(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) च्या प्रकरण ८ च्या कलम ४४ अन्वये २००६ साली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची ...
राष्ट्रीय सामर्थ्य (National Strength)

राष्ट्रीय सामर्थ्य

राष्ट्रीय सामर्थ्य हे राष्ट्र-राज्याच्या राष्ट्रहिताचे रक्षण करू शकण्याच्या क्षमता दर्शवते. राष्ट्रीय सामर्थ्याच्या पारंपरिक व्याख्यांनी ‘सैनिकी क्षमता हा महत्त्वाचा घटक आहे’ ...
राष्ट्रीय सुरक्षा (National Security)

राष्ट्रीय सुरक्षा

राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे पायाभूत मुल्यांचे राष्ट्रीय सामर्थ्य वापरून केल्या गेलेले रक्षण होय. त्यामुळेच ती बहुआयामी असून तिचे सैन्य, राजकीय, आर्थिक, ...
राष्ट्रीय सुरक्षा धोरण (National Security Policy)

राष्ट्रीय सुरक्षा धोरण

राष्ट्रीय सुरक्षा धोरण हे राष्ट्रीय सुरक्षेची आणि त्यायोगे राष्ट्र-राज्यांच्या राष्ट्रहिताचीसुद्धा काळजी घेते. सुरक्षा प्रश्नांचा अनेकमितीय दृष्टिकोन समजावण्यासाठीच ‘संरक्षण’ धोरण आणि ...
रासायनिक युद्ध (Chemical Warfare)

रासायनिक युद्ध

प्रस्तावना : रासायनिक युद्धपद्धतीमध्ये रसायनांचा, त्यांच्या वैषिक गुणधर्माला अनुसरून, शस्त्रास्त्र म्हणून वापर केला जातो. रासायनिक शस्त्रास्त्रे अत्यंत सहज रीतीने वायू, ...
लोंगेवालाची लढाई (Battle of Longewala)

लोंगेवालाची लढाई

भारत-पाकिस्तान १९७१ च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : नोव्हेंबर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान हातातून जाणार याची जाणीव झाल्यानंतर भारताच्या पश्चिम सीमेवरील ...
वन बेल्ट वन रोड (One Belt One Road)

वन बेल्ट वन रोड

वन बेल्ट वन रोड हा २१व्या शतकातील चीनच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. व्यापार-गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मिती यांच्यामार्फत आशिया, ...
वलाँगची लढाई (Battle of Walong)

वलाँगची लढाई

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. तवांग विभागानंतर दुसऱ्याच दिवशी चिनी सैनिकांनी नेफाच्या सर्वांत पूर्वेतील लोहित विभागवरही २१ ऑक्टोबरला आक्रमण केले ...
वाळवंटी प्रदेशातील युद्धपद्धती (Desert Warfare)

वाळवंटी प्रदेशातील युद्धपद्धती

भूभागाचे वैशिष्ट्य : डावपेच (Tactics) आणि पुरवठाव्यवस्था (Logistics) या दोन्हींवर भूमितलाच्या स्वरूपाचा गहन परिणाम होतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांतील युद्धपद्धती तेथील ...
विजयसिंह शेखावत (Vijay Singh Shekhawat)

विजयसिंह शेखावत

शेखावत, विजयसिंह : (१ ऑक्टोबर १९३६). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. त्यांचा जन्म भिवानी (हरयाणा राज्य) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धरमपाल ...
वीज पडणे / कोसळणे (Lightning Strike)

वीज पडणे / कोसळणे

झाडावर पडलेली वीज वीज (विद्युत, तडित्) म्हणजे ढगांमध्ये चालू असलेल्या वादळासमवेत उत्सर्जित होणारी मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती. क्षणिक उच्च विद्युत ...
वॉटर्लूची लढाई (Battle of Waterloo)

वॉटर्लूची लढाई

आजतागायत होऊन गेलेल्या अद्वितीय सेनापतींमधील फ्रान्सचा अग्रणी सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटनचा धुरंधर सेनाप्रमुख ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि त्याचे मित्रपक्ष ...
व्हिल्हेल्म कायटल (Wilhelm Keitel)

व्हिल्हेल्म कायटल

कायटल, व्हिल्हेल्म : (२२ सप्टेंबर १८८२—१६ ऑक्टोबर १९४६). दुसर्‍या महायुद्धातील जर्मन फील्डमार्शल. १९०१ मध्ये जर्मन सैन्यात कमिशन. पहिल्या महायुद्धात तोफखान्यात कॅप्टनचा ...
व्ही. के. सिंग (V. K. Singh)

व्ही. के. सिंग

सिंग, विजयकुमार : (१० मे १९५१). भारतीय भूसेनेचे चोविसावे सेनाप्रमुख आणि पहिले प्रशिक्षित कमांडो. त्यांचा जन्म लष्कराची परंपरा असलेल्या कुटुंबात ...
शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation)

शांघाय सहकार्य संघटना

पार्श्वभूमी : चीन, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या पाच देशांच्या नेत्यांनी १९९६मध्ये ‘शांघाय–५’ या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर ...
शीतयुद्ध ‒ भाग १ (Cold War ‒ Part 1)

शीतयुद्ध ‒ भाग १

ठळक गोशवारा : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएट युनियन आणि त्यांचे मित्रगट यांच्यात झालेला संघर्ष. प्रास्ताविक : पहिले महायुद्ध (१९१४ ...
शैतान सिंग (Shaitan Singh)

शैतान सिंग

सिंग, मेजर शैतान : (१ डिसेंबर १९२४‒१८ नोव्हेंबर १९६२). भारत-चीन संघर्षातील एक पराक्रमी सेनाधिकारी आणि परमवीरचक्राचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात जोधपूर ...
सगत सिंग (Sagat Singh)

सगत सिंग

सिंग, सगत : (१४ जुलै १९१९—२६ सप्टेंबर २००१). भारतीय सैन्यातील एक अतिशय बुद्धिमान आणि साहसी सेनाधिकारी. त्यांचा जन्म राजस्थानातील चुरू ...
सतीश कुमार सरीन (Satish Kumar Sareen)

सतीश कुमार सरीन

सरीन, सतीश कुमार : (१ मार्च १९३९). भारताचे भूतपूर्व हवाई दलप्रमुख. विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवापदक आणि परमविशिष्ट सेवापदक यांचे मानकरी. जन्म ...
समुद्रगुप्त (Samudragupt)

समुद्रगुप्त

समुद्रगुप्त : (इ.स. ३२० ‒ ३९६). गुप्त वंशातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून समुद्रगुप्त ओळखला जातो. पहिला चंद्रगुप्त व त्याची लिच्छवी राणी ...