चंडोल (Indian bushlark)

एक गाणारा पक्षी. या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या ॲलॉडिडी कुलामध्ये होतो. जगभर याच्या १८ प्रजाती असून या सर्व पक्ष्यांना सामान्यपणे चंडोल म्हणतात. भारतात खासकरून ॲलॉडा आणि मायराफ्रा प्रजातीचे चंडोल आढळत…

घोणस (Russell’s viper)

सरीसृप वर्गाच्या व्हायपरिडी कुलातील एक व‍िषारी साप. या वर्गातील डायोप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील सर्पेंटिस उपगणात जगातील सर्व सापांचा समावेश केला जातो. घोणसाचे शास्त्रशुद्ध वर्णन सर्वप्रथम १७९६ मध्ये स्कॉटलंडच्या पॅट्रिक रसेल…

गोचीड (Tick)

प्राण्यांच्या संधिपाद संघातील अष्टपाद अ‍ॅरॅक्निडा वर्गात गोचिडांचा समावेश होतो. मुखांगांच्या दोन जोड्या आणि पायांच्या चार जोड्या ही या वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत. टणक गोचिडे (आयक्झोडिडी) आणि मऊ गोचिडे (अरगॉसिडी) अशी…

गिधा़ड (Vulture)

अ‍ॅक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे गिधाड समुद्रसपाटीपासून १,५२५ मी. उंचीपर्यंत व बंगाली गिधाड २,४४० मी.…

चास (Indian roller)

उड्डाण करताना कौशल्यपूर्ण कसरती करणारा कोरॅसिइडी कुलातील एक पक्षी. इराण, इराकपासून पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार, चीनचा काही भाग तसेच आग्नेय आशियातील देश अशा विस्तृत भागांत हे पक्षी आढळतात. यांच्या अन्य…

गांधील माशी (Wasp)

संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधील माशीचा समावेश होतो. याच गणात मुंग्या आणि मधमाश्या यांचाही समावेश होतो. यांच्या सु. १७,००० जाती ज्ञात असून त्या प्रामुख्याने उष्ण व उबदार प्रदेशांत…

घरटे (Nest)

निवाऱ्यासाठी, संरक्षणासाठी तसेच अंडी घालण्यासाठी व त्यामधून बाहेर येणाऱ्या पिलांची जोपासना करण्यासाठी सजीव प्राणी जी रचना बांधतात व वापरतात त्या रचनेला घरटे म्हणतात. सामान्यपणे प्रत्येक जातीतील सजीवांच्या घरट्यांची शैली विशिष्ट…

अमीबा (Amoeba)

आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्‍हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे. अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्‍या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती…

अजगर (Python)

अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण…

यष्टी कीटक (Stick insect)

संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या एक्सॉप्टेरिगोटा उपवर्गातील फॅस्मॅटोडी गणाच्या फॅस्मॅटिडी कुलामध्ये यष्टी कीटकांचा समावेश केला जातो. वनस्पतींची पाने किंवा काटक्या यासारखे त्यांचे रूप मिळतेजुळते असल्यामुळे त्यांना यष्टी कीटक म्हटले जात असावे.…

मुंगीखाऊ (Ant–eater)

ज्या प्राण्यांच्या आहारात मुख्यत: मुंग्यांचा किंवा वाळवीचा समावेश होतो, अशा प्राण्यांना मुंगीखाऊ म्हणतात. हे सर्व सस्तन प्राणी आहेत. या प्राण्यांमध्ये दातांची कमी संख्या, शरीरावर दाट केस, खवले, लांब व चिकट…

मावा (Aphid)

मृदुकवचधारी कीटकांचा एक समूह. कीटकांच्या हेमिप्टेरा गणातील दहा कुलांमध्ये मावा कीटकाच्या सु. ४,४०० जातींचा समावेश केला जातो. त्यांचा आढळ प्रामुख्याने उपोष्ण प्रदेशांत असला, तरी ते सर्वत्र तुरळक प्रमाणात आढळतात. वनस्पतींच्या…

माळढोक (Great Indian bustard)

भारतातील माळरानात आढळणारा एक पक्षी. पक्षिवर्गातील ग्रुईफॉर्मिस गणाच्या ओटिडिडी कुलात माळढोक पक्ष्याचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव आर्डेओटिस नायग्रिसेप्स आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांतील कोरड्या गवताळ प्रदेशांमध्ये माळढोक आढळतात.…

रांजा (Skate)

कास्थिमत्स्य वर्गातील राजीफॉर्मीस उपगणातील ऱ्हिनोबॅटिडी कुलातील एक खाद्य मासा. त्याचे शास्त्रीय नाव ऱ्हिंकोबॅटस जीडेन्सीस आहे. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावर ते आढळतात. मुंबईत तो लांग या नावाने ओळखला जातो. त्याचा…

मोती-कालव (Pearl oyster)

एक जलीय प्राणी. मोती-कालवाचा समावेश मृदुकाय संघाच्या शिंपाधारी (बायव्हाल्व्हिया) वर्गात केला जातो. त्याचे कवच दोन शिंपांचे आणि जवळपास द्विपार्श्वसममित असते. मोती-कालवांच्या वसाहती समुद्रात मर्यादित ठिकाणी असतात. ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, अमेरिकेची…