ऐतिहासिक पुरातत्त्व (Historical Archaeology)
चौल (महाराष्ट्र) येथील उत्खनन.

ऐतिहासिक पुरातत्त्व (Historical Archaeology)

कालखंडावर आधारलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची शाखा. ज्या काळाबद्दल लिखित स्वरूपातील माहिती उपलब्ध आहे अशा म्हणजे ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींचा पुरातत्त्वीय पद्धतीने अभ्यास या शाखेत केला जातो. एकोणिसाव्या शतकापासूनच इतिहासात ज्ञात…

प्रायोगिक पुरातत्त्व (Experimental Archaeology)

पुरातत्त्वामधील विविध सिद्धांतकल्पना पडताळून पाहणे व निष्कर्ष काढणे यासाठी प्रत्यक्ष प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाला प्रायोगिक पुरातत्त्व असे म्हणतात. प्रयोग म्हणजे नियंत्रित निरीक्षणे, ही प्रयोगाची साधीसोपी व्याख्या आहे. पुरातत्त्वामधील…

गुडरुन कॉर्व्हिनस (Gudrun Corvinus)

कॉर्व्हिनस, गुडरुन : (१४ डिसेंबर १९३१ — १ जानेवारी २००६). जर्मन प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पोलंडमध्ये श्टेट्सीन (श्टेटीन) येथे झाला. जर्मनीतील बॉन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी ट्युबिंगन विद्यापीठात…

आधुनिक काळाचे पुरातत्त्व (Archaeology of Modern Period)

आधुनिक काळाचे पुरातत्त्व या शाखेची संशोधन पद्धत सर्वसाधारणपणे ऐतिहासिक व मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वासारखी आहे. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक काळातील लोकजीवन आणि संस्कृती यांचा भौतिक अवशेषांच्या आधारे मागोवा घेणे हे…

रामचंद्र जोशी (R. V. Joshi)

जोशी, रामचंद्र : (? १९२० — ६ ऑक्टोबर १९९७). विख्यात भारतीय आद्य पुरातत्त्वीय भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म कर्जत येथे झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत बी. एस्सी. पदवी घेतल्यानंतर (१९४२) त्यांनी मुंबई…

नागरी पुरातत्त्व (Urban Archaeology)

पुरातत्त्वविद्येच्या नागरी पुरातत्त्व या शाखेत शहरांचा पुरातत्वीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास केला जातो. या शाखेचा मुख्य भर नगरांचा आणि नागरीकरणाचा पुरातत्त्वीय पुराव्यांमधून मागोवा घेणे यावर आहे. शहरांचा उगम व विकास, नागरीकरणाची…

समकालीन पुरातत्त्व (Contemporary Archaeology)
सेमीपलाटिंस्क (कझाकस्तान) येथील अणुचाचण्यांची जागा.  

समकालीन पुरातत्त्व (Contemporary Archaeology)

पुरातत्त्वविद्येची एक शाखा. ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींकडे किंवा आधुनिक जगाच्या इतिहासाकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून पाहता येते, तर अगदी नजीकच्या काळातील घटना आणि घडामोडींकडेही तसेच बघता येईल या कल्पनेतून समकालीन पुरातत्त्व ही…

मार्क्सवादी पुरातत्त्व (Marxist Archaeology)

प्राचीन काळातील समाज व जीवन यांच्याकडे मार्क्सवादाची तत्त्वे वापरून पाहण्याचा एक दृष्टीकोन. पुरातत्त्वाची ही वेगळी शाखा नसून पुरातत्त्वीय पुराव्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठीची एक विशिष्ट सैद्धांतिक मांडणी आहे. मार्क्सवाद म्हणजे साम्यवादी विश्वक्रांतीचे…

उत्क्रांतिवादी पुरातत्त्व (Evolutionary Archaeology)

पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती. चार्ल्स डार्विन (१८०९—१८८२) या निसर्गशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने जीवविज्ञानाखेरीज सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर मोठा प्रभाव टाकला. पुरातत्त्वविद्याही त्याला अपवाद नाही. मानवी संस्कृतीच्या अभ्यासात उत्क्रांतीच्या…

पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान (Archaeoparasitology)
आइया इरिनी येथील ट्रायचुरिस ट्रायचुरा सूत्रकृमीचे रोमन कालखंडातील दफनामधून मिळालेले अंडे.

पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान (Archaeoparasitology)

पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये मिळणाऱ्या परोपजीवींचा अभ्यास करण्याची पद्धती. मानव आणि मानवेतर प्राण्यांत अनेक प्रकारचे परोपजीवी आढळतात. इतर सजीवांचा वापर करून जे सजीव आपले अन्न मिळवतात त्यांना परोपजीवी (parasite) असे म्हणतात. त्यांचा…

वर्तनात्मक पुरातत्त्व (Behavioural Archaeology)

प्रक्रियावादी पुरातत्त्वविद्येतील एक भाग. प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या कालखंडात (१९५०—१९९०) इंग्लिश पुरातत्त्वज्ञ डेव्हिड क्लार्क (१९३७—१९७६) यांनी ॲनालिटिकल आर्किऑलॅाजी (१९६८) या ग्रंथात पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्यासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित व्हायला हवी, असे सुचवले…

व्ही. गॉर्डन चाइल्ड (V. Gordon Childe)

चाइल्ड, व्हेरे गॉर्डन : (१४ एप्रिल १८९२ — १९ ऑक्टोबर १९५७). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लिश वंशाचे रेव्हरंड स्टीफन एच. चाइल्ड आणि हॅरिएट एलिझा या दांपत्यापोटी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स,…

बी. सुब्बाराव (B. Subbarao)

सुब्बाराव, बेंडापुडी : (१९२१ — २९ मे १९६२).  प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वॅाल्टेअर (विशाखापट्टनम) येथे झाला. सुब्बाराव यांचे महाविद्यालयीन शिक्षण आंध्र विद्यापीठात झाले.  बी. ए.  पदवीसाठी त्यांना…

वर्गलढ्याचे पुरातत्त्व (Class Struggle Archaeology)
लुडलो येथील बायका-मुले ठार झालेला ’मृत्यूचा खड्डा’, कोलोरॅडो, अमेरिका.  

वर्गलढ्याचे पुरातत्त्व (Class Struggle Archaeology)

विविध आर्थिक व सामाजिक कारणांसाठी कामगार व इतर आर्थिक दृष्टीने दुर्बल शोषित वर्गांमध्ये झालेल्या झगड्यांचा पुरातत्त्वीय साधने वापरून केलेला अभ्यास म्हणजे वर्गलढ्याचे पुरातत्त्व. याचा संबंध कामगारांशी असल्याने तो औद्योगिक पुरातत्त्वीय…

गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व (Archaeology of Gulag Camps)
झेक प्रजासत्ताकातील इद्याखा नदीजवळील गुलाग श्रमछावणी.

गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व (Archaeology of Gulag Camps)

सोव्हिएत महासंघात असलेल्या कैदी छावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाला गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व असे म्हटले जाते. हे बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचे विशेष क्षेत्र आहे. साहजिकच या क्षेत्रातील संशोधनाची पद्धत बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वासारखीच आहे. रशियातील साम्यवादी…