(प्रस्तावना) पालकसंस्था : म.रा.म.वि.नि.मंडळ, मुंबई | समन्वयक : वसंत चौधरी | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
हिंदुकुश पर्वत (Hindu Kush Mountain)

हिंदुकुश पर्वत

मध्य आशियातील एक प्रमुख पर्वतश्रेणी. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पसरलेल्या या पर्वताची लांबी सुमारे ८०० किमी. व सरासरी रुंदी सुमारे २४० ...
हिमालय पर्वत (Himalaya Mountain)

हिमालय पर्वत

आशियातील तसेच जगातील सर्वाधिक उंचीची विशाल पर्वतप्रणाली. हिमालय हा सर्वांत तरुण घडीचा पर्वत आहे. हिमालयाच्या उंच रांगा सतत बर्फाच्छादित असतात ...
हिमालय पर्वताची निर्मिती (Formation of Himalaya Mountain)

हिमालय पर्वताची निर्मिती

हिमालय पर्वताची निर्मिती स्तरित आणि रूपांतरित खडकांच्या रचना असलेल्या प्रदेशात वलीकरण क्रिया होऊन झालेली आहे. ॲल्फ्रेड व्हेगेनर (वॅगनर) यांच्या खंड ...
हिमालय पर्वताची प्राकृतिक रचना (Physiography of Himalayas)

हिमालय पर्वताची प्राकृतिक रचना

हिमालय पर्वताच्या बऱ्याचशा भागाची अचूक आणि सर्वमान्य भूशास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध नाही. हिमालयाची संरचना सामान्यपणे आल्प्स पर्वतसदृश्य आहे. सांरचनिक दृष्ट्या ...
हिमालय पर्वताचे पश्चिम-पूर्व विभाग (West-East Divisions of Himalaya Mountain)

हिमालय पर्वताचे पश्चिम-पूर्व विभाग

हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे (१) पश्चिम हिमालय, (२) मध्य हिमालय व (३) पूर्व हिमालय अशा तीन भागांत विभाजन केले ...
हिमालय पर्वताचे प्रादेशिक विभाग (Regional Divisions of Himalaya Mountain)

हिमालय पर्वताचे प्रादेशिक विभाग

भौगोलिक दृष्ट्या हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून-पूर्वेकडे सामान्यपणे पंजाब हिमालय, कुमाऊँ हिमालय, नेपाळ हिमालय व आसाम हिमालय असे चार उपविभाग केले जातात ...
हिमालय पर्वताचे महत्त्व (Importance of Himalaya Mountain)

हिमालय पर्वताचे महत्त्व

भारतीय उपखंडाच्या आणि विशेषत: भारताच्या दृष्टीने हिमालय पर्वताला भौगोलिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय, सामाजिक, पर्यटन, धार्मिक, भूराजनैतिक, संरक्षण आणि सांस्कृतिक दृष्ट्या ...
हिमालय पर्वतातील खिंडी (Passes in Himalaya Mountain)

हिमालय पर्वतातील खिंडी

हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या रांगांमध्ये असंख्य खिंडी आहेत. येथील खिंडी खाजगी व सार्वजनिक वाहतूक, व्यापार, संरक्षण तसेच राजकीय, लष्करी व भूराजनैतिक ...
हिमालय पर्वतातील गिर्यारोहण व समन्वेषण (Mountaineering and Exploration in Himalaya Mountain)

हिमालय पर्वतातील गिर्यारोहण व समन्वेषण

भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे भारतीय उपखंडात ब्रिटिश आल्यानंतरच हिमालय पर्वताचे समन्वेषण आणि त्यातील शिखरे सर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्वातंत्र्योत्तर ...
हिमालय पर्वतातील हवामान (Climate in Himalayas)

हिमालय पर्वतातील हवामान

भारतीय उपखंडातील तसेच तिबेटच्या पठारावरील हवामानावर हिमालयाच्या पश्चिम-पूर्व विस्ताराचा आणि अधिक उंचीचा फार मोठा परिणाम झालेला आहे. हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या ...
हिमालय, प्राचीन वाङ्मयातील (Himalayas in Ancient Literature)

हिमालय, प्राचीन वाङ्मयातील

हिमालय पर्वतातील उंच भाग सतत बर्फाच्छादित असतात. हिमालय हा संस्कृत शब्द असून हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य किंवा ...
हिमालयाच्या ईशान्येकडील पर्वतरांगा व टेकड्या किंवा पूर्वांचल (Mountain Ranges and Hills of Northeastern Himalayas or Purvanchal)

हिमालयाच्या ईशान्येकडील पर्वतरांगा व टेकड्या किंवा पूर्वांचल

ब्रह्मपुत्रा नदीपात्राच्या व नामचा बारवा शिखराच्या पूर्वेस काही अंतरापर्यंत पर्वतरांगा व टेकड्यांचा प्रदेश आहे. भारताच्या अगदी ईशान्य भागात या रांगा ...
हिमालयाच्या समांतर पर्वतरांगा (Parallel Ranges of Himalayas)

हिमालयाच्या समांतर पर्वतरांगा

हिमालय पर्वताच्या बऱ्याचशा भागाची अचूक भूशास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध नाही. हिमालयाची संरचना सामान्यपणे आल्प्ससदृश आहे. सांरचनिक दृष्ट्या हिमालय श्रेणी ही ...
हिमालयातील नद्या व हिमनद्या (Rivers and Glaciers in Himalayas)

हिमालयातील नद्या व हिमनद्या

हिमालय पर्वतात असंख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. अनेक हिमालयीन नद्या पूर्वप्रस्थापित स्वरूपाच्या व हिमालयापेक्षाही जुन्या आहेत. हिमालयाचे उत्थापन अगदी मंद गतीने ...
हिमालयातील पर्यटन (Tourism in Himalayas)

हिमालयातील पर्यटन

पर्यटन हा हिमालय पर्वतीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायामुळे असंख्य स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विविध ...
हिमालयातील वनस्पती व प्राणिजीवन (Plants and Animal Life in Himalaya)

हिमालयातील वनस्पती व प्राणिजीवन

हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या भागातील हवामानामधील भिन्नता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, प्रदेशाची उंची, मृदा प्रकार इत्यादी घटकांमधील तफावतीनुसार वनस्पती व प्राणिजीवनात विविधता ...
हिमालयातील वाहतूक (Transportation in Himalayas)

हिमालयातील वाहतूक

हिमालयाच्या उंच आणि ओबडधोबड पर्वतरांगा, खोल घळया, उंच शिखरे, खडकाळ कडे, बर्फाच्छादित प्रदेश, घनदाट अरण्ये इत्यादी घटक वाहतूकमार्गांच्या विकासातील प्रमुख ...
हिमालयातील सरोवरे (Lakes in Himalayas)

हिमालयातील सरोवरे

हिमालय पर्वतात शेकडो सुंदर सरोवरे आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवरील सरोवरांमध्ये येथील सरोवरांचा समावेश होतो. वाढत्या उंचीनुसार सरोवरांचा आकार कमी होताना ...
हूड शिखर (Mount Hood)

हूड शिखर

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातील कॅस्केड पर्वतश्रेणीतील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर. याची उंची स. स.पासून ३,४२५ मी. आहे. ऑरेगन राज्याच्या ...
हूव्हर धरण (Hoover Dam)

हूव्हर धरण

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील सर्वांत उंच काँक्रीटचे कमानी धरण आणि जगातील सर्वांत उंच काँक्रीट धरणांपैकी एक. ॲरिझोना व नेव्हाडा या राज्यांच्या ...