(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मानवशास्त्र हे मानवप्राणी व त्याच्या कार्याचा सांगोपांग व सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र आहे. तसेच ते मानवाच्या जीवनशैलीचा व त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचा यथायोग्य परामर्श घेते. अँथ्रोपॉलॉजी या इंग्रजी शब्दाचा मानवशास्त्र हा पर्यायी शब्द असून ‘अँथ्रोपॉस’ म्हणजे ‘मानव’ या ग्रीक शब्दापासून तो बनला आहे. अँथ्रोपॉलॉजीला सुरुवातीच्या काळात ‘मानववंशशास्त्र’ असे म्हटले जात; परंतु या विषयात फक्त मानवी वंशाचाच अभ्यास होत नसून मानवाच्या अस्तित्वापासून ते वर्तमानस्थितीतल्या मानवाचा वैकासिक आलेख उलगडून दाखविण्यापर्यंतचा अभ्यास केला जातो. शिवाय वंश कल्पनाही आता त्याज्य झाली असल्यामुळे ‘मानववंशशास्त्र’ या शब्दाऐवजी व्यापक अर्थाने ‘मानवशास्त्र’ हा शब्द सयुक्तिक व सर्वमान्य झाला आहे.
मानव हा एक प्राणी आहे. मानवप्राणी व प्राणिजगतातील इतर प्राण्यांत काय साम्य अथवा फरक आहेत? मानवप्राण्याचे वैशिष्ट्य काय? इत्यादींचे तुलनात्मक अध्ययन मानवशास्त्र करते. याशिवाय मुख्यत्वेकरून यात मानवाच्या शारीरिक व सांस्कृतिक विकासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रचंड विश्वात माणूस कोण आहे? पृथ्वीवर तो अचानकपणे अवतरला की, उत्क्रांतीच्या मालिकेतील तो अखेरचा टप्पा आहे? मानवप्राण्याचे मूळ उगमस्थान जर एकच आहे, तर मानवात इतकी विविधता का? संस्कृतीचे स्वरूप काय व ती कशी बदलते? संस्कृती व व्यक्तिमत्व यांचे परस्पर संबंध काय आहेत? इत्यादी प्रश्नांचा उहापोह मानवशास्त्र करते.
मानवशास्त्राचे भौतिक किंवा शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्र आणि सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र हे दोन मुख्य विभाग असून या दोहोंचे अनेक उपविभाग आहेत. शारीरिक आणि जीवशास्त्रीय मानवशास्त्र हे मानवाची उत्पत्ती, उत्क्रांती, विविधता, शारीरिक वाढ, अनुवंशिकता इत्यादी जीवशास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास करते. त्यांपैकी आदिमानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करणारे पुरामानवशास्त्र होय. मानवाची संस्कृती, सांस्कृतिक उत्क्रांती, विविधता इत्यादींचा तौलनिक अभ्यास सामाजिक – सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो. मानवप्राणी व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधातून जैवविज्ञान व सामाजिक विज्ञान यांच्यातील दुवा जुळवता येतो. मानवी संस्कृतीचा अविष्कार वेगवेगळ्या मानवसमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळा पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येक संस्कृती एकात्म, स्वतंत्र आणि परिपूर्ण असते. क्षेत्रीय अभ्यास पद्धतीमुळे मानवशास्त्रज्ञांस संस्कृतीच्या सर्व उपांगांचे ज्ञान मिळते.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहेच; परंतु त्याआधी तो एक सजीव घटक आहे. मानवी समाज हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रचनांच्या बदलांतून वर्षानुवर्षे पुढे जात आहे. मानवी संस्कृती स्थलागणिक, समाजानुरूप बदलत जाते. वेगवेगळ्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, आहारविहाराचा मानवी शरीरावर, स्वरूपावर, मानवी संस्कृतीवर परिणाम होतो आणि त्यामुळेच शारीरिक विविधतेबरोबरच सांस्कृतिक विविधताही पाहावयास मिळते. मानवशास्त्र हे मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी परिवर्तनाचे तसेच त्यांच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यामुळेच मानवशास्त्र या विषयात मानवाच्या सर्वांगीण आणि सर्वव्यापक, तसेच प्राचीन मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतच्या सर्व मानवविषयक माहितीचे संकलन करून योग्य स्वरूपाची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे मराठी विश्वकोशाच्या ‘मानवशास्त्र ज्ञानमंडळा’चे उद्दिष्ट आहे.
चिरू जमात (Chiru Tribe)

चिरू जमात

भारताच्या पूर्वेकडील राज्यांत आढळणारी एक आदिवासी जमात. ही जमात मणिपूर राज्यात आणि काही प्रमाणात नागालँड व आसाम या राज्यांत आढळून ...
चेंचू जमात (Chenchu Tribe)

चेंचू जमात

चेंचुवार, चेंच्वार. प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्यातील नल्लमलईच्या जंगलामध्ये वास्तव्यास असलेली एक आदिवासी जमात. या राज्याशिवाय ओडिशा, कर्नाटक,  तेलंगणा  या राज्यांतही  ...
जननक्षमता  (Fertility)

जननक्षमता  

जननक्षमता म्हणजे जीवंत प्राण्यांची सामान्य लैंगिक क्रियेतून पुनरुत्पादन करण्याची क्षमता होय. स्त्रीने प्रत्यक्षात जिवंत अपत्यांना जन्म देणे, ही प्रक्रिया म्हणजे ...
जीवशास्त्रीय मानवशास्त्र (Biological Anthropology)

