(प्रस्तावना) पालकसंस्था : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | समन्वयक : उत्तरा सहस्त्रबुद्धे | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
आंतरराष्ट्रीय संबंध हा एक स्वतंत्र विषय म्हणून दोन महायुद्धादरम्यानच्या काळात अस्तित्वात आला. तत्पूर्वी राजनयिक इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन विषयांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंधातील संकल्पनांचा अभ्यास होत असे. नव्याने एक विद्याशाखा म्हणून उदयास आलेल्या या विषयाचा अभ्यास स्वभावत: आंतरविद्याशाखीय पद्धतीने होतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनेक मुलभूत संकल्पना राज्यशास्त्रातून घेतलेल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सैद्धांतिक अभ्यासावर राज्यशास्त्रातील पारंपरिक आणि नव्या सिद्धांतांचा प्रभाव आहे. परराष्ट्र धोरण आणि राजनय यांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा महत्त्वाचा भाग आहे. यात विविध देशांची परराष्ट्र धोरणे, त्यांच्यातील आंतरक्रिया आणि त्या देशांचा राजनय यांचा समावेश होतो. विविध देशांमधील संघर्षाचे स्वरूप, संघर्षाच्या विविध प्रकारांचा, सुरक्षेचा आणि संबंधित संकल्पनांचा समावेशही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात होतो. आजच्या काळात विविध क्षेत्रीय संघटना आणि जागतिक संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अतिमहत्त्वाचा भाग आहेत. अनेकदा दोन देशांतील संघर्षांचे स्वरूप, देशांची परराष्ट्रनीती किंवा जागतिक संघटनांचे कामकाज समजून घेताना आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास अनिवार्य ठरतो. क्षेत्रीय सहकार्य आणि जागतिकीकरण या संकल्पनांचा सखोल अभ्यासही आंतरराष्ट्रीय संबंधांच्या आकलनासाठी अत्यावश्यक ठरतो.

आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासताना राजकारणाइतकेच महत्त्व आंतरराष्ट्रीय अर्थकारणाला आहे. आजची आंतरराष्ट्रीय समीकरणे ही मुख्यत्वे राष्ट्रांचे आर्थिक हित आणि त्यांच्या वित्तीय समीकरणांवर अवलंबून असतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या आकलनासाठी व्यापारविषयक संज्ञा आणि संकल्पना, जागतिक आर्थिक व्यवस्थेला आकार देणाऱ्या ब्रेटनवूड्स संस्थांचा आणि त्यांच्या बदलत्या स्वरूपाचा व कार्यपद्धतीचा आढावा घेणे गरजेचे आहे.

क्षेत्र-अभ्यास हादेखील आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचाच एक भाग आहे. यामध्ये जगातील विविध क्षेत्रांचा (जसे – दक्षिण आशिया, पश्चिम युरोप, लॅटिन अमेरिका) अभ्यास केला जातो. त्यात एखाद्या क्षेत्रातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, वांशिक, राजकीय आणि आर्थिक वैशिष्ट्यांची आणि त्यांची आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा ओघानेच येते. पर्यावरण, मानवाधिकार इत्यादी मानवी अस्तित्वाशी निगडित काही समस्या जागतिक पातळीवर सहकार्यातूनच सुटण्याची शक्यता वर्तविली जाते. त्या प्रश्नांतील तथ्य, त्या संबंधीची मतमतांतरे आणि त्या समस्यांच्या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रयत्नांचे विश्लेषण, हे या मुद्दयांच्या आणि पर्यायाने नव्याने उदयास आलेल्या व समांतर अस्तित्व असलेल्या या आंतरराष्ट्रीय राजकरणाच्या अभ्यासासाठी आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करताना आजच्या काळातील प्रचलित संज्ञा, संकल्पना, मुद्दे आणि धोरणांची किमान तोंडओळख असणे आवश्यक आहेच, शिवाय कालबाह्य संज्ञा, संकल्पना, मुद्दे आणि धोरणांच्या मर्यादा समोर येणेही महत्त्वाचे आहे.

अटलांटिक सनद (Atlantic Charter)

अटलांटिक सनद (Atlantic Charter)

अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलंडजवळ एका बोटीवर विचार विनिमय करून ...
अण्वस्त्रप्रसारबंदी करार (Treaty on Non-Proliferation of Nuclear Weapons)

अण्वस्त्रप्रसारबंदी करार (Treaty on Non-Proliferation of Nuclear Weapons)

अण्वस्त्रांचा, अणुतंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे, अणूऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे, आण्विक निःशस्त्रीकरण आणि पूर्ण निःशस्त्रीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ...
अराज्य घटक (Non State Actors)

अराज्य घटक (Non State Actors)

आंतरराष्ट्रीय राजकारणात असणाऱ्या परंतु सार्वभौमत्व नसणाऱ्या घटकांना अराज्य घटक मानले जाते. मात्र या घटकांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबतींत राष्ट्रीय ...
अलगतावाद (Separatism)

अलगतावाद (Separatism)

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे एक सूत्र. आपल्या परराष्ट्र नीतीचा पाया म्हणून अलगतेचा अंगीकार अमेरिकेने प्रथमपासून केला व पहिल्या महायुद्धापर्यंत यशस्वी रीतीने ...
आंतरराष्ट्रीय कायदा (International Law)

