(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
स्थापत्य अभियांत्रिकी’ ही शाखा सर्व अभियांत्रिकी शाखांमधील मूलभूत व प्राचीन मानली जाते. अगदी आदीमानवाच्या काळापासून निवारा ही मानवाची अत्यावश्यक गरज आहे. वर्षानुवर्षे प्रगतीपथावर असलेल्या संशोधनातून स्थापत्य अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे विकसित होत आहेत. प्राचीन व सुस्थापित असूनही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात विविध स्तरांवर बदल होत आहेत.
संरचनात्मक अभियांत्रिकी (Structural Engineering), भू-तांत्रिक अभियांत्रिकी (Geotechnical Engineering), रचना/बांधकाम व्यवस्थापन (Construction Management), पर्यावरणीय व पाण्याचे स्रोत(Environmental & water resources) आणि नगररचना (Town planning)या पाच शाखांवर स्थापत्य अभियांत्रिकीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. या शाखांचेही इतर अनेक संलग्न विषयांमध्ये वर्गीकरण करता येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी या व्यावसायिक अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मुख्यत: विविध प्रकारच्या वास्तूंवर (उदा., निरनिराळ्या उंचीच्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या, बंधारे, रस्ते, धरणे, बंदरे इत्यादींवर) परिणाम करणाऱ्या घटकांचा अतिशय सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. निरनिराळ्या वास्तूंचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांचे आराखडे बनविणे हा स्थापत्य अभियांत्रिकीचा महत्त्वाचा भाग आहे. या क्रियेमध्ये भौतिक शास्त्रातील व स्थापत्य अभियांत्रिकीतील महत्त्वाची तत्त्वे व प्रणालींचा समावेश होतो. विविध वास्तूंच्या बांधणीसाठी व त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी मूलभूत संकल्पना व तत्त्वांचा अभ्यास करून महत्त्वाच्या बाबींचे सखोल आकलन करून घेणे गरजेचे ठरते. याशिवाय, या शाखेमध्ये सिंचन योजना, पाणी व्यवस्थापन, वात अभियांत्रिकी, भूकंप अभियांत्रिकी, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन इत्यादींसारख्या जीवनावश्यक विषयांचा देखील समावेश होतो.
मराठी विश्वकोशात उपलब्ध असलेल्या माहितीत आवश्यक तो सकारात्मक बदल करून जिज्ञासू वाचकांस ही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. या गरजेची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानमंडळात केला आहे. नोंदींचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार आकृत्या, चित्रे, दृक-श्राव्य चित्रपटांश यांचा वापर केला आहे. नोंदी जरी संक्षिप्त पद्धतीने सादर केल्या असल्या तरी वाचकांचे कुतुहल जागृत करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
घरगुती सांडपाणी : ग्रामीण सफाई यंत्रणा (Household Wastewater : Rural Sanitation)

घरगुती सांडपाणी : ग्रामीण सफाई यंत्रणा

शहरांमधून उपलब्ध असणार्‍या सुविधा, पुरेसा पाणीपुरवठा, वीज पुरवठा, कुशल कामगार वर्ग, सांडपाणी वाहून नेण्यासाठी नलिकांचे जाळे आणि ह्या सर्वांवर खर्च ...
घरगुती सांडपाणी : जमिनीवर शुद्धीकरण व कृत्रिम पाणथळ (Household Wastewater : Land Treatment and Constructed Wetland)

घरगुती सांडपाणी : जमिनीवर शुद्धीकरण व कृत्रिम पाणथळ

सांडपाणी शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा शोध लागून त्या प्रत्यक्षांत वापरल्या जाण्यापूर्वी ते शेतीसाठीच वापरले जात होते, त्यावेळी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा तो ...
घरगुती सांडपाणी : द्वितीय शुद्धीकरण प्रक्रिया (Household Wastewater : Second Purification Process)

