(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : प्रीती म. साळुंके
विद्युत व चुंबकत्व या प्रेरणांच्या व्यावहारिक उपयोगांशी निगडित असलेली अभियांत्रिकीची शाखा म्हणजे विद्युत अभियांत्रिकी होय. एखाद्या देशाची औद्योगिक व आर्थिक प्रगती तेथील दरडोई विजेच्या खपावरून मोजली जाते. परिणामी ही अभियांत्रिकीची एक सर्वांत महत्त्वाची शाखा झाली आहे.

वीज ही ऊर्जा दूर अंतरावर व मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याच्या दृष्टीने सोयीची आहे. ती बहुधा रूपांतरित करून वापरील जाते. विद्युत उर्जेचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतरण (उदा., पिठाची गिरणी, विजेचा पंखा यांसारखी यंत्रोपकरणे फिरवणे), विद्युत उर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतरण (उदा., पाणी तापविणे, अन्न प्रक्रिया इ.), विद्युत उर्जेचे प्रकाशामध्ये रूपांतरण (उदा., विद्युत दिवे इ.); तसेच या क्रियांशी निगडित संयंत्रे, यंत्रे, उपकरणे (उदा., विद्युत्‌ चालित्र, विद्युत जनित्र इ.) यांचा सैद्धांतिक अभ्यास करून त्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे; ती तयार करणे व त्यांचे कार्य चालू ठेवणे, त्यांचे नियमन करणे, देखभाल ठेवणे व दुरूस्ती करणे इ. गोष्टींचा या शाखेत अभ्यास केला जातो.

विद्युत उर्जेचीनिर्मिती, मापनपद्धती, वितरणपद्धती; विजेचे उपयोग, तिचे नियमन आणि नियंत्रण; विजेपासून संरक्षण याचाही या शाखेत अंतर्भाव होतो. विद्युत अभियांत्रिकी विषयासंदर्भात तांत्रिक माहिती गणितीय समीकरणाची क्ल‍िष्टता टाळून उपलब्ध करण्याचा प्रयत्न सदर ज्ञानमंडळात केलेला आहे. या शाखेचा विस्तार पाहता वाचकांच्या सोयीकरिता माहितीचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे :
१. मूलभूत विद्युत अभियांत्रिकी
२. विद्युत मंडल, जालक, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र
३. विद्युत यंत्र
४. विद्युत मापनपद्धती
५. विद्युत ऊर्जा निर्मिती
६. विद्युत प्रेषण
७. विद्युत ऊर्जा वितरण आणि संरक्षण
८. शक्ती इलेक्ट्रॉनिकी आणि प्रचोदन/चालन
९. नियंत्रण यंत्रणा
१०. विद्युत अधिष्ठापन आणि संकीर्ण

मॉस्फेट (MOSFET)

मॉस्फेट

मॉस्फेट म्हणजेच धातवीय ऑक्साइड अर्धसंवाहक क्षेत्र-परिणामकारक ट्रँझिस्टर (Metal oxide Semiconductor field-effect transistor, MOS transistor) होय. आ. १. मॉस्फेट : चिन्ह ...
यांत्रिक अनुनाद वारंवारता मापक (MECHANICAL RESONANCE FREQUENCY METER)

यांत्रिक अनुनाद वारंवारता मापक

आपण विद्युत पुरवठ्याची (Electric supply) वारंवारता मोजण्यासाठी विविध प्रकारच्या वारंवारता मापकांचा उपयोग करतो. विद्युत पुरवठ्याच्या वारंवारतेनुसार [Frquency (f)] मापकाची मोजण्यासाठी ...
रेडिओ व दूरचित्रवाणी (Radio and Television)

रेडिओ व दूरचित्रवाणी

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनोरंजन हा अविभाज्य घटक आहे. मनोरंजनाची हौस भागविण्यासाठी पूर्वी राजदरबारात संगीताचे आयोजन करण्यात येत असे. तसेच गावोगावी ...
रेषा मार्गक्रमण करणारा रोबॉट (Line Following  Robot)

रेषा मार्गक्रमण करणारा रोबॉट

आ. १. रोबॉट प्रतिकृती हा एक स्वयंचलित रोबॉट असून तो  नावाप्रमाणे पांढऱ्या पृष्ठभागावरील काळ्या रेषेच्या अथवा काळ्या पृष्ठभागावरील पांढऱ्या रेषेचा ...
रोहित्राचे निर्भार आणि मंडल संक्षेप (किंवा लघु परिपथन) परीक्षण [Open circuit-no load & short circuit Test]

रोहित्राचे निर्भार आणि मंडल संक्षेप

समपरिणामी रोहित्र : यामध्ये प्रत्यक्ष रोहित्र हे जणू एक आदर्श रोहित्र आणि एक ’समपरिणामी विद्युत्  संरोध’  यांचे मिळून तयार झाले आहे असे ...
रोहित्राचे विद्युत् दाबनियमन  (Voltage regulation of transformer)

रोहित्राचे विद्युत् दाबनियमन

रोहित्राच्या प्राथमिक वेटोळ्यास पुरविलेला विद्युत् दाब स्थिर असताना व्दितीयक वेटोळ्याकडून निर्भार (no load) स्थितीत दिला जाणारा विद्युत् दाब (E2) व ...
लघु विद्युत मंडल खंडक (Molded Circuit Breaker, MCB) आणि साचेबद्ध आवरणयुक्त विद्युत मंडल खंडक (Molded Case Circuit Breaker, MCCB)

