(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
आजच्या आधुनिक विज्ञानात रसायनशास्त्राच्या विविध शाखा कार्यरत आहेत. या प्रत्येक शाखेचे महत्त्व हे वेगळे आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या निर्मितीपासून ते वैद्यकीय क्षेत्रातील औषधनिर्मितीपर्यंतची विविध क्षेत्रे ही रसायनशास्त्राच्या पायावर उभी आहेत. यात सेंद्रिय रसायनशास्त्र, असेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, तसेच भौतिक रसायनशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र अशा रसायनशास्त्रांच्या विविध शाखांचा वापर केला जातो. रसायनशास्त्राच्या या मूळ शाखांव्यतिरिक्त
धातुशास्त्र, बहुवारिकशास्त्र, पदार्थशास्त्र, जनुकशास्त्र, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र, अणुशास्त्र अशा इतर अनेक शाखांचाही रसायनशास्त्र हा एक अविभाज्य घटक आहे. इतकेच कशाला, तर आपल्या शरीरात वा निसर्गातील इतर सजीवांत चाललेल्या विविध क्रिया या रसायनशास्त्रामुळेच शक्य झाल्या आहेत.
रसायनशास्त्र हे प्रत्येक पदार्थाची जडण-घडण तपासते. तसेच एखाद्या पदार्थाची दुसऱ्या
पदार्थाबरोबर कशी आंतरक्रिया होते याचाही पाठपुरावा करते. त्यामुळे विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या
जडण-घडणीशी आणि त्याच्या गुणधर्माशी रसायनशास्त्राचा संबंध येतो. निसर्गात उपलब्ध असलेल्या
पदार्थांपासून मानवाला उपयुक्त ठरणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीसंबंधीचा अभ्यास हा
रसायनशास्त्राचाचा भाग आहे. एखाद्या वस्तूच्या गुणधर्मात बदल करून त्याची सुधारित आवृत्ती निर्माण करणे किंवा विशिष्ट कारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एखाद्या पदार्थाची नवनिर्मिती करणे, हीसुद्धा रसायनशास्त्राचीच कार्यक्षेत्रे आहेत. रसायनशास्त्राचा या बहुविध उपयोगांमुळे, रसायनशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन हे विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचीही अत्यावश्यक गरज बनले आहे. याच कारणास्तव रसायनशास्त्राची विलक्षण वेगाने सर्वांगीण प्रगती होत आहे. या प्रगतीची माहिती होण्यासाठी, रसायनशास्त्राची वेगेवगळ्या अंगांनी ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्यांना ही ओळख मराठीतून करून दिल्यास, जनसामान्यांना मानवी जीवनाशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष निगडित असणाऱ्या रसायनशास्त्राचे आकलन अधिक सहजपणे होऊ शकेल. रसायनशास्त्रावरील ज्ञानमंडळाचे हेच उद्दिष्ट आहे. विश्वकोशातील रसायनशास्त्रावरील या विभागात, रसायनशास्त्रातील विविध संज्ञा, रसायने, नियम, अभिक्रिया, प्रक्रिया, संशोधने, इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती करून देण्यात येत आहे.
नायट्रोबेंझीन (Nitrobenzene)

नायट्रोबेंझीन

नायट्रोबेंझीन : संरचना सूत्र नायट्रोबेंझीन हे पिवळट रंगाचे, तेलकट द्रव आहे. याला ऑइल ऑफ मिरबेन असेही म्हणतात. हे संयुग बेंझीनपासून ...
नायट्रोसेल्युलोज (Nitrocellulose)

नायट्रोसेल्युलोज

नायट्रोसेल्युलोज : रेणवीय पुनरावर्ती एकक नायट्रोसेल्युलोज किंवा सेल्युलोज नायट्रेट हे बहुवारिक, सेल्युलोज या निसर्गनिर्मित बहुवारिकापासून तयार करता येते. हे बहुवारिक ...
निकोटीन (Nicotine)

निकोटीन

निकोटीन हे अल्कलॉइड गटातील एक विषारी संयुग आहे. तंबाखू या वनस्पतीमधील (निकोटियाना टोबॅकमNicotiana tobacum) हे मुख्य अल्कलॉइड असून तंबाखूचे ...
नॅप्था (Naphtha)

नॅप्था

नॅप्था पेट्रोलियम खनिज तेलातून मिळणाऱ्या विशिष्ट द्रावणात नॅप्थाचा समावेश होतो. या द्रावणात पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन रसायने असतात. गुणधर्म ...
नॅप्थॅलीन (Naphthalene)

नॅप्थॅलीन

नॅप्थॅलीन नॅप्थॅलीन (C10H8) हे सफेद रंगाचे, स्फटिकरूप, विशिष्ट वास असलेले संयुग आहे. कपाटात कपडे व पुस्तके पतंग, कीटक यांपासून वाचवण्यासाठी ...
पारा (Mercury)

