विवक्षित प्रकारच्या विधानांच्या सत्याचे ज्ञान आपल्याला कसे होते, ह्याचा उलगडा करण्यासाठी ही उपपत्ती मांडण्यात आली आहे. विधानांतील एक मूलभूत प्रकारभेद म्हणजे विश्लेषक विधाने व संश्लेषक विधाने…

प्लेटो (Plato)

प्लेटो : (इ.स.पू.सु. ४२८‒ इ.स.पू.सु. ३४८). प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता. प्लेटोचा जन्म अथेन्स किंवा ईजायना ह्या नगरात झाला. प्लेटोचे घराणे हे अथेन्समधील एक प्रतिष्ठित व खानदानी घराणे होते. प्लेटोचा पिता ॲरिस्टॉन हा…

ईश्वरवाद (Theism)

ईश्वराची सर्वसंमत अशी व्याख्या करणे कठीण आहे. ईश्वर विश्वाचा निर्माता व नियंता आहे, तो परिपूर्ण आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्व सद्‌गुण किंवा कल्याणगुण त्याच्या ठिकाणी परिपूर्णतेने वास करतात व म्हणून…

मार्टिन बूबर (Martin Buber)

बूबर, मार्टिन : (८ फेब्रुवारी १८७८ – १३ जून १९६५). या प्रसिद्ध अस्तित्ववादी धार्मिक तत्त्ववेत्यांनी ‘मी-तू’ व ‘मी-ते’ संबंधांची मांडणी केली. त्यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झाला. १८९६ ते १९००…