(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
जिऑइड (Geoid)

जिऑइड

भूगोलाभ. ‘पृथ्वीसारखी आकृती असलेलाʼ असा या शब्दाचा अर्थ आहे. मूळ ग्रीक ‘Geoʼ (पृथ्वी) व ‘Oidisʼ (त्यासारखा) या शब्दांवरून ‘जिऑइडʼ ही ...
जींद शहर (Jind City)

जींद शहर

भारताच्या हरयाणा राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि भूतपूर्व जींद संस्थानची राजधानी. हरयाणातील हे सर्वांत मोठ्या व प्राचीन शहरांपैकी ...
जूबा शहर (Juba City)

जूबा शहर

आफ्रिकेतील साउथ सूदान या देशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ५,२५,९५३ (२०१७). साऊथ सूदान – युगांडा या देशांच्या ...
जेददाय स्ट्राँग स्मिथ (Jedediah Strong Smith)

जेददाय स्ट्राँग स्मिथ

स्मिथ, जेददाय स्ट्राँग (Smith, Jedediah Strong) : (६ जानेवारी १७९९ – २७ मे १८३१). अमेरिकन समन्वेषक आणि फरचा व्यापारी. त्यांचा ...
जॉन कॅबट (John Cabot)

जॉन कॅबट

कॅबट, जॉन : (१४५०-१४९८). इटालियन जिओवन्नी कॅबट. इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. जन्म बहुतेक इटलीतील जेनोआ येथे झाला असावा. इ. स ...
जॉन हॅनिंग स्पीक (John Hanning Speke)

जॉन हॅनिंग स्पीक

स्पीक, जॉन हॅनिंग (Speke, John Hanning) : (४ मे १८२७ – १५ सप्टेंबर १८६४). ब्रिटिश समन्वेषक आणि लष्करी अधिकारी. पूर्व ...
जॉर्ज सरोवर (George Lake)

जॉर्ज सरोवर

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या आग्नेय भागातील एक गोड्या पाण्याचे सरोवर. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरापासून ईशान्येस ४० किमी. अंतरावर, तसेच ग्रेट ...
जोव्हानी दा व्हेराझानो (Giovanni da Verrazano)

जोव्हानी दा व्हेराझानो

व्हेराझानो, जोव्हानी दा (Verrazano, Giovanni da) : (१४८५ – १५२८). इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. त्यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्सजवळील व्हाल दी ...
ज्वालामुखी कुंड (Volcanic Crater)

ज्वालामुखी कुंड

केंद्रीय स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे, ज्वालामुखीच्या माथ्यावरील निर्गमद्वाराशी (मुखाशी) खोलगट बशीसारखा खळगा तयार झालेला दिसतो. असा खळगा लहान म्हणजे साधारणपणे एक ...
ज्वालामुखी महाकुंड (Volcanic Caldera)

ज्वालामुखी महाकुंड

ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकामुळे लाव्हाशंकूच्या मुखाशी खोलगट बशीसारखा खळगा दिसतो. हा खळगा साधारणपणे एक किमी. पेक्षा मोठ्या व्यासाचा असल्यास त्याला ज्वालामुखी ...
झोजी ला खिंड (Zoji La Pass)

झोजी ला खिंड

भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगील जिल्ह्यातील खिंड. समुद्रसपाटीपासून ३,५२८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे. झोजी ला म्हणजे जोरदार ...
झोतवारा (Jet Stream)

झोतवारा

पृथ्वीवरील वातावरणाच्या उच्च थरातून अतिशय वेगाने, नागमोडी वळणांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण रितीने वाहणाऱ्या हवेच्या प्रवाहांच्या लांब व अरुंद पट्ट्याला झोतवारा असे ...
झ्यूजेन (Zeugen)

झ्यूजेन

वाऱ्याच्या झीज (अपक्षरण) कार्यामुळे निर्माण होणारे भूमिस्वरूप. याला ज्यूजेन नावानेही ओळखले जाते. उष्ण वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या झीज कार्यामुळे वेगवेगळी भूमिस्वरूपे ...
टी ॲनाऊ सरोवर (Te Anau Lake)

टी ॲनाऊ सरोवर

न्यूझीलंडमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे, तर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील सर्वांत मोठे सरोवर. दक्षिण बेटाच्या नैर्ऋत्य भागात दक्षिणोत्तर पसरलेल्या या सरोवराची ...
टेकडी (Hill)

टेकडी

स्पष्ट वा वेगळे शिखर असलेल्या जमिनीच्या कमी उंची असलेल्या उंचवट्याला टेकडी म्हणतात. डोंगर टेकडीपेक्षा आणि पर्वत डोंगरापेक्षा उंच असतो. टेकडीच्या ...
टेथिस समुद्र (Tethys Sea)

टेथिस समुद्र

पूर्वी अस्तित्वात असलेला विषुववृत्तीय महासागर (किंवा भूमध्य समुद्र). लॉरेशिया हा उत्तरेकडील महाखंड व गोंडवनभूमी हा दक्षिणेकडील महाखंड मध्यजीव महाकल्पात (सुमारे ...
टेबललँड (Tableland)

टेबललँड

तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबललँड म्हणतात. टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटा वा ...
टॉमस ग्रिफिथ टेलर (Thomas Griffith Taylor)

टॉमस ग्रिफिथ टेलर

टेलर, टॉमस ग्रिफिथ (Taylor, Thomas Griffith) : (१ डिसेंबर १८५० – ५ नोव्हेंबर १९६३). ब्रिटिश भूगोलज्ञ, मानवशास्त्रज्ञ आणि समन्वेषक. टॉमस ...
डार्लिंग नदी (Darling River)

डार्लिंग नदी

ऑस्ट्रेलियातील मरी-डार्लिंग नदीप्रणालीतील सर्वांत लांब नदी. या नदीची लांबी २,७४० किमी. असून संपूर्ण डार्लिंग नदीप्रणालीचे क्षेत्रफळ ६,५०,००० चौ. किमी. आहे ...
डोनेट्स्क शहर (Donetsk City)

डोनेट्स्क शहर

युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांताची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. यास स्टालिनो शहर असेही म्हणतात. लोकसंख्या सुमारे ९,६,००० (२०१९). युक्रेनच्या आग्नेय ...