जीवशास्त्रीय मानवशास्त्र

मानव प्राण्याची शारीरिक विविधता, उत्पत्ती, उत्क्रांती, विकास इत्यादींचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. यास भौतिकी मानवशास्त्र किंवा जैविक मानवशास्त्र असेही म्हटले ...
जॉन आर. लुकाक्स (John R. Lukacs)

जॉन आर. लुकाक्स

लुकाक्स, जॉन आर. (Lukacs, John R.) : ( १ मार्च १९४७ ). प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. लुकाक्स यांचा जन्म अमेरिकेमध्ये झाला. त्यांनी ...
जॉन रसेल नेपिअर (John Russel Napier)

जॉन रसेल नेपिअर

नेपिअर, जॉन रसेल (Napier, John Russel) : (११ मार्च १९१७ – २ ऑगस्ट १९८७). प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ आणि शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा ...
जॉन हेन्री हटन (John Henry Hutton)

जॉन हेन्री हटन

हटन, जॉन हेन्री (Hutton, John Henry) : (२७ जून १८८५ – २३ मे १९६८ ). ब्रिटिश भारतातील एक सनदी अधिकारी व ...
झाखरिंग जमात (Zakhring Tribe)

झाखरिंग जमात

भारतातील एक आदिवासी जमात. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत झाखरिंग जमातीचे लोक तिबेटमधून स्थलांतर करून भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात स्थलांतरित झाले ...
झोऊ जमात (Zou Tribes)

झोऊ जमात

भारतातील एक आदिवासी जमात. उंच डोंगराळ प्रदेशवासीय झोऊ जमातीचे लोक मणिपूर राज्यातील चंदेल आणि चूरचंदपूर या भागांत वास्तव्यास आहेत. उत्तरपूर्व ...
डँकमायजर व फुरुहाटा निर्देशांक (Dankmeijer's  and Furuhata’s Index)

डँकमायजर व फुरुहाटा निर्देशांक

हस्तरेखा, बोटांवरील चक्र आणि कमानी यांचा अभ्यास करून मानवसमूहाबद्दल निर्देशांक काढण्याची एक शास्त्रीय पद्धत. त्वचारेखन अथवा हस्तरेखाटन पद्धतीमधील हाताच्या सर्व ...
डेव्हिड्सन ब्लॅक (Davidson Black)

डेव्हिड्सन ब्लॅक

ब्लॅक, डेव्हिड्सन (Black, Davidson) : (२५ जुलै १८८४ – १५ मार्च १९३४). प्रसिद्ध कॅनेडियन शरीरशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचे नाव ‘पेकिंग ...
दंत्य मानवशास्त्र (Dental Anthropology)

दंत्य मानवशास्त्र

मानवी उत्क्रांतीचा उलगडा करण्यासाठी अस्तीत्वात आलेली शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्रातील एक शाखा. पारंपारिक दंत वैद्यकशास्त्राच्या अखत्यारीत असलेल्या या विषयाला मानवशास्त्रज्ञांनी ...
दिदयी जमात (Didayi Tribe)

दिदयी जमात

भारतातील एक आदिवासी जमात. आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांच्या सीमेवर या जमातीचे वास्तव्य आढळून येते. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ...
दृक मानवशास्त्र (Visual Anthropology)

दृक मानवशास्त्र

माणसाची जीवनशैली, संस्कृती, परंपरा, इत्यादींचा अभ्यास छायाचित्रण-चित्रफितीच्या साहाय्याने केला जातो, त्या अभ्यासपद्धतीस दृक मानवशास्त्र असे म्हणतात.  छायाचित्र व चित्रफित या ...
धारुआ जमात (Dharua Tribe)

धारुआ जमात

ओडिशा राज्यातील सर्वांत जुन्या जमातींपैकी एक आदिवासी जमात. ही जमात गोंड जमातीच्या जवळची मानली जाते. ही जमात ओडिशा राज्यातील कटक, ...
धोडिया जमात (Dhodia Tribe)

धोडिया जमात

धुलिया. भारतातील एक आदिवासी जमात. गुजरात राज्याच्या दक्षिण भागामध्ये (प्रामुख्याने सुरत व बलसाड जिल्ह्यांमध्ये) तसेच दमण-दीव, दाद्रा व नगरहवेली, महाराष्ट्र ...
नाईकपोड जमात (Naikpod Tribe)

नाईकपोड जमात

महाराष्ट्र राज्यातील, मुख्यत: गडचिरोली, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांतील, एक जमात. त्यांची वस्ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतही ...
नासिका रुंदी बिंदू (Alare Point)

नासिका रुंदी बिंदू

नाकपुड्यांच्या बाहेरील बाजुला असलेल्या सर्वांत कडेच्या बिंदुंना अथवा नाकपुड्यांवरील सर्वाधिक रुंद असलेल्या बिंदुंना अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू असे संबोधतात ...
निकोबारी समूह (Nicobari Comunity)

निकोबारी समूह

निकोबार बेटावरील एक आदिवासी समूह. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सलग १९ भूभाग असून त्यांपैकी १२ भूभागांवर मानवी वस्ती आहे. त्यात ...
न्याय सहायक मानवशास्त्र (Forensic Anthropology)

न्याय सहायक मानवशास्त्र

मानवी शरीर, अस्थी आणि सांगाडा यांची ओळख पटविण्यासाठी कायद्याच्या चौकटीतील विविध बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र. न्याय मानवशास्त्राच्या अंतर्गत येणाऱ्या शास्त्रप्रणालीचा ...