प्रस्तावना : वाणिज्य - व्यवस्थापन
ज्याप्रमाणे अर्थशास्त्र हे मानव समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्र म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र हेसुद्धा मानव समाजाच्या तद्वतच राष्ट्राच्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा करणे आणि व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. मराठी वाचक, अभ्यासक इत्यादींना वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक व्यवहारांची परिपूर्ण व अद्ययावत माहिती मराठी भाषेतून मिळावी याकरिता मराठी विश्वकोश मंडळाने वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या ज्ञानमंडळाची निर्मिती केली आहे.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखा आज आधुनिक व्यापार आणि अर्थव्यवस्था यांच्या आधारभूत ज्ञानशाखा आहेत. या विद्याशाखा समाजाला समकालीन व्यावहारिक समस्या, आव्हाने, प्रगतीच्या नव्या दिशा व कार्यक्रम इत्यादींबाबत सजगता आणि जाणीव निर्माण करून देतात. नवे जग भौतिक प्रगतीची आणि सर्वांगीण उन्नतीची अपेक्षा करणारे आहे. जगातील वाणिज्यविषयक घडामोडी आणि संकल्पना यांची पूर्ण माहिती सर्वांनाच ज्ञात असली पाहिजे. हे ज्ञान मनुष्याला व्यवहारचतुर व विवेकी करण्यासाठी उपयुक्त आहेच; मात्र या ज्ञानामुळे त्याला समकालीन समस्या आणि त्यांवर करावयाची उपाययोजना यांची कल्पनाही येते. विविध व्यावसायिक तंत्रे, सिद्धांत व उपाययोजना यांचा अर्थकारणावर तसेच व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांवर काय परिणाम होईल, याचे आकलन होण्याकरिता वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आजच्या आधुनिक आर्थिक जगात वावरणाऱ्या माणसाला आर्थिक आणि वाणिज्यविषयक माहितीपासून दूर राहून चालणार नाही. त्याने बहुश्रुत आणि चौकस असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती माहिती विस्फोटाच्या जगात वावरत असून तिला सतत निर्माण होणाऱ्या नवीन आणि अद्ययावत ज्ञानाची गरज जाणवत आहे. या नव्या ज्ञानमय युगात प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकवून ठेवणे व स्वत:ची प्रगती करणे हे त्याच्या ज्ञानसंपादनाच्या गतीवर अवलंबून आहे. आजच्या माहितीयुगात ज्ञानसंपादन करणे अत्यंत सुलभ झाले आहे. संगणक आणि आंतरजालकाचा कल्पक वापर करणारी व्यक्ती विविध विषयांचे ज्ञान सहज प्राप्त करू शकते.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ज्ञानमंडळात वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक पुरस्कारप्राप्त विद्वानांच्या, सिद्धांतांच्या, संज्ञा-संकल्पनांच्या, प्रसिद्ध उद्योग संस्थांच्या/संघटनांच्या आणि महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या समकालीन तसेच ऐतिहासिक घडामोडींविषयक नोंदी करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. हा ज्ञानकोश मराठी विश्वकोशाच्या रूपाने आंतरजालावर उपलब्ध होणे, ही विशेष महत्त्वाची बाब आहे; कारण आजची अभ्यासू पिढी सहज रीत्या ते हाताळणार आहे. त्यात सातत्याने नवनवीन व समकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद होणार आहे. कल्पकता, विविधता आणि समायोजित उपयुक्तता या निकषांवर वाणिज्य व व्यवस्थारपनशास्त्र या विषयाची सिद्धता मराठी वाचकांपुढे येणार आहे.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र हा विषय स्वतंत्र असून त्यामध्ये व्यवहार, बँकिंग, उद्योग, व्यापार, व्यवस्थापन, औद्योगिक आस्थापना इत्यादी उपविषयांबरोबरच तो अर्थशास्त्र या महत्त्वपूर्ण विषयालासुद्धा स्पर्श करतो. या विषयात अध्यापन, अध्ययन, संशोधन, विश्लेषण, व्यक्तिगत तद्वतच राष्ट्रीय पातळीवरील व्यावहारिक निर्णय अशा अनेक बाबींचा समावेश आहे. प्रशासक, उद्योजक, स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी, बँकर्स, पत्रकार, विमा व्यवसायिक, वित्तविश्लेषक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींना वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विषयाच्या ज्ञानाची आवश्यकता असून या ज्ञानकोशामुळे त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध होणार आहे.
रेन्सीस लायकर्ट (Rensis Likert)

रेन्सीस लायकर्ट (Rensis Likert)

रेन्सीस लायकर्ट : (५ ऑगस्ट १९०३ – ३ सप्टेंबर १९८१ ). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व सामाजिक मानसशास्त्रज्ञ. त्यांनी अभिवृत्ती मापनपद्धती विकसित ...
रॉबर्ट ओएन (Robert Owen)

रॉबर्ट ओएन (Robert Owen)

रॉबर्ट ओएन : (१४ मे १७७१ — १७ नोव्हेंबर १८५८). इंग्रज समाजवादी, समाजसुधारक व सहकाराचा प्रवर्तक. त्यांचा जन्म वेल्समधील माँगमरीशर ...
वाणिज्य (Commerce)

वाणिज्य (Commerce)

विविध उत्पादन केंद्रामध्ये निर्माण केलेल्या आणि स्थानिक गरजा भागविल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या वस्तूंचे व सेवांचे वितरण करणारी व्यवस्था. तिच्या योगे त्या ...
Close Menu
Skip to content