(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
आजच्या आधुनिक विज्ञानात रसायनशास्त्राच्या विविध शाखा कार्यरत आहेत. या प्रत्येक शाखेचे महत्त्व हे वेगळे आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या निर्मितीपासून ते वैद्यकीय क्षेत्रातील औषधनिर्मितीपर्यंतची विविध क्षेत्रे ही रसायनशास्त्राच्या पायावर उभी आहेत. यात सेंद्रिय रसायनशास्त्र, असेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, तसेच भौतिक रसायनशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र अशा रसायनशास्त्रांच्या विविध शाखांचा वापर केला जातो. रसायनशास्त्राच्या या मूळ शाखांव्यतिरिक्त
धातुशास्त्र, बहुवारिकशास्त्र, पदार्थशास्त्र, जनुकशास्त्र, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र, अणुशास्त्र अशा इतर अनेक शाखांचाही रसायनशास्त्र हा एक अविभाज्य घटक आहे. इतकेच कशाला, तर आपल्या शरीरात वा निसर्गातील इतर सजीवांत चाललेल्या विविध क्रिया या रसायनशास्त्रामुळेच शक्य झाल्या आहेत.
रसायनशास्त्र हे प्रत्येक पदार्थाची जडण-घडण तपासते. तसेच एखाद्या पदार्थाची दुसऱ्या
पदार्थाबरोबर कशी आंतरक्रिया होते याचाही पाठपुरावा करते. त्यामुळे विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या
जडण-घडणीशी आणि त्याच्या गुणधर्माशी रसायनशास्त्राचा संबंध येतो. निसर्गात उपलब्ध असलेल्या
पदार्थांपासून मानवाला उपयुक्त ठरणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीसंबंधीचा अभ्यास हा
रसायनशास्त्राचाचा भाग आहे. एखाद्या वस्तूच्या गुणधर्मात बदल करून त्याची सुधारित आवृत्ती निर्माण करणे किंवा विशिष्ट कारणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एखाद्या पदार्थाची नवनिर्मिती करणे, हीसुद्धा रसायनशास्त्राचीच कार्यक्षेत्रे आहेत. रसायनशास्त्राचा या बहुविध उपयोगांमुळे, रसायनशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन हे विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचीही अत्यावश्यक गरज बनले आहे. याच कारणास्तव रसायनशास्त्राची विलक्षण वेगाने सर्वांगीण प्रगती होत आहे. या प्रगतीची माहिती होण्यासाठी, रसायनशास्त्राची वेगेवगळ्या अंगांनी ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरते. सर्वसामान्यांना ही ओळख मराठीतून करून दिल्यास, जनसामान्यांना मानवी जीवनाशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष निगडित असणाऱ्या रसायनशास्त्राचे आकलन अधिक सहजपणे होऊ शकेल. रसायनशास्त्रावरील ज्ञानमंडळाचे हेच उद्दिष्ट आहे. विश्वकोशातील रसायनशास्त्रावरील या विभागात, रसायनशास्त्रातील विविध संज्ञा, रसायने, नियम, अभिक्रिया, प्रक्रिया, संशोधने, इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती करून देण्यात येत आहे.
लॅक्टिक अम्ल (Lactic acid)

लॅक्टिक अम्ल

लॅक्टिक अम्ल हे सेंद्रिय अम्ल आहे. याचे रेणवीय सूत्र C3H6O3 असे असून आययूपीएसी (IUPAC) नाव २- हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक अम्ल असे ...
वंगण तेल वर्गीकरण (Classification of lubricants)

वंगण तेल वर्गीकरण

वंगण तेलांचे प्रामुख्याने दोन वर्ग आहेत : (१) वाहतुकीच्या वाहनांसाठी वापरली जाणारी मोटर तेले  आणि (२) औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रसामग्रीसाठी वापरली ...
वंगण तेले : रासायनिक पुरके (chemical additives)

वंगण तेले : रासायनिक पुरके

खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे शुध्दिकरण केले जात असताना कमी तापमानाला उत्कलन होणारे वायू, इंधने, द्रावणे आणि अन्य रसायने बाहेर पडतात ...
वंगणशास्त्र (Tribology)

वंगणशास्त्र

ट्रायबोलॉजी ही विज्ञानातील शाखा घर्षणाशी निगडित आहे. याला वंगणशास्त्र असे म्हणता येईल. ट्रायबोज या ग्रीक शब्दाचा अर्थ घासणे किंवा घासणारे ...
वैमानिकी टर्बाइन इंधन, एटीएफ (Aviation turbine fuel, ATF)

वैमानिकी टर्बाइन इंधन, एटीएफ

वैमानिकी टर्बाइन इंधन हे विमानामध्ये वापरले जाणारे अतिशुध्द स्वरूपाचे केरोसीन होय. दोन ठिकाणांमधील अंतर अधिक असल्यास प्रवासाकरिता विमानाचा वापर केला ...
व्हिट्रिऑल (Vitriol)