घरगुती सांडपाणी : द्वितीय शुद्धीकरण प्रक्रिया

प्राणवायुजीवी शुद्धीकरणाचे आलंबित वृद्धी (suspended growth) व संलग्नवृद्धी (attached growth) असे दोन प्रकार केले जातात. आलंबित वृद्धी या प्रकारात सांडपाण्यातील ...
घरगुती सांडपाणी : नायट्रोजन व फॉस्फरसचे निष्कासन (Household Wastewater : Removal of Nitrogen and Phosphorus)

घरगुती सांडपाणी : नायट्रोजन व फॉस्फरसचे निष्कासन

घरगुती सांडपाण्यांत विविध स्रोतांमधून नायट्रोजन आणि फॉस्फरस वायू येतात. जसे वापरासाठी पुरवठा केलेल्या पाणी; सांडपाण्यातील यूरियाची पाण्याबरोबर होणारी प्रक्रिया (अमोनिया ...
घरगुती सांडपाणी : निमज्जित माध्यम शुद्धीकरण पद्धत (Household Wastewater : Submerged Media Beds)

घरगुती सांडपाणी : निमज्जित माध्यम शुद्धीकरण पद्धत

आ. १६.१. अधोगामी प्रवाह शुद्धीकरण प्रक्रिया. निमज्जित माध्यम शुद्धीकरण प्रकारच्या पद्धतीमध्ये सांडपाण्याचा माध्यमावरील प्रवाह खालून वर (upflow) किंवा वरून खाली ...
घरगुती सांडपाणी : निर्जंतुकीकरण (Household wastewater : Disinfection)

घरगुती सांडपाणी : निर्जंतुकीकरण

घरगुती सांडपाण्यामध्ये असणारे जीवजंतू वेगवेगळ्या शुद्धीकरण प्रक्रियांमुळे काही अंशी कमी होतात (कोष्टक क्र. १), पण शुद्ध केलेल्या सांडपाण्याला पर्यावरणात सोडण्यापूर्वी ...
घरगुती सांडपाणी : पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर (Household Wastewater : Recycling and Reuse)

घरगुती सांडपाणी : पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर

घरगुती सांडपाण्यामध्ये ९९.८ टक्क्यांहून अधिक पाणी असते; उरलेल्या ०.२ टक्क्यांपर्यंत दूषितके असतात. आजकाल उपलब्ध असलेल्या शुद्धीकरण प्रक्रियांमुळे ही दूषितके काढून ...
घरगुती सांडपाणी : पूतिकुंड व अवायुजीवी निस्यंदक (Household Wastewater : Septic tank and anaerobic filter)

घरगुती सांडपाणी : पूतिकुंड व अवायुजीवी निस्यंदक

पूतिकुंड (Septic tank) : अवायुजीवी पद्धतीने सांडपाण्याचे अंशतः शुद्धीकरण करण्याचा मार्ग म्हणजे पूतिकुंड. ह्याचा उपयोग स्वतंत्र घरे, लहान वस्त्या आणि ...
घरगुती सांडपाणी : प्राथमिक निवळण टाकी ( Household Wastewater : Primary Sedimentation Tank)

घरगुती सांडपाणी : प्राथमिक निवळण टाकी

प्रारंभिक शुद्धीकरणानंतर प्राथमिक निवळण टाकीमध्ये सांडपाण्यामधील गाळाच्या रूपाने खाली बसणारे सेंद्रिय आणि वालुकाकुंडामध्ये न बसलेले निरींद्रिय पदार्थ अलग होतात. ह्या ...
घरगुती सांडपाणी : प्रारंभिक शुद्धीकरण प्रक्रिया (Household Wastewater : Initial purification process)

घरगुती सांडपाणी : प्रारंभिक शुद्धीकरण प्रक्रिया

चाळणे (Screening) : सांडपाणी  शुद्धीकरण  प्रक्रियेमधील ही पहिली प्रक्रिया असून तिच्यामुळे  शुद्धीकरण  केंद्रामधील पाईपा, झडपा, पंप इत्यादींना तरंगत येणाऱ्या मोठ्या ...
घरगुती सांडपाणी : भौतिक व जैविक पद्धतींचे एकत्रीकरण (Consolidation of Physical and Biological Methods)

