(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मानवशास्त्र हे मानवप्राणी व त्याच्या कार्याचा सांगोपांग व सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र आहे. तसेच ते मानवाच्या जीवनशैलीचा व त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचा यथायोग्य परामर्श घेते. अँथ्रोपॉलॉजी या इंग्रजी शब्दाचा मानवशास्त्र हा पर्यायी शब्द असून ‘अँथ्रोपॉस’ म्हणजे ‘मानव’ या ग्रीक शब्दापासून तो बनला आहे. अँथ्रोपॉलॉजीला सुरुवातीच्या काळात ‘मानववंशशास्त्र’ असे म्हटले जात; परंतु या विषयात फक्त मानवी वंशाचाच अभ्यास होत नसून मानवाच्या अस्तित्वापासून ते वर्तमानस्थितीतल्या मानवाचा वैकासिक आलेख उलगडून दाखविण्यापर्यंतचा अभ्यास केला जातो. शिवाय वंश कल्पनाही आता त्याज्य झाली असल्यामुळे ‘मानववंशशास्त्र’ या शब्दाऐवजी व्यापक अर्थाने ‘मानवशास्त्र’ हा शब्द सयुक्तिक व सर्वमान्य झाला आहे.
मानव हा एक प्राणी आहे. मानवप्राणी व प्राणिजगतातील इतर प्राण्यांत काय साम्य अथवा फरक आहेत? मानवप्राण्याचे वैशिष्ट्य काय? इत्यादींचे तुलनात्मक अध्ययन मानवशास्त्र करते. याशिवाय मुख्यत्वेकरून यात मानवाच्या शारीरिक व सांस्कृतिक विकासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रचंड विश्वात माणूस कोण आहे? पृथ्वीवर तो अचानकपणे अवतरला की, उत्क्रांतीच्या मालिकेतील तो अखेरचा टप्पा आहे? मानवप्राण्याचे मूळ उगमस्थान जर एकच आहे, तर मानवात इतकी विविधता का? संस्कृतीचे स्वरूप काय व ती कशी बदलते? संस्कृती व व्यक्तिमत्व यांचे परस्पर संबंध काय आहेत? इत्यादी प्रश्नांचा उहापोह मानवशास्त्र करते.
मानवशास्त्राचे भौतिक किंवा शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्र आणि सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र हे दोन मुख्य विभाग असून या दोहोंचे अनेक उपविभाग आहेत. शारीरिक आणि जीवशास्त्रीय मानवशास्त्र हे मानवाची उत्पत्ती, उत्क्रांती, विविधता, शारीरिक वाढ, अनुवंशिकता इत्यादी जीवशास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास करते. त्यांपैकी आदिमानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करणारे पुरामानवशास्त्र होय. मानवाची संस्कृती, सांस्कृतिक उत्क्रांती, विविधता इत्यादींचा तौलनिक अभ्यास सामाजिक – सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो. मानवप्राणी व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधातून जैवविज्ञान व सामाजिक विज्ञान यांच्यातील दुवा जुळवता येतो. मानवी संस्कृतीचा अविष्कार वेगवेगळ्या मानवसमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळा पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येक संस्कृती एकात्म, स्वतंत्र आणि परिपूर्ण असते. क्षेत्रीय अभ्यास पद्धतीमुळे मानवशास्त्रज्ञांस संस्कृतीच्या सर्व उपांगांचे ज्ञान मिळते.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहेच; परंतु त्याआधी तो एक सजीव घटक आहे. मानवी समाज हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रचनांच्या बदलांतून वर्षानुवर्षे पुढे जात आहे. मानवी संस्कृती स्थलागणिक, समाजानुरूप बदलत जाते. वेगवेगळ्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, आहारविहाराचा मानवी शरीरावर, स्वरूपावर, मानवी संस्कृतीवर परिणाम होतो आणि त्यामुळेच शारीरिक विविधतेबरोबरच सांस्कृतिक विविधताही पाहावयास मिळते. मानवशास्त्र हे मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी परिवर्तनाचे तसेच त्यांच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यामुळेच मानवशास्त्र या विषयात मानवाच्या सर्वांगीण आणि सर्वव्यापक, तसेच प्राचीन मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतच्या सर्व मानवविषयक माहितीचे संकलन करून योग्य स्वरूपाची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे मराठी विश्वकोशाच्या ‘मानवशास्त्र ज्ञानमंडळा’चे उद्दिष्ट आहे.
मेलव्हिल जीन हेरस्कोव्हिट्‌स (Melville Jean Herskovits)

