(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
कॉर्न बेल्ट (Corn Belt)

कॉर्न बेल्ट

मका उत्पादक पट्टा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मका उत्पादक प्रदेशासाठी वापरात असलेली पारंपरिक संज्ञा. पूर्वीपासून ‘कृषिप्रदेश’ म्हणून हा भाग प्रसिद्ध असून ...
क्रेटर सरोवर (Crater Lake)

क्रेटर सरोवर

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पॅसिफिक किनाऱ्यावरील ऑरेगन राज्यातील एक सरोवर. पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन सरोवर म्हणून या सरोवरास मान्यता आहे. इतिहासपूर्व काळात ...
क्वेस्टा (Cuesta)

क्वेस्टा

एका बाजूला तीव्र उतार किंवा तुटलेला कडा आणि दुसऱ्या बाजूला मंद वा सौम्य उतार असलेल्या भूरूपाला क्वेस्टा म्हणतात. याला एकनतीय ...
क्षिप्रा नदी (Kshipra River)

क्षिप्रा नदी

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी चंबळ नदीची एक उपनदी. ती शिप्रा या नावानेही ओळखली जाते. तिची लांबी सुमारे २४० किमी ...
खचदरी (Rift Valley)

खचदरी

खंदकासारखा आकार असणाऱ्या दरीला खचदरी म्हणतात. समोरासमोर असलेल्या हिच्या भिंती एकमेकींना जवळजवळ समांतर असून त्यांचा उतार तीव्र असतो. भूकवचात परस्परांना ...
खंडान्त उतार (Continental slope)

खंडान्त उतार

महासागराच्या पाण्याखालील भूकवचाच्या खंडीय क्षेत्राचे किनार्‍यापासून खंड-फळी, खंडान्त उतार व खंडीय उंचवटा हे तीन भाग करतात. सागरमग्न खंडभूमीच्या काठापासून ते ...
खंडीय उंचवटा (Continental Rise/Apron)

खंडीय उंचवटा

खंडीय सीमाक्षेत्राचा हा संक्रमणाचा (स्थित्यंतराचा) भाग आहे. खंडीय उंचवट्याचा उतार सामान्यपणे ०.५° ते १° इतका कमी असून पृष्ठभाग सर्वसाधारणपणे सपाट ...
खंडीय ढालक्षेत्र (Continental Shield)

खंडीय ढालक्षेत्र

भूकवचातील कमी उठाव असलेले मोठे आणि भूसांरचनिक दृष्ट्या स्थिर क्षेत्र म्हणजे खंडीय ढालक्षेत्र होय. ते कँब्रियनपूर्व काळातील स्फटिकी खडकांचे बनलेले ...
खंडीय सीमाक्षेत्र (Continental Margin)

खंडीय सीमाक्षेत्र

समुद्रकिनारा व खोल सागरी तळ यांच्या दरम्यान असलेल्या भूप्रदेशांना एकत्रितपणे खंडीय सीमाक्षेत्र म्हणतात. यामध्ये सामान्यपणे खंड-फळी (भूखंड मंच किंवा सागरमग्न ...
खाडी (Creek, Channel etc.)

खाडी

समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजे खाडी होय. किनाऱ्यावरील सखल भाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे ...
खामसीन वारा (Khamsin Wind)

खामसीन वारा

उत्तर आफ्रिकेत व अरेबियन द्वीपकल्पात आढळणारा गरम, शुष्क व धुळीचा वाळवंटी वारा. तो ईजिप्तमध्ये व तांबड्या समुद्रावर वाहताना आढळतो. प्रामुख्याने ...
खारकच्छ (Lagoon)

खारकच्छ

खाजण. समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या, उथळ आणि शांत पाण्याची पट्टी किंवा ...
खारे वारे व मतलई वारे (Sea Breezes and Land Breezes)

खारे वारे व मतलई वारे

समुद्रकिनारी वाहणारे हे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्‍या अशा वार्‍यांना खारे वा सागरी वारे, तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्‍या वार्‍यांना ...
गरजते चाळीस (Roaring Forties)

गरजते चाळीस

गरजते चाळीस ही एक लोकप्रिय नाविक संज्ञा असून ती ४०° ते ५०° अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या वादळी सागरी प्रदेशांसाठी वापरतात. ही ...
गिरिपिंड (Massif)

गिरिपिंड

गिरिपिंड हा भूकवचाचा एक भाग असून त्याच्या सुस्पष्ट सीमा विभंगांनी (तड्यांनी) निश्चित झालेल्या असतात. म्हणजे तो विभंगांनी सीमाबद्ध झालेला असतो ...
गेर्डनर सरोवर (Gairdner Lake)

गेर्डनर सरोवर

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-मध्य भागातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर (Lake). ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या एअर द्वीपकल्पाच्या उत्तरेस या ...
गॉटलंड बेट (Gotland Island)

गॉटलंड बेट

स्वीडनच्या अखत्यारितील बाल्टिक समुद्रातील बेट व प्रांत. गॉटलंड बेटाचा अक्षवृत्तीय विस्तार ५६° ५४’ उ. ते ५७° ५६’ उ. व रेखावृत्तीय ...
गोंदिया शहर (Gondia/Gondiya City)

गोंदिया शहर

महाराष्ट्र राज्याच्या अगदी ईशान्य भागातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,३२,८१३ (२०११). गोंदिया शहर नागपूरच्या ईशान्येस सुमारे १४० किमी ...
गोध्रा शहर (Godhra City)

गोध्रा शहर

भारताच्या गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या १,४३,६४४ (२०११). हे गांधीनगरच्या पश्चिमेस १२५ किमी. वर असून ...
ग्रँड कॅन्यन (Grand Canyon)

ग्रँड कॅन्यन

जगातील सर्वांत मोठी व प्रेक्षणीय कॅन्यन (घळई वा निदरी). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील ॲरिझोना राज्याच्या वायव्य भागात असलेल्या ग्रँड कॅन्यन नॅशनल ...