पेशी (Cell)

सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक. सर्व सजीव पेशींचे बनलेले असून प्रत्येक पेशी स्वयंपूर्ण असते. सर्व पेशींमध्ये पेशीद्रव्य असून ते पेशीपटलाने वेढलेले असते आणि पेशीद्रव्यात प्रथिने, न्यूक्लिइक आम्ले यांसारखे…

गजकर्ण (Ringworm)

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग. ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा…

मृदुकाय संघ (Mollusca)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात एक लाखापेक्षा अधिक जातींचा समावेश होतो. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी व अखंडित असून त्यांच्या शरीरात उदरगुहा अथवा देहगुहा असते. हे प्राणी खाऱ्‍या किंवा गोड्या…

मरळ (Snake headed fish)

गोड्या पाण्यातील एक मासा. मरळ माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या चॅनिफॉर्मिस गणाच्या चॅनिडी कुलात करतात. भारतात मरळीच्या पाच जाती असून त्या सर्व नद्यांमध्ये व जलाशयांत आढळतात. मरळीच्या जातींना फुलमरळ, पट्टमरळ, घडक्या,…

महसीर (Mahseer)

गोड्या पाण्यातील एक रुचकर खाद्य मासा. महसीर या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात करण्यात येतो. त्याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर आहे. मोठे डोके असणारा मासा अशा अर्थाने…

मांदेली (Golden anchovy)

खाऱ्या पाण्यातील एक खाद्य मासा. मांदेलीचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिइडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिरी आहे. उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात मांदेली मासे आढळतात. भारतात मुंबई व…

भेक (Toad)

बेडकासारखा दिसणारा एक प्राणी. उभयचर वर्गाच्या ॲन्यूरा गणातील ब्यूफोनिडी कुलात भेकाचा समावेश होतो. ऑस्ट्रेलिया वगळता जगात सर्वत्र भेक आढळतात. यूरोपमध्ये आढळणाऱ्या भेकाचे शास्रीय नाव ब्यूफो ब्यूफो आहे. भारतासह दक्षिण आशियाई…

भोरडा (Rosy starling)

पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस गणाच्या स्टर्निडी कुलातील एक पक्षी. भोरडा या पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्टर्नस रोझियस आहे. त्याला भोरडी सारिका, गुलाबी सारिका अथवा गुलाबी साळुंकी असेही म्हणतात. भोरडा पक्षी पूर्व यूरोप आणि…

भुंगा (Carpenter bee)

कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा (कलापंखी) गणाच्या झायलोकोपिडी (काष्ठनिवासी) कुलात भुंग्यांचा समावेश होतो. त्यांना भ्रमर व सुतारी भुंगा असेही म्हणतात. ते जगात सर्वत्र आढळत असून त्यांच्या सु. ५०० जाती आहेत. भारतात त्यांच्या…

भुंगेरा (Beetle)

कीटक वर्गाच्या कोलिऑप्टेरा गणात (ढालपंखी गणात) भुंगेऱ्यांचा समावेश करण्यात येतो. त्यांना मुद्गल असेही म्हणतात. प्राणिसृष्टीमध्ये कीटक वर्ग हा संख्येने सर्वांत मोठा असून त्यात सु. १२  लाख जातींची नोंद आहे. यात…

मेद (Lipids)

शरीराला ऊर्जा पुरविणाऱ्या पोषकद्रव्यांच्या कर्बोदके, मेद आणि प्रथिने या तीन मुख्य गटांपैकी एक गट. सर्व सजीवांच्या पेशींमध्ये निरनिराळे मेद पदार्थ असतात. निरनिराळ्या पेशींमध्ये त्यांचे प्रमाण कमीजास्त असून शरीराच्या विविध कार्यांसाठी…

मत्स्य अधिवर्ग (Superclass Pisces)

रज्जुमान संघातील जलचर प्राण्यांचा अधिवर्ग. मत्स्य अधिवर्गात माशांचा समावेश होत असून त्यांना सामान्यपणे मत्स्य, मीन किंवा मासा म्हणतात. मासे अनियततापी म्हणजे थंड रक्ताचे असून ते कल्ल्यांनी श्‍वसन करतात. पोहण्यासाठी आणि…

मानवाची उत्क्रांती (Evolution of Man)

स्तनी वर्गातील नरवानर गणात आधुनिक मानवाचा समावेश होतो. नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला…

मोनेरा सृष्टी (Monera kingdom)

सजीवांच्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत आदिकेंद्रकी व एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. या सजीवांना जीवाणू (बॅक्टेरिया) म्हणतात. १८६६मध्ये एर्न्स्ट हाइन्रिख हेकेल या वैज्ञानिकाने मोनेरा ही संज्ञा वापरली. जीवाणू हे सूक्ष्मदर्शी…

मधमाशी (Honey bee)

एक सर्वपरिचित कीटक. मधमाशीचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणाच्या एपिडी कुलात केला जातो. जगात मधमाशीच्या चार जाती आढळून येतात. एपिस  ही मधमाशीची मुख्य प्रजाती आहे. या प्रजातीतील सर्व…