मैना (Common Myna)

जगात सर्वत्र आढळणारा पक्षी. मैना हा पॅसेरिफॉर्मिस गणाच्या स्टर्निडी कुलातील पक्षी आहे. भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या मैनेचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस आहे. या प्रजातीतील ॲक्रिडोथिरिस या शब्दाचा अर्थ ‘टोळांचा शिकारी’ असा…

बिबळ्या (Leopard)

एक हिंस्र वन्य सस्तन प्राणी. बिबळ्याचा समावेश स्तनी वर्गातील कार्निव्होरा (मांसाहारी) गणाच्या फेलिडी (मार्जार) कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव पँथेरा पार्डस आहे. फेलिडी कुलातील सिंह आणि वाघ यांच्या खालोखाल आकारमानाने…

फळमाशी (Fruitfly)

फळांना उपद्रवकारक असणारी माशी. जगात सर्वत्र फळमाश्या आढळतात. संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या द्विपंखी (डिप्टेरा) गणाच्या ट्रायपेटिडी आणि ड्रॉसोफिलिडी या दोन कुलांमध्ये फळमाश्यांचा समावेश केला जातो. ट्रायपेटिडी कुलात सु. १,२०० पेक्षा…

पाल (House lizard)

घरातील भिंतींवर व छतावर वावरणारा एक सरपटणारा प्राणी. पालीचा समावेश सरीसृप वर्गातील डायॉप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमेटा गणातील लॅसर्टिलिया उपगणाच्या गेकोनिडी कुलात होतो. या कुलात सु. ३०० जाती आहेत. पालीचा प्रसार जगभर…