पारा

पारा : मूलद्रव्य सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असणारा पारा हा एकमेव धातू आहे. जस्त-कॅडमियम मालेतील या मूलद्रव्याला किंचित निळसर झाक असून ...
पारा विषाक्तता (Mercury poisoning)

पारा विषाक्तता

मानवाच्या आहारामध्ये पाऱ्याचे अत्यल्प प्रमाण असलेल्या वनस्पती, प्राणी व मासे यांचा समावेश अनिवार्यपणे होत आलेला आहे. तथापि कोळसा व खनिज ...
पेट्रोल (Petrol)

पेट्रोल

पेट्रोल हे गॅसोलीन, मोटर स्पिरीट, गॅस (अमेरिका), बेंझाइन (फ्रान्‍स) या नावाने देखील ओळखले जाते. निर्मिती : निष्कर्षित खनिज तेलाचे आंशिक ऊर्ध्वपातन ...
पेट्रोलियम पदार्थांची वर्गवारी (Classification of Petroleum products)

पेट्रोलियम पदार्थांची वर्गवारी

एखादा पदार्थ तापविला असता घन पदार्थाचे द्रवात रूपांतर होते आणि द्रव पदार्थ वाफेत रूपांतरित होतो. ही वाफ हवेच्या म्हणजेच ऑक्सिजनच्या ...
पोलोनियम (Polonium)

पोलोनियम

पोलोनियम मूलद्रव्य पोलोनियम हे आधुनिक आवर्तसारणीमधील गट ६ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Po अशी असून अणुक्रमांक ...
फेरशुध्दिकरण (Re-refining)

फेरशुध्दिकरण

वाहनाच्या एंजिनात किंवा कारखान्यातील यंत्रात वापरले जाणारे वंगण तेल हे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने तसेच पाणी, धूळ, वंगण तेलाच्या विघटनाने ...
फ्यूमेरिक अम्ल (Fumaric acid)

फ्यूमेरिक अम्ल

फ्यूमेरिक अम्ल भौतिक व रासायनिक गुणधर्म :  रासायनिक सूत्र C4H4O4 ; रेणुभार  ११६.०७२ ग्रॅ./मोल; वितळबिंदू २८७० से. ५४९० फॅ. (बंद ...
बिस्मथ (Bismuth)

बिस्मथ

बिस्मथ स्फटिक बिस्मथ हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट १५  मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Bi अशी असून अणुक्रमांक ...
बेरिलियम  संयुगे (Beryllium compounds)

बेरिलियम संयुगे

बेरिलियम या मूलद्रव्याची काही महत्त्वाची संयुगे पुढीलप्रमाणे : (अ) बेरिलियम ऑक्साइड : (BeO). निर्मिती : बेरिलियम हायड्रॉक्साइड ५००० से. ला ...
बेरिलियम (Beryllium)

बेरिलियम

बेरिलियम मूलद्रव्य बेरिलियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट २ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Be अशी असून ...
मॅग्नेशियम : संयुगे (Magnesium compounds)

मॅग्नेशियम : संयुगे

मॅग्नेशियमाची सर्व संयुगे द्विसंयुजी आहेत आणि ती विपुल प्रमाणात आढळतात. मॅग्नेशियम कार्बोनेट : (MgCO3). निसर्गात मुख्यतः मॅग्नेपसाइटाच्या स्वरूपात तसेच डोलोमाइड ...
मॅग्नेशियम (Magnesium)

मॅग्नेशियम

मॅग्नेशियम मूलद्रव्य मॅग्नेशियम हे आधुनिक आवर्त सारणीतील गट २ मधील धातुरूप मूलद्रव्य असून याचे रासायनिक चिन्ह Mg असे आहे. मॅग्नेशियमचा ...
मोरचूद (Blue vitriol)

मोरचूद

सजल आणि निर्जल मोरचूद मोरचूद हे तांब्याचे महत्त्वाचे संयुग असून याचे रासायनिक सूत्र CuSO4. ५ H2O असे आहे. यालाच कॉपर ...
रुथेनियम (Ruthenium)

रुथेनियम

रुथेनियम मूलद्रव्य रुथेनियम हे धातुरूप मूलद्रव्य असून याची रासायनिक संज्ञा Ru असून अणुक्रमांक ४४ आणि अणुभार १०१.०७ इतका आहे. याचा ...
रुबिडियम (Rubidium)

रुबिडियम

रुबिडियम मूलद्रव्य रुबिडियम हे आवर्त सारणीच्या गट १ अ मधील धातुरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक ३७ इतका असून अणुभार ८५.४७ ...
Loading...