व्हिट्रिऑल

व्हिट्रिऑल ही रासायनिक संयुगांच्या केवळ एका विशिष्ट गटासाठी वापरली जाणारी सामायिक संज्ञा आहे. या गटात सजल सल्फेटे (Hydrated sulphates) यांचा ...
व्हॅनिलीन (Vanillin)

व्हॅनिलीन

व्हॅनिलीन  हा मूलत: वनस्पतिजन्य पदार्थ आहे. व्हॅनिला प्लॅनिफोलिया  वनस्पतीच्या ऑर्किडपासून व्हॅनिलाची निर्मिती होते. या वनस्पतीच्या शेंगा असतात. त्यातील  अर्कामध्ये  व्हॅनिलासह अनेक इतर ...
व्हॅनेडियम (Vanadium)

व्हॅनेडियम

व्हॅनेडियम मूलद्रव्य व्हॅनेडियम हे गट ५ ब मधील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २३ असून अणभार ५०.९४२ इतका ...
व्ह्यूर्त्स अभिक्रिया (Wurtz reaction)

व्ह्यूर्त्स अभिक्रिया

अल्किल हॅलाइडाची डायएथिल ईथरच्या द्रावणामध्ये सोडियमाशी अभिक्रिया होऊन अल्केन तयार होतो, या अभिक्रियेला व्ह्यूर्त्स अभिक्रिया (वर्ट्झ विक्रिया) असे म्हणतात.‍ ही ...
शुष्क बर्फ (Dry ice)

शुष्क बर्फ

घन स्वरूपातील कार्बन डाय-ऑक्साइडाला शुष्क बर्फ (dry ice) असे म्हणतात. आ. १. शुष्क बर्फ. इतिहास : सन १८३५ मध्ये फ्रेंच ...
सायट्रिक अम्ल (Citric acid)

सायट्रिक अम्ल

सायट्रिक अम्ल : रचनासूत्र सायट्रिक अम्लाचे रेणुसूत्र C6H6O8 असे आहे. याचा रेणुभार १९२.१ ग्रॅ/मोल इतका आहे. याचे IUPAC  नाव  ३-कार्बॉक्सी-३-हायड्रॉक्सी-१,५-पेंटेनडायोइक ...
सिटेन निर्देशांक (Cetane number)

सिटेन निर्देशांक

एंजिनात डीझेल या इंधनाचे ज्वलन होण्यास जो विलंब लागतो तो मोजण्यासाठी सिटेन क्रमांक उपयोगी ठरतो. तो मोजण्यासाठी सामायिक इंधन संशोधक ...
सिलिनियम (Selenium)

सिलिनियम

सिलिनियम मूलद्रव्य : बहुरूपता सिलिनियम हे गट ६ अ मधील धात्वाभ (धातुसदृश) मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक ३४ असून अणुभार ७८.९६ आहे ...
सीएनजी (CNG)

सीएनजी

सीएनजी (CNG) हे एक वायुरूप इंधन असून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed natural gas) याचे हे संक्षिप्त रूप आहे. मराठीत याला ...
सुझूकी संयुग्मीकरण विक्रिया (Suzuki coupling reaction)

सुझूकी संयुग्मीकरण विक्रिया

कार्बनी संश्लेषणातील पॅलॅडियम उत्प्रेरकाद्वारे (Catalyst) संकर संयुग्मीकरण (Coupling) या तंत्राचा वापर करून कार्बनाधारित जटिल रेणू निर्माण करणे शक्य झाले. या ...
सॅपोनिन (Saponin)

सॅपोनिन

सॅपोनिन एक रासायनिक संयुग आहे.  हे संयुग वनस्पतींच्या  भागातच मिळते असा समज होता परंतु ते समुद्री जीव जसे समुद्री काकडीमध्येही ...
हरितद्रव्य (Chlorophyll)

हरितद्रव्य 

वनस्पतींच्या हिरव्या पानांमध्ये तसेच हरित शैवाल आणि सायनोबॅक्टेरिया या जीवाणूंमध्येही हरितद्रव्य (Chlorophyll) हा एक महत्त्वाचा घटक आढळतो. पानांमधील पेशीत हरितकणू किंवा हरितलवक ...
हस्तस्वच्छकारी द्रव्य (Hand sanitizer)

हस्तस्वच्छकारी द्रव्य

हस्तस्वच्छकारी द्रव्य आपल्या हातावरील रोगकारक सूक्ष्मजंतू नष्ट करून हात निर्जंतुक करणाऱ्या, द्रव किंवा सहज ओतता येईल अशा जेलच्या स्वरूपात उपलब्ध ...
हाबर-बॉश विक्रिया  (Haber-Bosch process)

हाबर-बॉश विक्रिया

जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्स हाबर आणि कार्ल बॉश यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमोनिया तयार करण्याची जी औद्योगिक पद्धत विकसित केली, तिला ...
हायड्रोजन (Hydrogen)

हायड्रोजन

हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमधील अर्थ पाणी तयार करणारा असा होतो. या मूलद्रव्याचा शोध १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश या ब्रिटिश संशोधकाने ...