(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

दांडेकर समिती (Dandekar Committee)

दांडेकर समिती

महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलावरील उच्चस्तरीय समिती. प्रादेशिक विषमता व त्यातून निर्माण होणारे आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्न यांची विविध माध्यमांवर, व्यासपीठांवर सातत्याने ...
देयक बँक (Payment Bank)

देयक बँक

आर्थिक समावेशीकरण आणि अंकीय (डिजीटल) भारत या धोरणांचा प्रसार करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेली एक बँक. देयक बँकेद्वारे पारंपरिक व्यापारी ...
द्विपक्षीय मक्तेदारी (Bilateral Monopoly)

द्विपक्षीय मक्तेदारी

बाजारातील अशी परिस्थिती, जेथे दोन एकाधिकार संस्था म्हणजेच एकच विक्रेता आणि एकच ग्राहक एकमेकांच्या समोर खरेदी-विक्रीसाठी असतात. श्रमबाजारात जेव्हा श्रमाची ...
नव-अभिजात अर्थशास्त्र (Neo-Classical Economics)

नव-अभिजात अर्थशास्त्र

नव-अभिजात अर्थशास्त्र हा मूळ अर्थशास्त्राचे एक वेगळ्या प्रकारे विवेचन करणारा दृष्टीकोन आहे. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या तत्त्वानुसार उत्पादन आणि उत्पन्नाच्या ...
नवकेन्सीय अर्थशास्त्र (Neo-Keynesian Economics)

नवकेन्सीय अर्थशास्त्र

समष्टीय अथवा समग्रलक्ष्यी अर्थशास्त्रातील एक सैद्धांतिक प्रवाह. इ. स. १९३६ मध्ये जॉन मेनार्ड केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या समष्टीय यंत्रणेबाबत मूलभूत ...
नागरी अर्थशास्त्र (Urban Economics)

नागरी अर्थशास्त्र

नागरी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी आधुनिक शाखा आहे की, ज्यात प्रामुख्याने नागरी भागांतील आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भात अभ्यास केला जातो. आर्थिक ...
नादारी व दिवाळखोरी संहिता (Insolvency and Bankruptcy Code)

नादारी व दिवाळखोरी संहिता

नादार झालेल्या व्यवसायाला बंद करणे, पुनर्रचना करणे किंवा व्यवसायामधून निर्गमन सुलभ करून देण्यासाठीचा एक अर्थशास्त्रविषयक कायदा. एक मजबूत आणि लवचिक ...
निकोलस कॅल्डॉर (Nicholas Kaldor)

निकोलस कॅल्डॉर

कॅल्डॉर, निकोलस : (१२ मे १९०८ − ३० सप्टेंबर १९८६). प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र (Welfare Economics) या क्षेत्रांत ‘ऑस्ट्रियन-वॉलरा’ परंपरेत महत्त्वपूर्ण ...
निगमनातील अडथळे (Barrier to Exit)

निगमनातील अडथळे

पेढ्यांना (कंपनी) एखाद्या बाजारपेठेमधून किंवा औद्योगिक क्षेत्रामधून बाहेर पडण्यामध्ये येणारे अडथळे म्हणजे निगमनातील अडथळे होय. निगमन करणे म्हणजे बाहेर पडणे. ...
निरुद्योगिकीकरण (Deindustrialization)

निरुद्योगिकीकरण

अर्थव्यवस्थेतील आर्थिक व सामाजिक या कारणांमुळे औद्योगिकतेचा होणारा ऱ्हास अथवा त्यात सातत्याने होणारी घट म्हणजेच निरुद्योगिकीकरण होय. औद्योगिक क्रांतीमुळे अठराव्या ...
निर्देशांक (Index)

निर्देशांक

व्यापार आणि आर्थिक घडामोडींमध्ये होणारे बदल मोजण्याचा एक अर्थशास्त्रीय प्रकार. यास ‘इकॉनॉमिक बॅरोमिटर्स’ असेही म्हणतात. हे बदल प्रामुख्याने वस्तूंच्या किमती, ...
नी. वि. सोवनी (N. V. Sovani)

नी. वि. सोवनी

सोवनी, नी. वि. (Sovani, N. V.) : ( १७ सप्टेंबर १९१७ – ४ मार्च २००३ ). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ. सोवनी ...
नीती (National Institute For Transforming India – NITI)

नीती

भारत सरकारच्या मुख्य संस्थांपैकी एक. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०१५ रोजी पूर्वीच्या योजना आयोग ...
नैसर्गिक शेती (Natural Farming)

नैसर्गिक शेती

नैसर्गिक शेती हा एक पर्यावरणीय दृष्टिकोण आहे. शेतीच्या पद्धतीचा हा दृष्टिकोण जपानी शेतकरी व तत्त्ववेत्ता मसनोबू फुकौका यांनी त्यांचे पुस्तक ...
नॉर्थ डग्लस (North Douglass)

नॉर्थ डग्लस

डग्लस, नॉर्थ : (५ नोव्हेंबर १९२० – २३ नोव्हेंबर २०१५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. आर्थिक व संस्थात्मक ...
न्यू डील (New Deal)

न्यू डील

अमेरिकेचा अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट याने अंमलात आणलेल्या अंतर्गत कार्यक्रमाचे नाव. अध्यक्षीय निवडणुकीसाठी रूझवेल्टला उमेदवार म्हणून १९३२ मध्ये मान्यता मिळाली. तेव्हा ...
पतपत्र (Letters of Credit)

पतपत्र

आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्यातदारास आयातदाराकडून होणाऱ्या खरेदीपोटी हमी देण्यासाठी वापरण्यात येणारे एक महत्त्वाचे साधन. यास ‘कागदोपत्री पत’ (डॉक्युमेंट्री क्रेडिट) म्हणूनही ओळखले ...
परकीय चलन व्यवस्थापन कायदा - फेमा (Foreign Exchange management Act - FEMA)

परकीय चलन व्यवस्थापन कायदा – फेमा

देशाच्या विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परकीय व्यापारात सहभागी कंपन्यांमधील व्यवहार, परकीय बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील गुंतवणूक, चलनाची अदलाबदल आणि ...
पर्यावरणीय लेखापरीक्षण (Environmental Audit)

पर्यावरणीय लेखापरीक्षण

कंपनी, आस्थापना, संस्था, संघटना इत्यादींच्या कामगिरीचे पर्यावरणासंदर्भात मूल्यमापन करणे म्हणजे पर्यावरणीय लेखापरीक्षण होय. हे औद्योगिक उत्पादन व प्रक्रियांचे पर्यावरणाच्या दृष्टीने ...
पश्चानुबंधन (Backward Linkage)

पश्चानुबंधन

एका विशिष्ट गुंतवणुकीमुळे त्या उत्पादनापासून मागील अवस्थांमधील उत्पादनांना मिळणाऱ्या प्रेरणेला पश्चानुबंधन असे म्हणतात. अर्थशास्त्रीय अभ्यासात प्रामुख्याने वस्तू व सेवांचे उत्पादन, ...