(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
आजच्या आधुनिक विज्ञानात रसायनशास्त्राच्या विविध शाखा कार्यरत आहेत. या प्रत्येक शाखेचे महत्त्व हे वेगळे आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या निर्मितीपासून ते वैद्यकीय क्षेत्रातील औषधनिर्मितीपर्यंतची विविध क्षेत्रे ही रसायनशास्त्राच्या पायावर उभी आहेत. यात सेंद्रिय रसायनशास्त्र, असेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, तसेच भौतिक रसायनशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र अशा रसायनशास्त्रांच्या विविध शाखांचा वापर केला जातो. रसायनशास्त्राच्या या मूळ शाखांव्यतिरिक्त
धातुशास्त्र, बहुवारिकशास्त्र, पदार्थशास्त्र, जनुकशास्त्र, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र, अणुशास्त्र अशा इतर अनेक शाखांचाही रसायनशास्त्र हा एक अविभाज्य घटक आहे. इतकेच कशाला, तर आपल्या शरीरात वा निसर्गातील इतर सजीवांत चाललेल्या विविध क्रिया या रसायनशास्त्रामुळेच शक्य झाल्या आहेत.
रसायनशास्त्र हे प्रत्येक पदार्थाची जडण-घडण तपासते. तसेच एखाद्या पदार्थाची दुसऱ्या
पदार्थाबरोबर कशी आंतरक्रिया होते याचाही पाठपुरावा करते. त्यामुळे विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या
जडण-घडणीशी आणि त्याच्या गुणधर्माशी रसायनशास्त्राचा संबंध येतो. निसर्गात उपलब्ध असलेल्या
पदार्थांपासून मानवाला उपयुक्त ठरणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीसंबंधीचा अभ्यास हा
रसायनशास्त्राचाचा भाग आहे. एखाद्या वस्तूच्या गुणधर्मात बदल करून त्याची सुधारित आवृत्ती निर्माण करणे किंवा विशिष्ट कारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एखाद्या पदार्थाची नवनिर्मिती करणे, हीसुद्धा रसायनशास्त्राचीच कार्यक्षेत्रे आहेत. रसायनशास्त्राचा या बहुविध उपयोगांमुळे, रसायनशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन हे विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचीही अत्यावश्यक गरज बनले आहे. याच कारणास्तव रसायनशास्त्राची विलक्षण वेगाने सर्वांगीण प्रगती होत आहे. या प्रगतीची माहिती होण्यासाठी, रसायनशास्त्राची वेगेवगळ्या अंगांनी ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्यांना ही ओळख मराठीतून करून दिल्यास, जनसामान्यांना मानवी जीवनाशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष निगडित असणाऱ्या रसायनशास्त्राचे आकलन अधिक सहजपणे होऊ शकेल. रसायनशास्त्रावरील ज्ञानमंडळाचे हेच उद्दिष्ट आहे. विश्वकोशातील रसायनशास्त्रावरील या विभागात, रसायनशास्त्रातील विविध संज्ञा, रसायने, नियम, अभिक्रिया, प्रक्रिया, संशोधने, इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती करून देण्यात येत आहे.
इटर्बियम (Ytterbium)

इटर्बियम

इटर्बियम : मूलद्रव्य इटर्बियम हे विरल मृत्तिका गटातील एक धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Yb असून अणुक्रमांक ७० आणि ...
इट्रियम (Yttrium)

इट्रियम

इट्रियम मूलद्रव्य इट्रियम हे गट ३ मधील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Y अशी आहे. याचा अणुक्रमांक ...
इंडियम (Indium)

इंडियम

इंडियम मूलद्रव्य इंडियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट ३ अ  मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा In अशी असून ...
इरिडियम (Iridium)

इरिडियम

इरिडियम : मूलद्रव्य इरिडियम हे आवर्त सारणीतील गट ८ ब मधील घनरूप मूलद्रव्य आहे. इरिडियमची रासायनिक संज्ञा Ir अशी असून ...
एथिल क्लोराइड (Ethyl chloride)

एथिल क्लोराइड

एथिल क्लोराइड : संरचना सूत्र एथिल क्लोराइडचे IUPAC नाव क्लोरोइथेन व रेणवीय सूत्र C2H5Cl आहे. गुणधर्म : एथिल क्लोराइड हा ...
ऑक्टेन निर्देशांक (Octane number)

