(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
सहारा वाळवंटाचा इतिहास (History of Sahara Desert)

सहारा वाळवंटाचा इतिहास

प्लाइस्टोसीन हिमयुग सुमारे १०,००० वर्षांपूर्वी संपले. त्या वेळी सांप्रत सहारा प्रदेशातील हवामान बरेच आर्द्र स्वरूपाचे होते. अल्जीरिया व इतर वाळवंटी ...
सहारा वाळवंटाची भूरचना (Physiography of Sahara Desert)

सहारा वाळवंटाची भूरचना

सहारा वाळवंट हे आफ्रिकेच्या ढालक्षेत्रावर स्थित आहे. या ढालक्षेत्रावर कँबियनपूर्व काळातील घडीचे व उघडे पडलेले खडक आढळतात. हे ढालक्षेत्र स्थिर ...
सहारा वाळवंटाचे हवामान (Climate of Sahara Desert)

सहारा वाळवंटाचे हवामान

सहारातील वाळवंटी हवामान कधीपासून सुरू झाले, याबाबतीत तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. येथील खडकांविषयी जे वेगवेगळे अभ्यास करण्यात आले, त्यानुसार २ ...
सहारा वाळवंटातील आर्थिक स्थिती (Economy in Sahara Desert)

सहारा वाळवंटातील आर्थिक स्थिती

सहारा वाळवंटातील मानवी व्यवसाय काही अपवाद वगळता पूर्णपणे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. केवळ जेथे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठालगत पाणी उपलब्ध आहे, ...
सहारा वाळवंटातील लोक व समाजजीवन (People and Social Life of Sahara Desert)

सहारा वाळवंटातील लोक व समाजजीवन

नाईल नदीचे खोरे वगळता सहारा वाळवंट प्रदेशाची लोकसंख्या सुमारे २.५ द. ल. आहे. दर चौ. किमी.स एका व्यक्तिपेक्षाही कमी इतकी ...
सहारा वाळवंटातील वनस्पती व प्राणिजीवन (Vegetation and Animal Life in Sahara Desert)

सहारा वाळवंटातील वनस्पती व प्राणिजीवन

सहारा वाळवंटामध्ये प्रामुख्याने विरळ व विखुरलेली वनश्री आढळते. उच्चभूमी प्रदेश, मरूद्यानाच्या द्रोणी आणि वाडींच्या काठांवर गवत, झुडुपे व वृक्ष अधिक ...
साइमा सरोवर प्रणाली (Saimma Lake System)

साइमा सरोवर प्रणाली

फिनलंडच्या आग्नेय भागातील गोड्या पाण्याची सर्वांत मोठी सरोवर प्रणाली आणि याच नावाचे एक सरोवर. या गुंतागुंतीच्या सरोवर प्रणालीत परस्परांना जोडली ...
साउथ डकोटा राज्य (South Dakota State)

साउथ डकोटा राज्य

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. संयुक्त संस्थानांच्या उत्तर भागात असलेल्या या राज्याच्या उत्तरेस नॉर्थ डकोटा राज्य, पूर्वेस मिनेसोटा व आयोवा ...
साउथ बेंड शहर (South Bend City)

साउथ बेंड शहर

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इंडियाना राज्यातील एक प्रमुख औद्योगिक शहर आणि सेंट जोसेफ परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०२,०२६ (२०१९ अंदाज). साउथ ...
साऊँ टोमे आणि प्रीन्सिपे (Sao Tome and Principe)

साऊँ टोमे आणि प्रीन्सिपे

अधिकृत नाव डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ साऊँ टोमे अ‍ॅन्ड प्रीन्सिपे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतचा एक द्वीपरूप देश व पोर्तुगालचा भूतपूर्व सागरपार प्रांत ...
साऊँ पाउलू शहर (Sao Paulo City)

साऊँ पाउलू शहर

ब्राझीलमधील साऊँ पाउलू राज्याच्या राजधानीचे ठिकाण आणि देशातील अग्रेसर औद्योगिक केंद्र. ब्राझीलमधील तसेच दक्षिण अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर असून ...
साऊँ फ्रँसीश्कू (Sao Francisco)

साऊँ फ्रँसीश्कू

ब्राझीलमधील एक प्रमुख नदी. सॅन फ्रँसीश्कू किंवा रीओ साऊँ फ्रँसीश्कू या नावांनीही ती ओळखली जाते. ब्राझीलच्या पूर्व भागातील मीनास झिराइस ...
सागर बेट (Sagar Island)

सागर बेट

भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीच्या मुखाशी असलेले एक बेट. सागर हे गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील सर्वांत पश्चिमेकडील बेट असून ते ...
सागरमग्न खंडभूमी (Continental Shelf)

सागरमग्न खंडभूमी

सागरकिनाऱ्याला लागून असणारा उथळ सागरतळ म्हणजे सागरमग्न खंडभूमी होय. खंड-फळी व भूखंड मंच या पर्यायी संज्ञाही सदर भूविशेषासाठी वापरल्या जातात ...
सागरी परिसंस्था (Marine Ecosystem)

सागरी परिसंस्था

जलपरिसंस्थेच्या विविध प्रकारांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७०.८% क्षेत्र पाण्याखाली असून त्यातील सुमारे २.५% क्षेत्र गोड्या पाण्याखाली ...
सागरी प्रवाह (Ocean Current)

सागरी प्रवाह

सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी, सागरी लाटा व सागरी ...
सांगली जिल्हा (Sangli District)

सांगली जिल्हा

महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,६५६ चौ. किमी. असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या २·८ % क्षेत्र या ...
सांगली शहर (Sangli City)

सांगली शहर

महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या सांगली शहर २,५५,२७०, (२०११). हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान ...
सात आश्चर्ये (Seven Wonders)

सात आश्चर्ये

जगातील नवलपूर्ण, सर्वश्रेष्ठ व उल्लेखनीय बाबींचा तसेच विश्वाच्या निर्मितीबाबतचा शोध घेण्याची जिज्ञासा मानवाला प्राचीन काळापासून आहे. या जिज्ञासेतूनच आश्चर्यचकित किंवा ...
सातपुडा पर्वत (Satpura Mountain)

सातपुडा पर्वत

भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र–मध्य प्रदेश या राज्यांदरम्यानची एक पर्वतश्रेणी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेस विंध्यला साधारण समांतर अशी ही पर्वतश्रेणी आहे. मध्य भारतातील ...