आंतरराष्ट्रीय कायदा (International Law)

आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे “ढोबळमानाने आंतरराष्ट्रीय समुदायातील सभासदांच्या परस्परसंबंधांवर बंधनकारक ठरणारी काही तत्त्वे आणि काही विशिष्ट नियम यांचे संकलन होय”. सर ...
आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)

आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)

संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख ६ अंगांपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय हे न्यायविषयक अंग आहे. आंतरराष्ट्रीय विवादांत मध्यस्थी करू शकेल अशी संस्थात्मक संरचना निर्माण ...
आंतरराष्ट्रीय व्यवस्था (International Order)

आंतरराष्ट्रीय व्यवस्था (International Order)

मॉर्टन कॅप्लन, केनेथ वॉल्ट्झ, ह्यूगो ग्रोशियस, जोसेफ फ्रँकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची व्याख्या करण्यात आणि या संकल्पनेचा विस्तार करण्यात मोठे योगदान ...
आमसभा, संयुक्त राष्ट्रांची (General Assembly of UN)

आमसभा, संयुक्त राष्ट्रांची (General Assembly of UN)

संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक अंग. आमसभेत सर्व सभासददेशांना समान प्रतिनिधित्व आहे. ही संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत अंतर्भूत असणाऱ्या सर्व ...
आर्क्टिक परिषद (Arctic Council)

आर्क्टिक परिषद (Arctic Council)

आर्क्टिक परिषद हा आर्क्टिक देश, आर्क्टिक मूलनिवासी समुदाय आणि इतर आर्क्टिक रहिवासी यांच्यातील ‘शाश्वत विकास’ आणि ‘पर्यावरणीय संरक्षण’विषयक सहकार्याला आणि ...
आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग (Asia Africa Growth Corridor)

आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग (Asia Africa Growth Corridor)

आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांमध्ये संपर्क आणि सहयोग वृद्धीसाठी तसेच खंडांतर्गत विकास साधता यावा यासाठी भारत आणि जपान यांनी ...
इतिहासाचा अंत (End of History)

इतिहासाचा अंत (End of History)

द नॅशनल इंटरेस्ट या परराष्ट्र धोरणासंबंधित नियतकालिकाच्या १९८९च्या उन्हाळी आवृत्तीत अमेरिकन नवरूढिवादी राज्यशास्त्रज्ञ फ्रान्सिस फुकुयामा यांनी लिहिलेला ‘इतिहासाचा अंत’ (एंड ...
उच्च राजकारण (High Politics)

उच्च राजकारण (High Politics)

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वास्तववादी दृष्टिकोनाचे समर्थक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उच्च राजकारण व निम्न राजकारण असे विभाजन करतात. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी जोडलेल्या विषयांचा समावेश ...
उदारमतवाद (Liberalism)

उदारमतवाद (Liberalism)

उदारमतवादाची गृहीतके : आंतरराष्ट्रीय संबंध हे अभ्यासाचे एक वेगळे क्षेत्र म्हणून उदयास येण्यापूर्वीच उदारमतवादी विचारधारा अस्तित्त्वात होती. १६८८ मध्ये इंग्लंडमध्ये ...
ओपेक (Opec)

ओपेक (Opec)

पार्श्वभूमी : खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी ही एक बहुराष्ट्रीय संघटना आहे . तेरा सभासद देश असलेल्या  ‘ऑर्गनायझेशन ऑफ ...
क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol)

क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol)

हा आंतरराष्ट्रीय करार असून ज्याचा उद्देश कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन आणि वातावरणातील हरितगृह वायू यांचे प्रमाण कमी करणे होय. हा करार ...
गटनिरपेक्षता (Non-Alignment)

गटनिरपेक्षता (Non-Alignment)

शीतयुद्धाच्या काळात लोकशाहीवादी अमेरिका आणि साम्यवादी सोव्हिएट युनियन यांच्यातील विचारसरणीमधील संघर्षातून अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि सोव्हिएट युनियन व त्यांची ...
जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation)

जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation)

पार्श्वभूमी : जागतिक व्यापार संघटना ही आंतरशासकीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करते. दिनांक १५ एप्रिल १९९४ रोजी १२३ राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या ...
जी–८ (G-8)

जी–८ (G-8)

जी–८ हा आठ देशांचा एक गट आहे. मात्र सध्या या गटात सातच देश आहेत (रशियाने क्रिमियाच्या विलीनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे रशियाला ...
जी—२० (G-20)

जी—२० (G-20)

आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या २० देशांची आणि त्या देशांच्या केंद्रिय बँकेच्या गव्हर्नरांची एक संघटना. जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा ...
देशांतरित जनसमूह (Diaspora)

देशांतरित जनसमूह (Diaspora)

‘डायस्पोरा’ या इंग्रजी शब्दाचा उगम एका ग्रीक शब्दातून झाला. ज्याचा अर्थ ‘विखुरणे’ असा आहे. डायस्पोरा अर्थात देशांतरित जनसमूह म्हणजे माणसांचा ...