(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

पाणलोट क्षेत्र विकास (Watershed Development)

पाणलोट क्षेत्र विकास

उंच भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी वेगवेगळ्या मार्गांनी एकत्र येऊन एका प्रवाहाला मिळते आणि तेथून पुढे ते एकत्रच वाहते, त्याला पाणलोट ...
पी. बी. पाटील समिती (P. B. Patil Committee)

पी. बी. पाटील समिती

‘पंचायत राज’ संस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेली एक समिती. ही समिती महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणूनही ...
पीटर ए. डायमंड (Peter A. Diamond)

पीटर ए. डायमंड

डायमंड, पीटर ए. : (२९ एप्रिल १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, अमेरिकन सामाजिक सुरक्षा समितीचे भूतपूर्व सल्लागार व मार्गदर्शक व अर्थशास्त्राच्या नोबेल ...
पुढची मोठी झेप (Great Leap Forward)

पुढची मोठी झेप

पुढची मोठी झेप ही मोहीम चीनमध्ये माओ – त्से – तुंग यांच्या नेतृत्वाखाली १९५८ ते १९६० या कालावधीत राबविण्यात आली ...
पुनर्वापराचे अर्थशास्त्र (Economics of Recycling)

पुनर्वापराचे अर्थशास्त्र

कचऱ्यातील काही घटकांचा पुन्हा वापर करणे, यालाच पुनर्वापर असे म्हणतात. पुनर्वलन अथवा पुनर्वापर ही एक प्रक्रीया, तसेच एक क्रिया-प्रक्रियांची मालिका ...
पुनर्वित्त सेवा (Re-Finance Service)

पुनर्वित्त सेवा

देशाच्या आर्थिक विकासासाठी वित्तीय क्षेत्र विकसित असणे ही आवश्यक अट ठरते. त्यासाठी आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विकासासाठी त्याला अनुरूप असणारी ...
पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र (Supply Side Economics)

पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र

पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र हा समग्र अर्थशास्त्रातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार उत्पादनातील वाढ ही आर्थिक विकास घडवून आणते. त्यामुळे आर्थिक ...
पॅरेटोचे तत्त्व (Pareto Principle)

पॅरेटोचे तत्त्व

सामाजिक कल्याणाच्या पर्याप्तता पातळीचे उत्पादक संस्था, उत्पादन घटक आणि उपभोक्ता या दृष्टिकोणातून विवेचन करणारे तत्त्व. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विलफ्रेडो पॅरेटो यांनी ...
पेट्रोडॉलर (Petrodollar)

पेट्रोडॉलर

अमेरिकन डॉलरच्या बदल्यात तेलाची देवाणघेवाण करण्याची एक मूलभूत व्यवस्था. या व्यवस्थेत तेलाची खरेदी आणि उत्पादन व विक्री करणाऱ्या देशांमध्येच अमेरिकन ...
पॉल अलेक्झांडर बरान (Paul Alexander Baran)

पॉल अलेक्झांडर बरान

बरान, पॉल अलेक्झांडर (Baran, Paul Alexander) : (२५ ऑगस्ट १९०९ – २६ मार्च १९६४). प्रसिद्ध अमेरिकन मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ. बरान यांचा जन्म युक्रेन (रशिया) येथे झाला. त्यांचे ...
पॉल मिशेल रोमर (Pol Michael Romer)

पॉल मिशेल रोमर

रोमर, पॉल मिशेल (Romer, Pol Michael) : (६ नोव्हेंबर १९५५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मॅरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन मॅनेजमेंटचे संचालक आणि अर्थशास्त्रातील ...
पॉल रॉबिन क्रूगमन (Paul Robin Krugman)

पॉल रॉबिन क्रूगमन

क्रूगमन, पॉल रॉबिन (Krugman, Paul Robin) : (२८ फेब्रुवारी १९५३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. क्रुगमन यांना आंतरराष्ट्रीय ...
प्रकृतिवादी अर्थतज्ज्ञ (Physiocracy Economists)

प्रकृतिवादी अर्थतज्ज्ञ

विचारवंतांच्या जगात प्रकृतिवाद किंवा निसर्गवादी हे सर्वसामान्यांना फारसे परिचित नसले, तरी त्यांचे वैचारिक योगदान महत्त्वाचे आहे. विशेषत:, अर्थशास्त्राच्या विकासात त्यांचा ...
प्रति व्यापार (Counter Trade)

प्रति व्यापार

पैशांऐवजी संपूर्ण किंवा अंशतः इतर वस्तू किंवा सेवांचे विनिमय करणे. प्रति व्यापारामध्ये एखादी वस्तू खरेदी करतांना त्या वस्तूच्या मोबदल्यात पैसे ...
प्रतिरोधक शक्ती (Countervailing Power)

प्रतिरोधक शक्ती

प्रतिरोधक शक्ती म्हणजे दोन गटांच्या क्षमतांचा आपसांत समतोल साधला जाणे होय. प्रतिवाद क्षमता म्हणजे ग्राहकांच्या गटाची अशी क्षमता की, ज्यायोगे ...
प्रतिष्ठितपणाचा परिणाम (Snob Effect)

प्रतिष्ठितपणाचा परिणाम

समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की, त्यांना काही अद्वितीय (युनिक) वस्तू बाळगणे प्रतिष्ठितपणाचे वाटत असते. त्यामुळे सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात प्रचलित असणाऱ्या ...
प्रदूषण कर (Pollution Tax)

प्रदूषण कर

प्रदूषण कर ही पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे आणि त्याचा पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करणे यांसाठी आर्थिक घटकांची संरचना होय. प्रदूषण ...
प्रशाशित किंमत (Administered Price)

प्रशाशित किंमत

प्रशासित किंमत. सरकार अथवा मूळ उत्पादक यांनी ठरवून दिलेली वस्तूची किंमत म्हणजे प्रशासकीय किंमत होय. तिला अलवचीक किंमत असेही म्हणतात ...
प्रादेशिक अर्थशास्त्र (Regional Economics)

प्रादेशिक अर्थशास्त्र

स्वतंत्र रित्या विकसित झालेली अर्थशास्त्राची एक शाखा. एखाद्या प्रदेशातील आर्थिक हालचाली व त्यांचे विपणन एखादी व्यक्ती किंवा समाज यांच्यावर कसा ...
प्राधान्य समभाग (Preference Share)

प्राधान्य समभाग

विविध कंपन्यांचे भाग, ऋणपत्रे, रोखे, प्रत्ययपत्रे इत्यादींचे क्रय-विक्रय करणारे स्थान म्हणजे समभाग बाजार (शेअर मार्केट) होय. समभाग बाजाराचा विकास आणि ...