घरगुती सांडपाणी : भौतिक व जैविक पद्धतींचे एकत्रीकरण

आ. १५.१. पटल जैव-अभिक्रियाकारक. पटल जैव-अभिक्रियाकारक : (membrane bioreactor) : भौतिक पद्धतीमधील पटलांचा आणि जैविक पद्धतीमधील जीवाणूंचा एकत्रित उपयोग करून ...
घरगुती सांडपाणी : वायुमिश्रण (Household Wastewater : Aeration)

घरगुती सांडपाणी : वायुमिश्रण

जैविक प्राणवायुजीवी पद्धतीने सांडपाण्याचे शुद्धीकरण यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबींमधील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे प्राणवायूचा पुरवठा. प्राणवायुजीवी जीवाणूंना पुरेशा प्रमाणात ...
घरगुती सांडपाणी : शुद्धता पातळी ( Household Wastewater : Level of Purity)

घरगुती सांडपाणी : शुद्धता पातळी

घरगुती सांडपाणी कोणत्या पातळीपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या पुढील उपयोगांवरून ठरते. उदा., ते नदीत सोडावयाचे असले तर त्यामधील दूषितकांची कमाल ...
घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण (Household wastewater : Purification)

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण

ज्याप्रमाणे पाणीपुरवठा प्रकल्पाचे १) पाण्याचे साठवण, २) पाण्याचे शुद्धीकरण केंद्रापर्यंत वहन, ३) शुद्धीकरण आणि ४) वितरण हे भाग असतात, त्याचप्रमाणे ...
घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण पद्धती (Household Wastewater : Purification methods)

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण पद्धती

 शुद्धीकरणाच्या पद्धतींचे तीन गट पडतात.
  • एकक क्रिया (Unit operations) : ह्यामध्ये शुद्धीकरणासाठी फक्त भौतिक प्रक्रियांचा उपयोग केला जातो. उदा., ...
घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण व व्यवस्थापन (Household Wastewater : Purification and Management)

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण व व्यवस्थापन

घरगुती सांडपाण्याच्या शुद्धीकरण व व्यवस्थापन यंत्रणेचा आराखडा तयार करत असताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. जसे, (१) सध्याची आणि भविष्यातील ...
घरगुती सांडपाणी : शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धती (Household Wastewater : Modern Methods of Purification)

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धती

सांडपाणी शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धती ह्या भौतिकशास्त्र, औष्णिक, रासायनिक, जैविक व त्यांच्या एकत्रित जुळणीवर आधारित आहेत. (अ) भौतिक पद्धती :
    ...
घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतुंचे चयापचय आणि पचन (Household Wastewater : Metabolism and Digestion Microbes)

घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतुंचे चयापचय आणि पचन

घरगुती सांडपाण्यामधील सेंद्रिय पदार्थांचे तीन भाग म्हणजे सूक्ष्मजीवांचे अन्न होय. ते पुढीलप्रमाणे (१) पिष्टमय व शर्करायुक्त (Carbohydrates), (२) प्रथिने (Proteins) ...
घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतू व त्यांचे चयापचय (Household Wastewater : Microbes and their metabolism)

घरगुती सांडपाणी : सूक्ष्मजंतू व त्यांचे चयापचय

घरगुती सांडपाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दूषितके असतात आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग करणारे सूक्ष्मजंतूसुद्धा असतात. सांडपाण्याच्या शुद्धीकरणामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा वाटा ...
घरबांधणी आणि वास्तुरचना (House construction and Architecture)

घरबांधणी आणि वास्तुरचना

घरे बांधताना खोल्यांची मांडणी, पाण्याची सोय, सूर्यप्रकाशाचे नियोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो. यामध्ये वास्तुरचनाकार आणि ...