लघु विद्युत मंडल खंडक

कमी विद्युत दाबाच्या विद्युत मंडलात ठराविक मूल्यापेक्षा जास्त विद्युत प्रवाह गेल्यास स्वयंचलित प्रणालीने विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी वापरले जाणारे स्विचसारखे ...
वर्तुळाकार वितरण मुख्य नियंत्रक (Ring Main Unit)

वर्तुळाकार वितरण मुख्य नियंत्रक

भारत सरकारद्वारा २००० च्या दशकात जलदगतीने विद्युत शक्तीचा विकास व सुधारणा (APDRP – Accelerated Power Development & Reforms) तसेच पुनर्रचित ...
वात निरोधित उपकेंद्र (Gas Insulated Substation)

वात निरोधित उपकेंद्र

विद्युत निर्मिती केंद्रात वीजेची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर घरांमध्ये, औद्योगिक केंद्रांमध्ये, शेतांमध्ये इत्यादी ठिकाणी होतो. निर्मिती केंद्र व ...
वात निरोधित पारेषण वाहिनी (Gas Insulated Transmission Lines)

वात निरोधित पारेषण वाहिनी

विद्युत वापराच्या नित्य वाढणाऱ्या मागणीसाठी नवीन वाहिन्या आणि उपकेंद्रांची निर्मिती करावी लागते. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प यांमुळे त्यासाठी लागणारी ...
वातनिरोधक स्विचगिअर  (Gas Insulated Switchgear – GIS)

वातनिरोधक स्विचगिअर

स्विचगिअर क्षेत्रात स्विचगिअरची विश्वासार्हता वाढवणे, त्याचे आकारमान कमी करणे, आयुर्मान वाढवणे आणि शक्य तितकी कमी देखभालीची आवश्यकता असणे यासाठी सतत ...
वाय-फाय प्रणाली (Wi-Fi System)

वाय-फाय प्रणाली

भ्रमणध्वनी किंवा संगणकामधील महाजालकाची (Internet) जोडणी किंवा कोणत्याही आधुनिक संचामधून माहितीची बिनतारी देवाणघेवाण करण्यासाठी प्रामुख्याने वाय-फाय प्रणाली वापरली जाते. आधुनिक ...
वितरण प्रणाली प्रचालक (Distribution System Operator - DSO)

वितरण प्रणाली प्रचालक

विद्युत निर्मिती क्षेत्रात परंपरागत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उपलब्ध साठे मर्यादित आहेत आणि या इंधनाच्या वापराने कार्बन डाय-ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूचे प्रमाण ...
विद्युत अधिनियम २००३ : तरतुदी  (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ : तरतुदी

विद्युत अधिनियम २००३ या अधिनियमामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत : केंद्र सरकारची भूमिका : राष्ट्रीय विद्युत व विद्युत दर ...
विद्युत अधिनियम २००३ : तरतुदी व उपयुक्तता (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ : तरतुदी व उपयुक्तता

विद्युत अधिनियम २००३ या अधिनियमामधील इतर महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत : राज्य विद्युत मंडळांची पुनर्रचना : राज्य सरकार ठरवेल तेव्हापासून ...
विद्युत अधिनियम २००३ : पार्श्वभूमी (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ : पार्श्वभूमी

विद्युत अधिनियम २००३ (The Electricity Act 2003) रोजीचे विधेयक सुरुवातीला ‘विद्युत अधिनियम २००१’ असे संसदेत सादर केले गेले. त्यास लोकसभेची ...
विद्युत अनुनाद वारंवारता मापक (Electric Resonance Frequency Meter)

विद्युत अनुनाद वारंवारता मापक

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. विद्युत कक्षेत होणाऱ्या प्रगतीमध्ये कंप्रतेत (Frequency) होणाऱ्या बदलांचे महत्त्व लक्षणीय आहे. धरित्र ...
विद्युत इस्त्री (Electric Iron)

विद्युत इस्त्री

कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती विद्युत साधनाला विद्युत इस्त्री असे म्हणतात. विद्युत इस्त्रीचे पहिले एकस्व १८८३ मध्ये अमेरिकेच्या डायर ...
विद्युत उपकेंद्रीय भूसंपर्कन : वाहीची निवड (Substation Earthing – choice of conductor)

विद्युत उपकेंद्रीय भूसंपर्कन : वाहीची निवड

भूपृष्ठाखाली पुरलेली आवरणरहित पट्टी/गज वाहीची जाळी, उभे पुरलेले इलेक्ट्रोड आणि निरनिराळ्या उपकरणांच्या भूसंपर्कन अग्रापासून (Earthing terminal) भूपृष्ठाखालील जाळीस जोडणारे छोटे ...
विद्युत उपकेंद्रीय भूसंपर्कन- रोधकता संकल्पना (Substation Earthing - concept of Resistivity)

विद्युत उपकेंद्रीय भूसंपर्कन- रोधकता संकल्पना

भूसंपर्कन प्रणाली (Earthing system) ही विद्युत यंत्रणेतील अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे. यंत्रणेतील उपकरणे आणि ती हाताळणारे तंत्रज्ञ यांच्या सुरक्षेसाठी योग्य ...
Loading...