मेलव्हिल जीन हेरस्कोव्हिट्‌स

हेरस्कोव्हिट्‌स, मेलव्हिल जीन (Herskovits, Melville Jean) : (१० सप्टेंबर १८९५ – २५ फेब्रुवारी १९६३). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक ख्यातकीर्त मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ...
मॉरिस गुडमन (Morris Goodman)

मॉरिस गुडमन

गुडमन, मॉरिस (Goodman, Morris) : (१२ जानेवारी १९२५ – १४ नोव्हेंबर २०१०). प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक आणि जीवविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र व मानवशास्त्र ...
यूजीन द्युबॉइस (Eugene Dubois)

यूजीन द्युबॉइस

द्युबॉइस, यूजीन (Dubois Eugene) : (२८ जानेवारी १८५८ – १६ डिसेंबर १९४०)‌. प्रसिद्ध डच शारीरविज्ञ आणि भूशास्त्रज्ञ. द्युबॉइस यांचा जन्म ...
रेण्वीय मानवशास्त्र (Molecular Anthropology)

रेण्वीय मानवशास्त्र

रेण्वीय मानवशास्त्र ही जीवविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र व मानवशास्त्र यांची सांगड घालणारी ज्ञानशाखा आहे. मानव, चिंपँझी व गोरिला यांचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम ...
रेमंड अस्थुर डार्ट (Raymond Asthur Dart)

रेमंड अस्थुर डार्ट

डार्ट, रेमंड अस्थुर (Dart, Raymond Asthur) : (४ फेब्रुवारी १८९३ – २२ नोव्हेंबर १९८८). ऑस्ट्रेलियन वंशाचे प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन मानवशास्त्रज्ञ, ...
रॉबर्ट ब्रूम (Robert Broom)

रॉबर्ट ब्रूम

ब्रूम, रॉबर्ट (Broom, Robert) : (३० नोव्हेंबर १८६६ – ६ एप्रिल १९५१). प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन पुराजीवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील पेझ्ली ...
लिंगभाव मानवशास्त्र (Gender Anthropology)

लिंगभाव मानवशास्त्र

मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्रातील एक प्रमुख सैद्धांतिक संकल्पना. मानवी लैंगिकतेचे विविध पैलू समजून घेणे व समजून सांगणे यांसाठी मानवशास्त्रज्ञ जैविक आणि सांस्कृतिक ...
लोकजीवनशास्त्र (Ethnography)

लोकजीवनशास्त्र

मानवजातीवर्णनशास्त्र किंवा लोकसमूहशास्त्र. मानवशास्त्राची अभ्यासपद्धती ही इतर सर्व विद्याशाखांपेक्षा खूप निराळी आहे. मानवशास्त्राच्या शाखांचा विचार केल्यावर हे सहजच लक्षात येते ...
वय (Age)

वय

‘एज’ या इंग्रजी शब्दाचा मराठीत शब्दशः अर्थ वय असा असला, तरी मानवशास्त्रात वापरताना तो मात्र वेगवेगळ्या संदर्भाने, वेगवेगळ्या अर्थांनी वापरला ...
वर्णहीनता (Albinism)

