परागण (Pollination)

फुलातील परागकण त्याच फुलातील किंवा त्याच जातीच्या दुसऱ्या फुलातील जायांगाच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या घटनेला परागण म्हणतात. सर्व आवृतबीजी (सपुष्प) आणि अनावृतबीजी वनस्पतींमध्ये फलन घडून येण्याआधी परागण व्हावे लागते. सायकस, पाइन…

पळस (Flame of the forest)

शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया…

गवत (Grass)

जगभर विपुल प्रसार असणार्‍या पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ‘ग्रास’ या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या कुलामधील काही जातींतील वनस्पतींचा समावेश केला जातो, कारण या वनस्पती…

एकदांडी (Coat buttons)

एकदांडी ही ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी अ‍ॅस्टरेसी कुलातील एक तणासारखी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ट्रायडॅक्स प्रोकम्बेन्स आहे. ही वनस्पती जमिनीवर सरपटत वाढणारी, ३०-६० सेंमी. उंचीची व केसाळ असून…

ऐन (Laurel)

कठिण लाकडासाठी प्रसिद्ध असणारा हा वृक्ष काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया टोमेंटोजाअसे आहे. राजस्थानाखेरीज भारतात सर्वत्र हा वृक्ष आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतीय प्रदेशात हा वृक्ष विपुल प्रमाणात आढळतो. ऐन…

ओट (Oat)

ओट ही गव्हासारखे धान्य देणारी एक वनस्पती आहे. ही वर्षायू वनस्पती ओषधी आहे. ती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅव्हेना सटायव्हा असे आहे. ओट हे प्रामुख्याने थंड प्रदेशात येणारे पीक असून…

कोथिंबीर (Coriander)

कोथिंबीर ही एपियसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोरिअ‍ँड्रम सॅटायव्हम असे आहे. मूलत: ही दक्षिण यूरोप व आशिया मायनरमधील असून यूरोपात फार प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात ही वनस्पती सर्वत्र पिकविली जात…

कारले (Bitter gourd)

कारले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मॉमोर्डिका चॅरँशिया आहे. या वर्षायू वेलीची बरीच लागवड भारत, मलेशिया, चीन, श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश इ. प्रदेशांत सर्वत्र करतात. भारतात समुद्रसपाटीपासून १,५०० मी.…

केवडा (Screw pine)

केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे आहे. या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा म्हणतात. हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो. या वनस्पतीचा प्रसार निसर्गत: भारतीय…

कुळीथ (Horse gram)

कुळीथ (हुलगा) ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव डॉलिकॉस बायफ्लोरस असे आहे. ही शिंबावंत (शेंगा येणारी) वेल असून सामान्यपणे उष्ण कटिबंधात आढळते. अनेक शारीरिक लक्षणांत हिचे पावट्याच्या वेलीशी साम्य असले,…

केळ (Banana)

केळ ही म्युसेसी कुलातील एकदलिकित व बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव म्युसा पॅरॅडिसियाका असे आहे. या वनस्पतीच्या फळांनाही केळी म्हणतात. या वनस्पतीचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात असून शास्त्रज्ञांचे मते ते…

कवठ (Elephant apple; Wood apple)

कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत या वृक्षाला कर्ड फ्रूट किंवा मंकी फ्रूट असे म्हणतात. याचा प्रसार मुख्यत्वे आशियामध्ये पाकिस्तान, बांगला…

कर्दळ (Indian Shot)

कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे…

अहाळीव (Garden cress)

अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी असून मूळची ईथिओपिया देशातील आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड…

आवळी (Indian gooseberry)

फायलँथॅसी कुलातील आवळी हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात, वनामध्ये किंवा लागवडीखाली वाढतो. त्याचे शास्त्रीय नाव एंब्लिका ऑफिसिनॅलिस आहे. भारतात सर्व पानझडी वनामध्ये, समुद्रसपाटीपासून सु. २०० मी. उंचीपर्यंत टेकड्यांच्या…