(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
विद्युत व चुंबकत्व या प्रेरणांच्या व्यावहारिक उपयोगांशी निगडित असलेली अभियांत्रिकीची शाखा म्हणजे विद्युत अभियांत्रिकी होय. एखाद्या देशाची औद्योगिक व आर्थिक प्रगती तेथील दरडोई विजेच्या खपावरून मोजली जाते. परिणामी ही अभियांत्रिकीची एक सर्वांत महत्त्वाची शाखा झाली आहे.

वीज ही ऊर्जा दूर अंतरावर व मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. ती बहुधा रूपांतरित करून वापरील जाते. विद्युत उर्जेचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरण (उदा., पिठाची गिरणी, विजेचा पंखा यांसारखी यंत्रोपकरणे फिरवणे), विद्युत उर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतरण (उदा., पाणी तापविणे, अन्न प्रक्रिया इ.), विद्युत उर्जेचे प्रकाशामध्ये रूपांतरण (उदा., विद्युत दिवे इ.); तसेच या क्रियांशी निगडित संयंत्रे, यंत्रे, उपकरणे (उदा., विद्युत्‌ चालित्र, विद्युत जनित्र इ.) यांचा सैद्धांतिक अभ्यास करून त्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे; ती तयार करणे व त्यांचे कार्य चालू ठेवणे, त्यांचे नियमन करणे, देखभाल ठेवणे व दुरूस्ती करणे इ. गोष्टींचा या शाखेत अभ्यास केला जातो.

विद्युत उर्जेचीनिर्मिती, मापनपद्धती, वितरणपद्धती; विजेचे उपयोग, तिचे नियमन आणि नियंत्रण; विजेपासून संरक्षण याचाही या शाखेत अंतर्भाव होतो. विद्युत अभियांत्रिकी विषयासंदर्भात तांत्रिक माहिती गणितीय समीकरणाची क्ल‍िष्टता टाळून उपलब्ध करण्याचा प्रयत्न सदर ज्ञानमंडळात केलेला आहे. या शाखेचा विस्तार पाहता वाचकांच्या सोयीकरिता माहितीचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे :
१. मूलभूत विद्युत अभियांत्रिकी
२. विद्युत मंडल, जालक, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र
३. विद्युत यंत्र
४. विद्युत मापनपद्धती
५. विद्युत ऊर्जा निर्मिती
६. विद्युत प्रेषण
७. विद्युत ऊर्जा वितरण आणि संरक्षण
८. शक्ती इलेक्ट्रॉनिकी आणि प्रचोदन/चालन
९. नियंत्रण यंत्रणा
१०. विद्युत अधिष्ठापन आणि संकीर्ण

कॅथोड किरण दोलनदर्शक (Cathode Ray Oscilloscope)

कॅथोड किरण दोलनदर्शक

आ.१. कॅथोड किरण दोलनदर्शक ठोकळाकृती : (१) उभा आवर्धक (vertical amplifier), (२) विलंब रेख (delay line), (३) आदेश अनुवर्ती मंडल ...
खंडकारी (Chopper/ DC-DC Converter)

खंडकारी

एकदिशादर्शकाचे चल एकदिशादर्शकामध्ये (DC to DC converter) रूपांतर करणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक उपकरणे एकदिशादर्शक विद्युत दाबावर (DC ...
गतिजमापी शक्तिगुणक मापक  (Dynamometer Power Factor Meter)

गतिजमापी शक्तिगुणक मापक

शक्तिगुणक मापक हे उपकरण एककला (Single phase) आणि त्रिकला (Three phase) प्रत्यावर्ती धारा विद्युत मंडलातील शक्तिगुणकाचे मापन करण्यासाठी वापरले जाते ...
गेट टर्न-ऑफ थायरिस्टर  (Gate turn-off thyristor, GTO)

गेट टर्न-ऑफ थायरिस्टर

गेट टर्न-ऑफ थायरिस्टरचे कार्य हे सिलिकॉन नियंत्रित एकदिशकारकाच्या (Silicon controlled rectifier, SCR) कार्यासारखेच आहे. गेट टर्न-ऑफ थायरिस्टर हे धन गेट ...
ग्रिड प्रचालन (Grid Operation)

ग्रिड प्रचालन

दिवसभरात विजेची मागणी ही सतत बदलत असते. तसेच आठवड्यातील सुट्टीचा दिवस, वर्षभरातील  निरनिराळे सण / ऋतू व त्यामुळे होणाऱ्या वातावरणातील ...
घरगुती विद्युत भट्टी आणि जलतापक उपकरणे (Toaster and Domestic water heater)

घरगुती विद्युत भट्टी आणि जलतापक उपकरणे

आज विद्युत शक्तीवर चालणारी अनेक उपकरणे घराघरात दिसून येतात. यांतील काही उपकरणे पाणी गरम करण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी वापरली जातात, ...
चल लोह शक्तिगुणक मापक (Moving Iron Power Factor Meter)

चल लोह शक्तिगुणक मापक

शक्तिगुणक मापक हे उपकरण एककला (Single phase) आणि त्रिकला (Three phase) प्रत्यावर्ती धारा विद्युत मंडलातील शक्तिगुणकाचे मापन करण्यासाठी वापरले जाते ...
चलित्र नियंत्रण केंद्र (Motor Control Centre, MCC)

