(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
स्थापत्य अभियांत्रिकी’ ही शाखा सर्व अभियांत्रिकी शाखांमधील मूलभूत व प्राचीन मानली जाते. अगदी आदीमानवाच्या काळापासून निवारा ही मानवाची अत्यावश्यक गरज आहे. वर्षानुवर्षे प्रगतीपथावर असलेल्या संशोधनातून स्थापत्य अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे विकसित होत आहेत. प्राचीन व सुस्थापित असूनही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात विविध स्तरांवर बदल होत आहेत.
संरचनात्मक अभियांत्रिकी (Structural Engineering), भू-तांत्रिक अभियांत्रिकी (Geotechnical Engineering), रचना/बांधकाम व्यवस्थापन (Construction Management), पर्यावरणीय व पाण्याचे स्रोत(Environmental & water resources) आणि नगररचना (Town planning)या पाच शाखांवर स्थापत्य अभियांत्रिकीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. या शाखांचेही इतर अनेक संलग्न विषयांमध्ये वर्गीकरण करता येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी या व्यावसायिक अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मुख्यत: विविध प्रकारच्या वास्तूंवर (उदा., निरनिराळ्या उंचीच्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या, बंधारे, रस्ते, धरणे, बंदरे इत्यादींवर) परिणाम करणाऱ्या घटकांचा अतिशय सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. निरनिराळ्या वास्तूंचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांचे आराखडे बनविणे हा स्थापत्य अभियांत्रिकीचा महत्त्वाचा भाग आहे. या क्रियेमध्ये भौतिक शास्त्रातील व स्थापत्य अभियांत्रिकीतील महत्त्वाची तत्त्वे व प्रणालींचा समावेश होतो. विविध वास्तूंच्या बांधणीसाठी व त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी मूलभूत संकल्पना व तत्त्वांचा अभ्यास करून महत्त्वाच्या बाबींचे सखोल आकलन करून घेणे गरजेचे ठरते. याशिवाय, या शाखेमध्ये सिंचन योजना, पाणी व्यवस्थापन, वात अभियांत्रिकी, भूकंप अभियांत्रिकी, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन इत्यादींसारख्या जीवनावश्यक विषयांचा देखील समावेश होतो.
मराठी विश्वकोशात उपलब्ध असलेल्या माहितीत आवश्यक तो सकारात्मक बदल करून जिज्ञासू वाचकांस ही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. या गरजेची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानमंडळात केला आहे. नोंदींचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार आकृत्या, चित्रे, दृक-श्राव्य चित्रपटांश यांचा वापर केला आहे. नोंदी जरी संक्षिप्त पद्धतीने सादर केल्या असल्या तरी वाचकांचे कुतुहल जागृत करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

हवाप्रदूषण व्यवस्थापन
मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा हिस्सा असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा हवाप्रदूषण ...