(प्रस्तावना) पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | समन्वयक : प्रसाद आकोलकर | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
कोणत्याही देशाची ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी त्या देशात विकसित झालेले धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. धर्मसंकल्पनेतून देशाच्या धारणा ध्यानात येतात, तर तत्त्वज्ञानाद्वारे देशाची वैचारिक समृद्धी व्यक्त होते. सदर ज्ञानमंडळात भारतामध्ये विकसित झालेले आणि प्रचलित असलेले धर्म तसेच तत्त्वज्ञान या दोहोंविषयी नोंदवजा माहिती सादर येणार आहे.
भारतात वैदिक-पौराणिक हिंदू, जैन, शीख इ. धर्म, त्या धर्मांच्या अनुषंगाने उगम पावलेले रितीरिवाज, धार्मिक संकल्पना, विधी, उत्सव, व्रते, संस्कार, कथा, दैवते, प्रमुख ग्रंथ, व्यक्तिनामे, तीर्थक्षेत्रे, यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तसेच भारतामध्ये उगम पावलेली आणि विकसित झालेली आस्तिक व नास्तिक दर्शने, त्यातील प्रमुख तत्त्वे, तत्त्वज्ञ, संकल्पना, पारिभाषिक संज्ञा, महत्त्वपूर्ण ग्रंथ, ग्रंथकार, इ. नोंदप्रकारांचा समावेश करण्यात येईल. नोंदींच्या स्पष्टीकरणासाठी चित्रे, आकृती, तक्ते, नकाशे देण्यात येतील. भारतात रुजलेल्या परंतु विदेशात स्वतंत्रपणे फोफावलेल्या धर्म व तत्त्वज्ञान प्रणालींचा येथे विचार केला जाणार नाही. उदा., जपानमध्ये विकसित झालेला झेन धर्म. त्याचप्रमाणे भारताबाहेर विकसित झालेल्या पण भारतामध्ये रुजलेल्या धर्म आणि तत्त्वज्ञान प्रणालींचा येथे विचार केला जाईल, उदा., सूफी पंथ. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान या ज्ञानमंडळासाठी वैदिक धर्म आणि तत्त्वज्ञान, देव-देवता, स्मृती व धर्मशास्त्रे, पुराणे, तंत्रशास्त्रे, मंदिरनिर्माण, धार्मिक प्रथा-परंपरांच्या अनुषंगाने विकसित झालेल्या कला व कथा, लोकधर्म, लोकसंस्कृती, पंथ, आस्तिक दर्शने, नास्तिक दर्शने, भक्तिसांप्रदाय, संत व विचारवंत, इत्यादी उपविषय असतील.
पारिभाषिक शब्दांच्या नोंदीमध्ये शब्दाची व्युत्पत्ती प्रथम दिली जाईल, त्यानंतर शब्दाचे स्पष्टीकरण दिले जाईल. ग्रंथाच्या नोंदीबाबतीत ग्रंथाचा काळ, ग्रंथकाराचे नाव, ग्रंथाचा विषय, ग्रंथाची रचना व स्वरूप सादर करण्यात येईल. व्यक्तिनामे असल्यास व्यक्तीचा काळ, संक्षिप्त कौटुंबिक माहिती, कार्यक्षेत्रातील योगदान दिले जाईल. स्थलनामांसाठी नकाशे वापरण्यात येतील.
प्रत्यक्ष (Positive; Perception)

प्रत्यक्ष

न्यायदर्शनातील पहिले व महत्त्वाचे प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष होय. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान मिळविण्याचे साधन. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या ...
प्रश्नोपनिषद (Prashnopanishad)

प्रश्नोपनिषद

प्रस्तुत उपनिषद अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेचे आहे. या उपनिषदाचे स्वरूप प्रश्नोत्तररूपी असल्याने याचे नाव ‘प्रश्नोपनिषद’ असे आहे. यातील खंडांनाही ‘प्रश्न’ असेच ...
प्रस्थानत्रयी (Prasthanatrayi)

प्रस्थानत्रयी

वेदान्ताचे मुख्य तीन ग्रंथ म्हणजे उपनिषदे, भगवद्‌गीता आणि बादरायणाची ब्रह्मसूत्रे. या तीन ग्रंथांना मिळून ‘प्रस्थानत्रयी’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे मार्ग. ब्रह्मविद्या ...
बुद्धी (Buddhi)

बुद्धी

सांख्यांच्या २५ तत्त्वांपैकी एक. अनेक विषयांमध्ये या संज्ञाचा वापर केला जात असून येथे फक्त सांख्य तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने ऊहापोह केला गेला ...
ब्रह्म (Brahma)

ब्रह्म

भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. सुरुवातीस त्याचे अर्थ ‘मंत्र’, ‘देवतास्तवन’, ‘प्रार्थना’, ‘मंत्राच्या ठिकाणी ...
भगवद्गीतेवरील प्राचीन भाष्ये (Ancient Commentaries on the Bhagavadgita)

भगवद्गीतेवरील प्राचीन भाष्ये

उपनिषदे, बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे, व भगवद्गीता यांना वेदान्ताची ‘प्रस्थानत्रयी’ मानले जाते. सारा वेदान्तविचार या प्रस्थानत्रयीवर आधारलेला आहे. प्रस्थान याचा अर्थ ‘उगमस्थान’ ...
मध्वाचार्य (Madhvacharya)