चलित्र नियंत्रण केंद्र

वीज वितरण प्रणालीमध्ये चलित्र नियंत्रण केंद्राची भूमिका : चलित्र नियंत्रण केंद्र हे कारखान्यातील एका विभागातील चलित्र आरंभीचा (Combination Starters) भौतिक ...
जलविद्युत केंद्र (Hydroelectric power station)

जलविद्युत केंद्र

जलविद्युत केंद्रामध्ये उंचीवर साठविलेल्या पाण्याच्या स्थितिज ऊर्जेचा वापर वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. जल वीजनिर्मिती केंद्र हे सामान्यपणे जेथे धरण बांधले ...
त्रि-प्रावस्था परिवर्तक (3-Phase Inverter)

त्रि-प्रावस्था परिवर्तक

विद्युत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे नियमन (Control) व रूपांतर(conversion) केले जाते. एकदिश प्रवाहाला (DC) प्रत्यावर्ती प्रवाहामध्ये (AC) रूपांतर  करण्यासाठी परिवर्तकाचा ...
त्रिस्तरीय अंतर अभिचलित्र संरक्षण (Three Stepped Distance Protection)

त्रिस्तरीय अंतर अभिचलित्र संरक्षण

पारेषण वाहिनीचे विद्युत दोषांपासून संरक्षण करण्यासाठी अंतर अभिचलित्र वापरले जाते, अंतर अभिचलित्र कमी दाब व कमी प्रवाहावर काम करते (उदा., ...
थेवेनिनचा सिद्धांत, नॉर्टनचा सिद्धांत आणि सर्वोच्च शक्तिहस्तांतर सिद्धांत (Thevenin theorem, Norton theorem and Maximum Power Transfer Theorem)

थेवेनिनचा सिद्धांत, नॉर्टनचा सिद्धांत आणि सर्वोच्च शक्तिहस्तांतर सिद्धांत

विद्युत जालक सिध्दांत : विद्युत रोधक, धारित्रे, वेटोळे (कुंडल) व ऊर्जा उद्गम यांसारख्या घटकांची जोडणी करून बनविलेल्या परस्परांशी निगडित अशा ...
दुहेरी शोध दोलनदर्शक (Dual trace oscilloscope)

दुहेरी शोध दोलनदर्शक

आ. १. दुहेरी शोध दोलनदर्शक इलेक्ट्रॉनिक मंडल (circuit) आणि  प्रणालीच्या अभ्यासात्मक विश्लेषणामध्ये दोन किंवा अधिक विद्युत दाबांची तुलना ही अतिशय ...
दूरमुद्रक (Teleprinter)

दूरमुद्रक

आ. १. दूरमुद्रक : दूरध्वनी, टंकलेखन यंत्र व मुद्रण यंत्र यांची जोडणी. दूरध्वनी केबलीद्वारे अथवा रेडिओ अभिचालित पध्दतीने (Radio relay ...
धातू आवेष्टित मध्यम दाबाकरिता अंतर्गेही स्विचगिअर – भाग - १ (Metal Enclosed Medium Voltage Indoor Switchgear, Part - 1)

धातू आवेष्टित मध्यम दाबाकरिता अंतर्गेही स्विचगिअर – भाग – १

उत्पादन केंद्रापासून प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणी विद्युत शक्ती तीन टप्प्यात वहन केली जाते. प्रथम उच्च व अतिउच्च दाबाने लांब पल्ल्यासाठी तिचे ...
धातू आवेष्टित मध्यम दाबाकरिता अंतर्गेही स्विचगिअर : भाग - २ (Metal Enclosed Medium Voltage Indoor Switchgear, Part – 2)

धातू आवेष्टित मध्यम दाबाकरिता अंतर्गेही स्विचगिअर : भाग – २

धातू आवेष्टित मध्यम दाबाकरीता अंतर्गेही स्विचगिअरचे कार्य, प्रकार, रचना इत्यादी मूलभूत माहिती भाग – १ विस्तारित केली आहे. या भागात ...
नियंत्रण प्रणाली (Control Systems)

नियंत्रण प्रणाली

नियंत्रण प्रणाली म्हणजे इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी यंत्र अथवा उपकरण यांच्या वर्तनाचे किंवा कार्याचे व्यवस्थापन, मार्गदर्शन व नियमन करणारी व्यवस्था ...
निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर  (Insulated-gate bipolar transistor, IGBT)

निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर

निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर (IGBT) हे प्रबल अर्धसंवाहक साधन (Power semiconductor device)  आहे. आ. १. निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर : ...
निर्बाध वीजपुरवठा (UPS, Uninterruptible Power Supply)

निर्बाध वीजपुरवठा

आ. १. यूपीएस विविध ठिकाणी (उदा., दवाखान्यात वेगवेगळ्या उपचारासाठी, रासायनिक उद्योगधंदे)  अशा ठिकाणी आपल्याला सतत ऊर्जेची गरज भासत असते. अशा ...
पारेषण : प्रत्यावर्ती प्रवाह किंवा एकदिश प्रवाह  — तंत्र-आर्थिक अवलोकन (Transmission : AC or DC)

पारेषण : प्रत्यावर्ती प्रवाह किंवा एकदिश प्रवाह — तंत्र-आर्थिक अवलोकन

एडिसन हे एकदिश प्रवाह (एप्र – Direct Current) प्रणालीचे तर टेस्ला हे प्रत्यावर्ती प्रवाहाचे (प्रप्र – Alternating Current) पुरस्कर्ते होते ...