Read more about the article ढेकूण (Bedbug)
ढेकूण (सायमेक्स लेक्ट्युलॅरियस)

ढेकूण (Bedbug)

माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या रक्तावर पोसणारा एक परजीवी कीटक. ढेकणाचा समावेश संधिपाद संघातील कीटकांच्या हेमिप्टेरा गणातील सायमिसिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव सायमेक्स लेक्ट्युलॅरियस आहे. तो जगभरातील उष्ण प्रदेशांत आढळतो.…

तुडतुडा (Leaf hopper)

एक पंखधारी कीटक. हेमिप्टेरा गणाच्या क्लायविओऱ्हिंका उपगणातील सिकॅडेलिडी कुलात तुडतुड्याचा समावेश होतो. या कुलातील कोणत्याही जातीच्या कीटकाला सामान्यपणे तुडतुडा म्हणतात. त्यांच्या कुलात २०,००० हून अधिक जातींचा समावेश आहे. जगभरात हे…

त्सेत्से माशी (Tsetse fly)

घरमाशीसारखा एक कीटक. त्सेत्से माशीचा समावेश कीटकांच्या डिप्टेरा गणाच्या ग्लॉसिनिडी कुलातील ग्लॉसिना प्रजातीत होतो. तिचे शास्त्रीय नाव ग्लॉसिना टॅबॅनिफॉर्मिस आहे. तिला टिक-टिक माशी असेही म्हणतात. आफ्रिका खंडाच्या सहारा आणि कलहारी…

कास्थी (Cartilage)

कास्थी (कूर्चा) ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. या ऊतींना अन्य ऊतींच्या मानाने पेशी कमी आणि पेशीबाहेरील आधारद्रव्य जास्त असते. संयोजी ऊतींचे आधारद्रव्य मृदू तरीही घट्ट…

गर्भविज्ञान (Embryology)

बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतील विकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केला जातो. सामान्यपणे ही शाखा प्राणिशास्त्राशी संबंधित असल्याचे मानले जाते. मात्र, वनस्पतींबाबतही ही संकल्पना वरील अर्थानेच…

जीवाश्म (Fossil)

पुरातन काळातील सजीवांचे आता मिळणारे अश्मीभूत अवशेष. उत्खननात मिळणारी हाडे, सांगाडे, प्राणी, वनस्पती वगैरेंच्या अश्मीभूत अवशेषांना जीवाश्म म्हटले जाते. जीवाश्मांचे प्रकार : जीवाश्म बनण्याच्या नैसर्गिक पद्धतीवरून खालील प्रकार ठरविले जातात.…

खेचर (Mule)

खेचर हा एक पाळीव व संकरित प्राणी असून घोडी आणि गाढव (नर) यांच्या संकरातून तो निपजतो. तसेच घोडा आणि गाढवी यांच्या संकरातून निपजणार्‍या प्राण्याला ‘हिनी’ म्हणतात. खेचरांच्या तुलनेत हिनीची निपज…

खेकडा (Crab)

रुंद व चपटे शरीर असलेला, शरीरभर कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला अपृष्ठवंशी प्राणी.  संधिपाद संघातील कवचधारी (क्रस्टेशिया) वर्गातील दशपाद (डेकॅपोडा) गणात खेकड्यांचा समावेश होतो. जगभर खेकड्यांच्या सु. ४,५००…

खूर (Hoof)

काही सस्तन प्राण्यांच्या पावलांवरील असलेली कठिण वाढ म्हणजे खूर. अशा प्राण्यांचा समावेश खूरधारी प्राणी (अंग्युलेटा) गणात होतो. यामध्ये डुक्कर, झीब्रा, घोडा तसेच शिंगे असलेल्या सस्तन प्राण्यांचा समावेश होतो. नखरांमध्ये उपयोगांप्रमाणे…

खवले (Scales)

प्राण्यांच्या शरीराला संरक्षण देणार्‍या लहान, कठिण व चकत्यांसारख्या संरचना. त्या त्वचेपासून उत्पन्न झालेल्या असतात. बहुतांशी मासे आणि अनेक साप व सरडे यांच्या बाह्यत्वचेवर खवले असतात. खवल्यांचे आकार, आकारमान, ते कसे…

जलव्याल (Hydra)

आंतरदेहगुही संघाच्या हायड्रोझोआ वर्गातील एक जलचर प्राणी. आंतरदेहगुही संघात प्राण्यांची दोन रूपे आढळतात. बहुशुंडक आणि छत्रिक. जलव्याल बहुशुंडक आहे. भारतात सामान्यत: आढळणाऱ्या जलव्यालाचे शास्त्रीय नाव हायड्रा व्हल्गॅरिस आहे. ध्रुवीय शीतप्रदेश…

चिमणी (Sparrow)

सर्वांच्या परिचयाचा एक पक्षी. पॅसरिडी कुलात चिमणीचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस आहे. पॅसर, पॅट्रोनिया, कार्पोस्पायझा व माँटिफ्रिगिला अशा पॅसरिडी कुलाच्या चार प्रजाती मानल्या गेल्या आहेत. त्यांपैकी…

चितळ (Spotted deer)

भारतात मोठ्या संख्येने आढळणारा मृग. स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग कुलात (सर्व्हिडी) चितळाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिस ॲक्सिस आहे. श्रीलंका, बांगला देश, नेपाळ व भारत या देशांत…

चिचुंदरी (Asian house shrew)

उंदरासारखा दिसणारा एक सस्तन प्राणी. चिचुंदरी हा युलिपोटिफ्ला या गणातील आहे. या गणातील सोरीसिडी कुलाच्या पांढऱ्या दातांच्या प्रकारात संकस प्रजाती येते. संकस प्रजातीतील प्राण्यांना चिचुंदरी म्हणतात. या प्रजातीत १८ जाती…

चक्रवाक (Ruddy shelduck)

एका जातीचे बदक. हंस आणि बदके या पक्ष्यांचा समावेश ॲनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलात होतो त्याच उपकुलात या पक्ष्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव टॅडॉर्ना फेरुजीनिया आहे. हा स्थलांतर करणारा…