(प्रस्तावना) पालकसंस्था : म.रा.म.वि.नि.मंडळ, मुंबई | समन्वयक : वसंत चौधरी | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
राजपीपला शहर (Rajpipla City)

राजपीपला शहर

भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३४,८४५ (२०११). हे अहमदाबादच्या आग्नेयीस सुमारे २०० किमी., कर्जन नदीच्या किनाऱ्यावर सस ...
रिचर्ड चॅन्सलर (Richard Chanceller)

रिचर्ड चॅन्सलर

चॅन्सलर, रिचर्ड (Chanceller, Richard) : (१५२१ – १० नोव्हेंबर १५५६). ब्रिटिश समन्वेषक व मार्गनिर्देशक. श्वेत समुद्र पार करणारी आणि रशियातील ...
रिचर्ड लेमन लँडर (Richard Lemon Lander)

रिचर्ड लेमन लँडर

लँडर, रिचर्ड लेमन (Lander, Richard Lemon) : (८ फेब्रुवारी १८०४ – ६ फेब्रुवारी १८३४). पश्चिम आफ्रिकेतील नायजर नदीचे समन्वेषण करणारे ...
रुर नदी (Ruhr River)

रुर नदी

जर्मनीमधून वाहणारी, ऱ्हाईन नदीची प्रमुख उपनदी. जर्मनीच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या या नदीचा उगम झॅउरलँड या डोंगराळ प्रदेशात, विंटरबर्ग या नगराजवळ, ...
रेनडिअर सरोवर (Reindeer Lake)

रेनडिअर सरोवर

कॅनडाच्या मध्य भागातील एक सरोवर. कॅनडाच्या सस्कॅचेवन आणि मॅनिटोबा या प्रांतांच्या उत्तरेकडील सरहद्दीदरम्यान हे सरोवर विस्तारलेले आहे. हे कॅनडातील नववे, ...
रॉबर्ट कॅम्बल (Robert Campbell)

रॉबर्ट कॅम्बल

कॅम्बल, रॉबर्ट (Campbell, Robert) : (२१ फेब्रुवारी १८०८ – ९ मे १८९४). कॅनडियन समन्वेषक, फरचा व्यापारी आणि शेतकरी. त्यांचा जन्म ...
रोहतांग खिंड (Rohtang Pass)

रोहतांग खिंड

भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक खिंड. पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या पूर्व टोकाशी सस. पासून ३,९७८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे ...
लागूना दे बाय सरोवर (Laguna de Bay Lake)

लागूना दे बाय सरोवर

फिलिपीन्समधील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे अंतर्गत सरोवर. लूझॉन हे फिलिपीन्समधील सर्वांत मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे बेट असून त्या बेटावरच हे ...
लिग्यूरियन समुद्र (Ligurian Sea)

लिग्यूरियन समुद्र

भूमध्य समुद्राचा एक फाटा. इटलीच्या वायव्य किनाऱ्यावर हा समुद्र पसरलेला आहे. उत्तरेस फ्रान्स व प्रामुख्याने इटालियन रिव्हिएरा (लिग्यूरिया) या इटलीच्या ...
लूसर्न सरोवर (Lucerne Lake)

लूसर्न सरोवर

यूरोप खंडातील आल्प्स पर्वतराजीतील आणि स्वित्झर्लंडमधील एक प्रसिद्ध फ्योर्ड प्रकारचे गोड्या पाण्याचे सरोवर. स्वित्झर्लंड देशाच्या मध्यवर्ती भागातील चुनखडीयुक्त तीव्र उताराच्या ...
लेक ऑफ द वुड्स सरोवर (Lake of the Woods Lake)

लेक ऑफ द वुड्स सरोवर

उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा आणि संयुक्त संस्थानांतील एक निसर्गसुंदर गोड्या पाण्याचे सरोवर. याचा विस्तार कॅनडातील आँटॅरिओ व मॅनिटोबा प्रांतांत आणि ...
वाई शहर (Wai City)

वाई शहर

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाई तालुक्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ३६,०२५ (२०११). वाईच्या सभोवती सह्याद्री ...
विल्यम क्लार्क (William Clark)

विल्यम क्लार्क

क्लार्क, विल्यम (Clark, William) : (१ ऑगस्ट १७७० – १ सप्टेंबर १८३८) अमेरिकन समन्वेषक. विल्यम यांचा जन्म अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ...
विल्यम बॅफिन (William Baffin)

विल्यम बॅफिन

बॅफिन, विल्यम (Baffin, William) : (१५८४ – २३ जानेवारी १६६२). ब्रिटिश मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. बॅफिन यांच्या बालपणाविषयी विशेष माहिती उपलब्ध ...
वुलर सरोवर (Wular Lake)

वुलर सरोवर

भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील तसेच भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बांदीपोरा जिल्ह्यात, श्रीनगर ...
वृंदावन (Vrindavan)

वृंदावन

उत्तर प्रदेश राज्याच्या मथुरा जिल्ह्यातील व तालुक्यातील एक पुण्यक्षेत्र. लोकसंख्या ६३,००५ (२०११). यमुना नदीच्या उजव्या तीरावर, द्वीपकल्पासारख्या भूभागावर वसलेले हे ...
व्यापारी मार्ग (Trade Routes)

व्यापारी मार्ग

व्यापाराच्या उद्देशाने वस्तूंच्या अथवा मालाच्या वाहतुकीसाठी सातत्याने वापरात असणारे मार्ग. प्राचीन मानवी संस्कृतींच्या उदयापासून रस्त्यांचा, तसेच सागरी व नदीप्रवाहातील जलमार्गांचा ...
व्हर्नी लव्हेट कॅमरन (Verney Lovett Cameron)

व्हर्नी लव्हेट कॅमरन

कॅमरन, व्हर्नी लव्हेट (Cameron, Verney Lovett) : (१ जुलै १८४४ – २७ मार्च १८९४). विषुववृत्तीय आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत ...
व्हिक्टोरिया धबधबा (Victoria Falls)

व्हिक्टोरिया धबधबा

आफ्रिकेतील झँबीझी नदीवरील एक जगप्रसिद्ध व निसर्गसुंदर धबधबा. हा धबधबा उत्तरेकडील झँबिया आणि दक्षिणेकडील झिंबाब्वे या दोन देशांच्या सीमेवर आहे ...
व्होज पर्वत (Vosges Mountain)

व्होज पर्वत

फ्रान्समधील एक पर्वतश्रेणी. फ्रान्सच्या पूर्व भागातील ओ-रँ, बा-रँ आणि व्होज या विभागांत व्होज पर्वतश्रेणीचा (गिरिपिंडाचा) विस्तार झालेला आहे. फ्रान्स-जर्मनी यांच्या ...