(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती सांळुंके
कोणत्याही रोगाची चिकित्सा, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध यांचा संकलित अभ्यास करणारे विज्ञानाधिष्ठित शास्त्र म्हणजे वैद्यकशास्त्र होय. याकरिता वैद्य, परिचारिका आणि इतर तज्ञ एकत्रित कार्यरत असतात.
वैद्यकशास्त्राच्या नवजात शिशुविज्ञान (Neonatology), बालरोगविज्ञान (Paediatrics), प्रसूतिविद्या आणि स्त्रीरोगविज्ञान (Obstetrics & Gynaecology), शरीरशास्त्र (Anatomy), नेत्रविज्ञान (Ophthalmology), कर्ण-नासिका-कंठ चिकित्सा (Ear, Nose and Throat Surgery), जठरांत्रविज्ञान (Gastroenterology), हृद्रोगविज्ञान (Cardiology),अंत:स्रावविज्ञान (Endocrinology), दंतवैद्यक (Dentistry), तंत्रिकाविज्ञान (Neurology),शरीरक्रियाविज्ञान (Physiotherapy), सामाजिक वैद्यक (Community Medicine) अशा अनेक शाखा-उपशाखा आहेत.
वैद्यकीय चिकित्सेकरिता क्ष-किरण, प्रतिमादर्शन, आधुनिक यंत्र व्यवस्था अशी अनेक तंत्रे विकसित झाली आहेत, ज्यामुळे रोगाचे प्राथमिक परीक्षण करणे सोपे जाते.औषधशास्त्राच्या वापराने अनेक जीवघेणे आजार बरे होतात. रोगाची लक्षणे आणि प्रसारमाध्यमे यांवरून रोगप्रतिबंधात्मक उपाय केले जातात. सामाजिक वैद्यक या शास्त्राद्वारे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.
निरोगी आयुष्यासाठी औषध, आहार आणि व्यायाम यांचीही आवश्यकता आहे.आधुनिक वैद्यकशास्त्र याविषयामध्ये मानवी शरीराचा अभ्यास होतो. मानवी शरीराचे अवयव, अवयवसंबंधित आजार व त्यांची चिकित्सा यांचाही उल्लेख होतो. या शास्त्राद्वारे आपणांस सर्व शरीरविषयक माहिती उपलब्ध होते.
वैद्यकशास्त्र हा विषय व्यापक असल्याकारणाने त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या अनेक संकल्पनांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. याकरिता पूर्वप्रकाशित मराठी विश्वकोशामध्ये अनेक नोंदींवर लिखाण करण्यात आले. सदर माहितीचे अद्ययावतीकरण करून वाचकाला प्रमाणभूत शास्त्रीय माहिती एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी ‘आधुनिक वैद्यकशास्त्र’ या विषयाचे स्वतंत्र ज्ञानमंडळ तयार करण्यात आले आहे.या विषयांतर्गत मानवी अवयव, विविध शरीरसंस्था (म्हणजेच चेतासंस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था यांचेही विस्तृत वर्णन दिले आहे. तसेच विविध वैद्यकीय संकल्पना आणि वैद्यकीय उपकरणे यांचीही माहिती दिली आहे. प्रस्तुत माहिती जिज्ञासू वाचकांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
संतुलन अवपात (Balance disorders)

संतुलन अवपात

शारीरिक संतुलन म्हणजे शरीरस्थिती स्थिर अवस्थेत राखणे होय. अंतर्कर्ण (Inner ear), डोळे (दृष्टी) आणि स्पर्शज्ञानाद्वारे शरीराला शारीरिक संतुलन राखण्यास मदत ...
संवेदनाहरण / बधिरीकरण ( Anaesthesia )

संवेदनाहरण / बधिरीकरण

संवेदनाहरण संवेदनाहरण ही शरीराची अशी अवस्था आहे की, ज्यामध्ये तात्पुरती संवेदना किंवा वेदना जाणीव होत नाही. हे वैद्यकीय किंवा पशुवैद्यकीय ...
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया (Female contraception)

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया

स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये स्त्री बीजवाहक नलिका (Fallopian tubes) बंद केल्या जातात. त्या दोऱ्याने बांधल्या जातात किंवा काही वेळा रबरीबंद (Rubber ...
हर्शस्प्रंग आजार  (Hirschsprung’s disease)

हर्शस्प्रंग आजार

गर्भधारणा झाल्यापासून अर्भकाची नैसर्गिक वाढ वेगवान व अतिशय चपखलपणे होते. निरोगी मूल जन्मल्यानंतरही शरीर रचना आणि कार्य अचूकपणे होत असते ...
Loading...