(प्रस्तावना) पालकसंस्था : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | विषयपालक : बाळ फोंडके | समन्वयक : एस. पी. महाजन | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
दोन किंवा अधिक स्थानांदरम्यान तारांद्वारे किंवा बिनतारी उपकरणांद्वारे ध्वनी, विद्युत् चुंबकीय अथवा प्रकाशीय तरंगांमार्फत माहिती प्रेषित करण्याच्या प्रक्रियेला ʼसंदेशवहनʼ म्हणतात. दूरसंदेशवहन हा याचा पर्यायी शब्द असला तरी अशा दोन स्थानांमधील अंतर जास्त असल्यास तो शब्द वापरणे उचित ठरते. रेडिओ, तारा, काचतंतू व इतर प्रकारच्या संदेशवहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वसामग्रीचा आराखडा (अभिकल्प) बनविणे, उभारणी करणे आणि ती कार्यान्वित करणे ही कामे संदेशवहन अभियांत्रिकीत केली जातात. उच्चदर्जाच्या समाधानकारक संदेशवहन पद्धतीचे गमक म्हणजे प्राप्त संदेश शक्यतो तंतोतंत मूळच्या संदेशाबरहुकूम असावा हे असते. संदेशवहन अभियांत्रिकीचे स्वरूप, उद्दिष्टे, तंत्रज्ञान व साधनेइत्यादीत कालानुसार सतत बदल होत असतात.

इ. स. १८३७ मधे तारायंत्राचा शोध लागला व त्याचवेळीविद्युत् संदेशवहन अभियांत्रिकीचा प्रारंभ झाला. संदेश पाठविण्याच्या पद्धतींचे मुख्यतः दोन भाग करता येतील­१. तारांच्या साहाय्याने आणि २.बिनतारीपद्धतीने (अवकाशगामी). इलेक्ट्रॉनिक युगाच्या प्रारंभानंतर संदेशवहनात क्रांती घडून आली. इलेक्ट्रॉनिकीमुळेच आधुनिक संदेशवहनातील रेडिओ, दूरचित्रवाणी, इंटरनेट, सेलफोन, व्हिडीओयांमार्फत संभाषण इत्यादी शोध लागले.

आधुनिक संदेशवहन प्रणालींची क्षमता, कार्यप्रवणता व विविधता यापूर्वीच्या संदेशवहन प्रणालींच्या तुलनेत किती तरी पटींनी जास्तआहे. संदेशवहन प्रणालीचा सैद्धांतिक विकास व संशोधन जगभरात सर्वत्र अविरतपणे सुरुआहे.मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यात गतिमान व सुलभ संदेशवहन प्रणालीचे मोलाचे योगदान आहे. संदेशवहन क्षेत्रातील प्रगती आणि नवनवीन शोधांची माहिती मराठी भाषेत सुलभ रीत्या एकत्रितपणे उपलब्ध व्हावी हे संदेशवहन अभियांत्रिकी ज्ञानमंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा

कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा

कुठल्याही घटक-वस्तूचा एखाद्या बिंदूभोवती किंवा दुसऱ्या घटक-वस्तूभोवती फिरण्याचा मार्ग म्हणजे कक्षा. सूर्य (भासमान) आणि चंद्र तसेच धूमकेतू इत्यादींच्या कक्षांचे ज्ञान ...
भारतीय कृत्रिम उपग्रह

भारतीय कृत्रिम उपग्रह

भारत सरकारची बंगळुरू येथे मुख्यालय असलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO; इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) कृत्रिम उपग्रहासंदर्भात कार्य ...
Close Menu
Skip to content