(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
ऑल्बनी नदी (Albany River)

ऑल्बनी नदी

कॅनडातील आँटॅरिओ प्रांताच्या उत्तरमध्य भागातून वाहणारी नदी. आँटॅरिओ प्रांतात मूळ स्वरूपातील ज्या काही मोजक्या नद्या आहेत, त्यांपैकी ही एक नदी ...
ऑस्कर बौमान (Oskar Baumann)

ऑस्कर बौमान

बौमान, ऑस्कर (Baumann, Oskar) : (२५ जून १८६४ – १२ ऑक्टोबर १८९९). ऑस्ट्रियन समन्वेषक, मानचित्रकार आणि मानववंश वर्णनतज्ज्ञ. त्यांचा जन्म ...
ओखोट्स्क समुद्र (Sea of Okhotsk)

ओखोट्स्क समुद्र

पॅसिफिक महासागराचा अगदी वायव्य भागातील सीमावर्ती समुद्र. रशियाच्या अतिपूर्वेकडील भागात वास्तव्यास असलेल्या पहिल्या ओखोट्स्क जमातीच्या वस्तीच्या नावावरून या समुद्राला ओखोट्स्क ...
ओटावा नदी (Ottawa River)

ओटावा नदी

पूर्व कॅनडातील सेंट लॉरेन्स नदीची प्रमुख उपनदी. ओटावा नदी क्वीबेक प्रांताच्या पश्चिम भागातील लॉरेंचन या पठारी व पर्वतीय प्रदेशात उगम ...
ओसाड प्रदेश (Arid land)

ओसाड प्रदेश

लोकवस्ती नसते किंवा असलेली लोकवस्ती उठून गेलेली असते अशा शुष्क, रुक्ष, निर्जल व निर्जन प्रदेशाला ओसाड प्रदेश असे म्हणतात. सामान्यत: ...
ओहायओ नदी (Ohio River)

ओहायओ नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणाऱ्या मिसिसिपी नदीची एक महत्त्वाची उपनदी. तिची लांबी १,५४६ किमी., तर जलवाहन क्षेत्र ५,२८,१०० चौ ...
कंकणद्वीप (Atoll)

कंकणद्वीप

बांगडीसारखे, जवळजवळ वर्तुळाकार प्रवाळद्वीप. याच्या आतल्या बाजूस २० ते १०० मी. खोलीचे, सपाट तळाचे खारकच्छ असून त्याभोवती लहान लहान प्रवाळद्वीपांचे ...
कटिबंध (Climate Zones or Latitudinal zones)

कटिबंध

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या स्थळाचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) स्थूलमानाने त्याच्या अक्षवृत्तानुसार ठरविता येते. यावरून एकूण भूपृष्ठाच्या अक्षवृत्तांनुसार कल्पिलेल्या अशा पट्ट्यांना ...
कडा (Cliff)

कडा

भौगोलिक आणि भूशास्त्रीय दृष्ट्या तीव्र उताराचा, सरळ, उभा खडक म्हणजे कडा होय. तो जवळजवळ उभ्या, टांगलेल्या किंवा लोंबत्या रूपात असू ...
कनेक्टिकट नदी (Connecticut River)

कनेक्टिकट नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड या विभागीय प्रदेशातील सर्वांत लांब नदी. लांबी ६५५ किमी. जलवाहनक्षेत्र २८,७१० चौ. किमी ...
कम्युनिझम शिखर (Communism Peak)

कम्युनिझम शिखर

ताजिकिस्तानमधील तसेच पामीरच्या पठारावरील सर्वोच्च शिखर. स्टालिन शिखर किंवा गार्मो या नावांनीही हे शिखर ओळखले जाते. उंची ७,४९५ मी. पामीर ...
कर्कवृत्त (Tropic of Cancer)

कर्कवृत्त

पृथ्वीच्या विषुववृत्तापासून उत्तरेस सुमारे २३° ३०’ एवढ्या कोनीय अंतरावर व त्याला समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. कर्कवृत्ताचे ...
कागायान नदी (Cagayan River)

कागायान नदी

फिलीपीन्समधील एक महत्त्वाची व सर्वांत लांब नदी. रिओ गांद्रे दे कागायान या नावानेही ही नदी ओळखली जाते. फिलिपीन्समधील लूझॉन बेटाच्या ...
काराकोरम खिंड (Karakoram Pass)

काराकोरम खिंड

काराकोरम पर्वतश्रेणीतील भारत व चीन या दोन देशांच्या सरहद्दीवरील एक इतिहासप्रसिद्ध खिंड. भारताचा लडाख हा केंद्रशासित प्रदेश आणि चीनचा शिनजियांग ...
कार्ल क्लॅऊस फॉन देर डेकन (Karl Klaus von der Decken)

कार्ल क्लॅऊस फॉन देर डेकन

डेकन, कार्ल क्लाऊस फॉन देर (Decken, Karl Klaus Von Der) ꞉ (८ ऑगस्ट १८३३ – २ ऑक्टोबर १८६५). टांझानियातील किलिमांजारो ...
कार्स्ट भूमिस्वरूप (Karst Topography)

कार्स्ट भूमिस्वरूप

कार्स्ट ही चुनखडी, डोलोमाइट आणि जिप्सम यांसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या कार्बोनेट खडकांच्या विरघळण्यापासून निर्माण होणारी स्थलाकृती आहे. चुनखडक किंवा डोलोमाइट खडकांच्या ...
किगाली शहर (Kigali City)

किगाली शहर

मध्य आफ्रिकेतील रूआंडा या खंडांतर्गत देशाची राजधानी. लोकसंख्या ११,३२,६८६ (२०१२). देशाच्या मध्यवर्ती भागात, रूगन्वा नदीच्या काठावर, सस. पासून १,५४० मी ...
किंग्स्टाउन शहर (Kingstown City)

किंग्स्टाउन शहर

कॅरिबियन समुद्रातील सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ या द्वीपीय देशाची राजधानी. लोकसंख्या १२,९०९ (२०१२). पूर्व कॅरिबियातील अँटिलीस द्वीपमालिकेत सेंट व्हिन्सेंट व ...
किनारपट्टी मैदाने (Coastal plains)

किनारपट्टी मैदाने

समुद्रकिनारा व पर्वतरांगा वा पठार यांच्या दरम्यान हा कमी उंचीचा सपाट भूप्रदेश असतो. हे मैदान समुद्रपातळीपासून ते अधिक उंच भूरूपात ...
किलिमांजारो पर्वत (Kilimanjaro Mountain)

किलिमांजारो पर्वत

मौंट किलिमांजारो. आफ्रिका खंडातील अत्युच्च ज्वालामुखी पर्वत. हा केन्या व टांझानिया यांच्या सीमेवर, नैरोबीच्या (केन्या) दक्षिणेस सुमारे २२५ किमी.वर असून ...