ऑक्टेन निर्देशांक

पेट्रोलची ही इंधनी आघात क्षमता (Knocking ability) ऑक्टेन निर्देशांकाने मोजली जाते. ऑक्टेन निर्देशांक जितका अधिक, तितकी इंधनाची ज्वलनक्षमता चांगली असते ...
ओझोन (Ozone)

ओझोन

ओझोन किंवा ट्रायऑक्सिजन हे O3 रेणुसूत्र असलेले ऑक्सिजनचे एक प्रारूप (allotrope) आहे. याच्या एक रेणूत ऑक्सिजनचे तीन रेणू असून त्याची ...
ओतनबिंदू (Pour point)

ओतनबिंदू

ज्या तापमानाला द्रव पदार्थ घन स्थितीत रूपांतरित होतो आणि त्याची वाहून जाण्याची क्षमता लोप पावते, त्या तापमानाला त्या द्रव्याचा ओतनबिंदू ...
कार्बन टेट्राक्लोराइड (Carbon tetrachloride)

कार्बन टेट्राक्लोराइड

कार्बन टेट्राक्लोराइड : संरचनासूत्र कार्बन टेट्राक्लोराइड हे कार्बनी संयुग असून याचे रासायनिक सूत्र CCl4 आहे. या संयुगाचे IUPAC मान्यताप्राप्त नाव ...
कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide)

कार्बन डायऑक्साइड

संरचना सूत्र आढळ : कार्बन डायऑक्साइड हे कार्बनचे असेंद्रिय संयुग आहे. वातावरणातील हवेत कार्बन डायऑक्साइड मुक्त स्वरूपात आढळतो आणि त्याचे ...
कृष्ण इंधने (Black fuels)

कृष्ण इंधने

पेट्रोलियम खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन होताना सहसा न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर होतो. अर्थात हा अवशिष्ट ...
कॅलिफोर्नियम (Californium)

कॅलिफोर्नियम

कॅलिफोर्नियम मूलद्रव्य कॅलिफोर्नियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील मानवनिर्मित घनरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक ९८ असून अणुभार २५१ इतका ...
केरोसीन (Kerosene)

केरोसीन

अनेक खेड्यापाड्यांत दिवाबत्तीसाठी आणि स्वयंपाक शिजवणाऱ्या स्टोव्हसाठी वापर होतो. यामध्ये इंधन म्हणून केरोसीन वापरले जाते. या इंधंनाला आपल्या देशात ‘गरिबाचे ...
कैगा अणुऊर्जा प्रकल्प (Kaiga Generating Station)‍

कैगा अणुऊर्जा प्रकल्प

कैगा अणुऊर्जा प्रकल्प हा कैगा विद्युतनिर्मिती प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा विद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यातील उत्तरा कन्नड या जिल्ह्यात स्थित ...
क्रियाशील गट (Functional group)

क्रियाशील गट

क्रियाशील गट ही कार्बनी रसायनशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना आहे. लाखो कार्बनी संयुगांच्या गुणधर्मांत सुसूत्रीकरण आणण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग होतो.  किंबहुना ...
क्रेसॉल (Cresol)

क्रेसॉल

मिथिल उपस्थापित फिनॉल संयुगांना क्रेसॉल (C7H8O) असे म्हणतात. ही फिनॉल या गटातील संयुगे आहेत. क्रेसॉलचे ऑर्थो-, मेटा- आणि पॅरा- असे ...
खनिज तेल रसायने (Petrochemicals)

खनिज तेल रसायने

खनिज तेल विविध हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असते. ही रसायने ऊर्ध्वपातन पध्दतीने वेगळी केली जातात. खनिज तेलातील  एक किंवा दोन कार्बनच्या ...
ग्रीज (Grease)

ग्रीज

ग्रीज हे अर्धघन रूपातील वंगण होय. स्थिर यंत्रसामग्री आणि फिरत्या यंत्रभागाचे गंजण्यापासून रक्षण व्हावे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीज वापरावे लागते ...
ग्लाउबर क्षार (Glauber’s salt)

ग्लाउबर क्षार

सोडियम सल्फेट डेकाहायड्रेट या रंगहीन सजल-स्फटिकरूपी संयुगासाठी ग्लाउबर क्षार ही संज्ञा वापरली जाते. याचे रासायनिक सूत्र Na2SO4. १० H2O असे ...
घन वंगणे (Solid lubricants)

घन वंगणे

ज्या ठिकाणी द्रव अगर अर्धद्रव वंगणे वापरणे शक्य नसते अगर सोयीचे नसते अशा ठिकाणी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. ही ...