मध्वाचार्य

मध्वाचार्य : ( सु. ११९९—सु. १२७८ ). वैष्णव संप्रदायातील द्वैत-वेदान्त-मताचे प्रवर्तक. मध्वाचार्य यांचा जन्म दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील उडिपी गावाजवळील रजतपीठ ...
माण्डूक्योपनिषद (Mandukyopanishad)

माण्डूक्योपनिषद

दशोपनिषदातील आकाराने लहान पण अतिशय आशयघन असलेले माण्डूक्योपनिषद हे अथर्ववेदाचे उपनिषद आहे. या उपनिषदाचा कर्ता अज्ञात असून याचा काळ इ.स.पू ...
मुण्डकोपनिषद (Mundakopanishad)

मुण्डकोपनिषद

अथर्ववेदाशी संबंधित असलेले अतिशय महत्त्वाचे असे हे उपनिषद. नऊ प्रमुख उपनिषदांपैकी एक आहे. कालदृष्ट्या तसेच आशयाच्या दृष्टीने हे उपनिषद कठोपनिषदाशी ...
रहस्यवाद (Mysticism)

रहस्यवाद

‘रहस्यवाद’ वा ‘गूढवाद’ हे पद विश्वाचे अंतिम सत्यस्वरूप आणि ते जाणून घेण्याचा मार्ग यांविषयी एक विशिष्ट समजूत, भूमिका अथवा प्रवृत्ती ...
लकुलीश (Lakulisha)

लकुलीश

लकुलीश : (इ.स.सु. २००). शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार मानला जातो. त्याला ‘नकुलीश’ असेही म्हणतात. गुजरातमधील ‘कायारोहण’ (सध्याचे ...
लोकायतदर्शन (Lokayata / Charvak Darshan)

लोकायतदर्शन

चार्वाकदर्शन : एक प्राचीन भारतीय दर्शन. म्हणजे विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान. हे दर्शन हा भौतिकवाद आहे. देहाहून वेगळा आत्मा नाही; ...
वल्लभाचार्य (Vallabhacarya)

वल्लभाचार्य

वल्लभाचार्य : (१४७९—१५३१). वल्लभ पंथ, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय, पुष्टिमार्ग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या एका भक्तीमार्गी वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक. ते ...
वागाम्भृणीय सूक्त (Vagambhruniya Sukta)

वागाम्भृणीय सूक्त

भारतीय साहित्यामध्ये आद्यग्रंथ मानल्या गेलेल्या ऋग्वेदाची विभागणी दहा मंडलांमध्ये केलेली आहे. यातील पहिले आणि दहावे मंडल हे कालदृष्ट्या नंतरचे मानले ...
विष्णुबुवा ब्रह्मचारी (Vishnubuva Brahmachari)

विष्णुबुवा ब्रह्मचारी

विष्णुबुवा ब्रह्मचारी : ( ? १८२५ – १८ फेब्रुवारी १८७१). स्वतंत्र विचारसरणीचे धर्मसुधारक व एक विचारवंत. त्यांचे मूळ नाव विष्णू ...
व्याकरण अध्ययनाची प्रयोजने (Purposes of Grammar Studies)

व्याकरण अध्ययनाची प्रयोजने

व्याकरणाचे प्राचीन नाव शब्दानुशासन असे आहे. महर्षी पाणीनी हे संस्कृत वाङ्मयाचे तत्त्ववेत्ते होते. त्यांनी आपल्या व्याकरणशास्त्रात वैदिक आणि लौकिक अशा ...
शब्दब्रह्म (Shabdabrahma)

शब्दब्रह्म

शब्दब्रह्म हा सामासिक शब्द असून शब्दात्मक ब्रह्म असा त्याचा विग्रह आहे. हा शब्द वेदात्मक व स्फोटात्मक असून नित्य शब्दरूपी ब्रह्म ...
शब्दानुशासन (Shabdanushasan)

शब्दानुशासन

संस्कृतमध्ये व्याकरणशास्त्राला ‘शब्दानुशासन’ असे संबोधले जाते. सर्वप्रथम ही संज्ञा पतंजलीकृत महाभाष्याच्या प्रारंभी येते. भाष्याची सुरुवात ‘अथशब्दानुशासनम्’ या वार्तिकाने (टीकेने) होते ...
शाह वलीउल्लाह (Shah Waliullah)

शाह वलीउल्लाह

वलीउल्ला, शाह : (२१ फेब्रुवारी १७०३—२० ऑगस्ट १७६२). इस्लामी धर्मशास्त्रवेत्ते. संपूर्ण नाव शाह वलीउल्ला, कुत्बुद्दीन अहमद बिन् अब्द अल् रहीम ...
शिव-अद्वैत (Shiv-Advait)

शिव-अद्वैत

भगवान शिवाशी एकत्वाचे तत्त्व मानणारा हा पाशुपत, कापालिक व इतर माहेश्वर पंथांप्रमाणेच एक शैव पंथ आहे. श्रीकंठाचार्य हे या पंथाचे ...