सांख्यकारिका (Samkhyakarika)

आचार्य ईश्वरकृष्ण विरचित सांख्यकारिका हा सांख्यदर्शनावरील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘सांख्यसप्तति’ असेही म्हणतात. या ग्रंथात एकूण ७२ कारिकांमध्ये (श्लोकांमध्ये) सांख्य तत्त्वज्ञान संक्षेपाने सांगितले आहे. ईश्वरकृष्णांच्या काळाविषयी विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते.…

संयम

सर्वसामान्यपणे मराठीमध्ये संयम या शब्दाचा अर्थ ‘मनावर ताबा ठेवणे’ असा होतो. योग दर्शनामध्ये ‘संयम’ हा एक पारिभाषिक शब्द आहे. अष्टांगयोगातील धारणा, ध्यान आणि (संप्रज्ञात) समाधि या अंतिम तीन अंगांना एकत्रितपणे…

मन

आधुनिक विज्ञानानुसार व्यक्तीचे विचार, भाव-भावना, बुद्धी, जाणीवा या सर्वांचे केंद्र हे मेंदू आहे. परंतु, या भौतिक अवयवाच्या पलिकडे जाऊन एक अमूर्त असे इंद्रिय असते, ते सूक्ष्म इंद्रिय म्हणजे ‘मन’ होय…

द्रव्य (Substance)

सर्व दर्शनांमध्ये द्रव्य कशाला मानावे, द्रव्ये किती आहेत, त्यांचे स्वरूप काय इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे. योगदर्शनानुसार  पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांमधील सामान्य धर्म आणि…

राग (Attachment)

राग म्हणजे ‘आसक्ती’ होय. मराठीमध्ये राग या शब्दाचा अर्थ ‘क्रोध’ असा होतो, परंतु संस्कृतमध्ये प्रिय वस्तूंप्रति असणारी आसक्ती म्हणजे राग होय. महर्षी पतंजलींनी राग हा एक क्लेश मानला आहे. रागाचे…

द्वेष (Aversion)

अप्रिय वस्तूंप्रति असणारी क्रोधाची भावना म्हणजे द्वेष होय. महर्षी पतंजलींनी द्वेषाचा समावेश क्लेशांमध्ये केलेला आहे. द्वेषाचे स्वरूप त्यांनी ‘दु:खानुशयी द्वेष:’ (योगसूत्र २.८) या सूत्राद्वारे सांगितले आहे. व्यासभाष्यामध्ये द्वेष या क्लेशाचे…

Read more about the article विवेकज्ञान (Discriminative knowledge)
Beautiful Backgrounds For Powerpoint Presentations in Beautiful Backgrounds For Powerpoint Presentations - parksandrecgifs.com

विवेकज्ञान (Discriminative knowledge)

विवेकज्ञानाला सांख्ययोग दर्शनांमध्ये सर्वोत्कृष्ट ज्ञान मानले आहे. ज्या ज्या वेळी ज्ञान होते, त्या त्या वेळी त्या ज्ञानाचा कोणता न कोणता विषय असतो; म्हणजे ज्ञान नेहमी ‘कशाच्या तरी विषयी’ असते. ज्ञानाचा…

चतुर्व्यूह (Fourfold aspects of a structured procedure)

योगशास्त्राची रचना चार मुख्य घटकांवर आधारित असल्यामुळे योगशास्त्राला चतुर्व्यूह म्हटले जाते. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात (आयुर्वेदात) रोग, रोगाचे कारण, आरोग्य (रोगाचा नाश) आणि औषध (रोग नष्ट करण्याचे साधन) या चार गोष्टींचा विचार…

प्रमाण (Valid knowledge)

‘प्रमा’ म्हणजे यथार्थ ज्ञान व ज्या साधनाद्वारे ज्ञान प्राप्त होते त्याला ‘प्रमाण’ असे म्हणतात. योगदर्शनानुसार कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी चित्ताची त्या वस्तूच्या आकाराची वृत्ती (चित्ताचा पदार्थाच्या रूपाने होणारा परिणाम) होणे…

Read more about the article तुष्टि  [Contentment (positive and negative)]
lemon coloured wallpaper Fresh Lemon Yellow Wallpaper Home Safe

तुष्टि  [Contentment (positive and negative)]

तुष्टी या शब्दाचा शब्दश: अर्थ संतोष व समाधान असा आहे. सांख्यदर्शनामध्येही हा शब्द याच अर्थाने परंतु एक पारिभाषिक संज्ञा म्हणून येतो. सांख्यदर्शनानुसार महत् (बुद्धी) या तत्त्वाचे धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान,…

काल – योगदर्शनानुसार (Time – According to Yoga)

वर्तमान, भूत, भविष्य, तास, मिनिट, सेकंद, वर्ष, महिने, दिवस इत्यादी अनेक शब्दांद्वारे आपण काळाविषयी व्यवहार करीत असतो. ‘काल’ या तत्त्वाविषयी सर्व भारतीय दर्शनांमध्ये विशेषत्वाने विचार करण्यात आलेला आहे. महर्षि पतंजलींनी…

चित्तभूमी (Chitta Bhumi)   

चित्तामधील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये परिवर्तन झाल्याने चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था होतात. आपले चित्त जरी एकच असले, तरी कधी आनंद तर कधी दुःख अनुभवाला येते. कधी काम करण्यास…

निद्रा

योगदर्शनानुसार निद्रा ही चित्ताच्या पाच वृत्तींपैकी एक वृत्ती आहे. झोपल्यानंतर ज्यावेळी स्वप्ने पडतात तिला स्वप्नावस्था व ज्यावेळी स्वप्नविरहित शांत झोप लागते, तिला सुषुप्ती अवस्था (गाढ निद्रा) असे म्हणतात. ‘निद्रा’ या…

बंध

अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुष (आत्मा) चित्ताशी तादात्म्याचा अनुभव करतो व स्वत:ला चित्ताद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा कर्ता समजतो. या कर्तृत्वाच्या अभिमानामुळे केल्या जाणाऱ्या क्रियांचे फळ आत्म्याला अनुभवावे लागते व तो जन्म-मृत्यूच्या…

अथ

महर्षी पतंजलींनी लिहिलेल्या योगसूत्रांची सुरुवात ‘अथ’ या शब्दाने होते. ‘अथयोगानुशासनम्’ अर्थात् ‘गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रचलित योगशास्त्राचा आरंभ होत आहे’ हे पहिले योगसूत्र आहे. योगसूत्राप्रमाणेच वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दर्शनांच्या सूत्रग्रंथांची…