वर्णहीनता

वर्णहीनता म्हणजे कोड होय. यास विवर्णता किंवा धवलता असेही म्हणतात. प्रामुख्याने अप्रभावी जनुकांमुळे (रिसेसिव्ह जिन्स) वर्णहीनता उद्भवते. मानवी त्वचेमध्ये कृष्णरंजक ...
विकासात्मक मानवशास्त्र (Development Anthropology)‌

विकासात्मक मानवशास्त्र

जगभरातील मानवी समुदायातील लोकांचे जीवन सुधारण्याच्या दृष्टीने होणारी प्रक्रिया म्हणजे मानवीय विकास होय. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जी वसाहतवादी राष्ट्रे होती ...
विल्फ्रिड एडवर्ड ली ग्रॉस क्लार्क (W. E. Le Gros Clark)

विल्फ्रिड एडवर्ड ली ग्रॉस क्लार्क

ली ग्रॉस क्लार्क (Le Gros Clark W. E.) : (५ जून १८९५ – २८ जून १९७१). प्रसिद्ध ब्रिटीश शरीररचनाशास्त्रज्ञ व ...
वृक्षस्थ जीवन आणि बाहुसंचलन (Arboreal Life and Brachiation)

वृक्षस्थ जीवन आणि बाहुसंचलन

वृक्षस्थ जीवनाचा संबंध बाहुसंचलन किंवा शाखन म्हणजेच वृक्षावर जीवन जगण्यास अनुकूल होणे असा आहे. या दोन्ही शब्दांचा परस्पर संबंध आहे ...
वैद्यक मानवशास्त्र (Medical Anthropology)

वैद्यक मानवशास्त्र

मानवी आरोग्य, आजार, आरोग्य व्यवस्था आणि जैविक-सांस्कृतिक घटकांचा आरोग्याबरोबरचा संबंध यांचा अभ्यास म्हणजे वैद्यक मानवशास्त्र होय. यामध्ये स्थानिक समूहाचे आरोग्य ...
शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानव (Anatomically Modern Homo Sapiens)

शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानव

शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाचा जन्म सुमारे २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला. होमो इरेक्ट्स किंवा निअँडरथल मानव हे शारीरिक दृष्ट्या आधुनिक ...
समूहन (Agglutination)

समूहन

रक्ताशी संबंधित असलेली एक प्रकारची रासायनिक क्रिया. ॲग्ल्युटिनेशन या शब्दाची उत्पत्ती ॲग्ल्युटिनेर (चिकटणारा किंवा सांधणारा) या लॅटिन शब्दापासून झाली आहे ...
सर्वात्मवाद, जीवितसत्तावाद आणि निसर्गवाद (Animism, Animatism and Naturism)

सर्वात्मवाद, जीवितसत्तावाद आणि निसर्गवाद

मानवशास्त्रामध्ये धर्म ही अभ्यासाची एक व्यापक संकल्पना आहे. आद्य मानवी संस्कृतीमध्ये धर्माचा उदय कसा झाला असावा, या विषयी विविध मते ...
सहप्रसविता (Couvade)

सहप्रसविता

एक सामाजिक परंपरा किंवा रुढी. यास व्याजप्रसूती, प्रसव सहचर, सहकष्टी असेही म्हणतात. मॅलिनोस्की यांच्या मते, सहप्रसविता ही चाल म्हणजे वैवाहिक ...
सामाजिक मानवशास्त्र (Social Anthropology)

सामाजिक मानवशास्त्र

सामाजिक मानवशास्त्रात बहुतांशी आदिवासी समाजांचा तौलनिक अभ्यास करून मानव समाजाचे स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न केला जातो. शक्य तेवढ्या जास्तीतजास्त समाजातील ...
सांस्कृतिक मानवशास्त्र (Cultural Anthropology)

सांस्कृतिक मानवशास्त्र

मानवप्राण्याच्या उगमापासून ते आजपर्यंतच्या सर्व संस्कृतीचा उगम, वर्तन, विकास, रचना, तिचे कार्य इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास ...