(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
निसर्ग आणि गणित यामधील अतूट संबंध अतिप्राचीन काळापासून मानव शोधत आहे. पशुपक्षी, वनस्पती, मनुष्य यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या निवाऱ्‍यांमध्ये मानवनिर्मित सर्व गोष्टींमध्ये एवढेच नव्हे तर निसर्गात घडणाऱ्या सर्व खगोलीय घटनांमागे गणितीय संकल्पना दडलेल्या आहेत. प्राचीन काळातच निसर्गातील विविध गोष्टींचे निरीक्षण नोंदविताना कधीतरी अंकांचा जन्म झाला असावा आणि त्यातूनच पुढे सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या गणितशास्त्राचा जन्म झाला असावा.माणसाने गणितशास्त्राची निर्मिती आपल्या आजूबाजूचे जग कसे आहे? त्यात अनेक परस्पर संबंध नसलेल्या ज्या घटना घडत असतात त्यांचा उगम आणि अंत जाणून घेण्यासाठी केला असेही म्हणता येईल.गणितशास्त्र म्हणजे माणसाने निर्माण केलेली आद्य आणि सर्वोच्च विद्या आहे.अतिप्राचीन काळापासून जवळजवळ सगळ्याच संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात झालेली आढळते. भारताला तर गणिताची महान परंपरा आहे.

गणित या शब्दाची व्याख्या गणेशदेवज्ञ यांनी आपल्या बुद्धिविलासिनी या ग्रंथात पुढीलप्रकारे केली आहे. “गण्यतेसंख्यायतेतद् गणितम्l”म्हणजे ज्याद्वारे परिकलन केले जाते किंवा मोजदाद केली जाते.ते गणित होय. गणित म्हणजे निरीक्षणातून आलेल्या निष्कर्षांची, संकल्पनांची सूत्रबद्धरीतीने मांडणी करून त्यातील सहसंबंध दर्शविणारी सूक्ष्म वैज्ञानिक प्रणाली होय.गणिताशास्त्रात नुसते अंक,चिन्हे एवढेच नसतात तर शून्य,अनंत अशा संकल्पनाही असतात.

गणितशास्त्राचा उपयोग भौतिक, रसायन, खगोल, व्यापार, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांमध्ये होतोच याशिवाय संगीत, चित्रकला इत्यादी कलांमध्येहीहोतो संगणकशास्त्राचा पाया गणितशास्त्रातच आहे. यामुळेच गणितशास्त्रचा अभ्यास करणे अनिवार्य झाले .

“सांख्यिकी म्हणजे संख्यात्मक व वर्णनात्मक माहिती (डेटा) गोळा करणे, त्याची पुनर्मांडणी करणे, त्याचे विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढणे व यांच्या विविध पद्धतींचा शास्त्रीय अभ्यास होय”. नियोजनासाठीसंख्याशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे. या नियोजनाच्या युगात सरकार किंवा व्यावसायिक संख्याशास्त्राचा उपयोग करून कामांमध्ये कार्यक्षमता आणतात. आधुनिक काळात संख्याशास्त्राच्या मदतीने विमाशास्त्राचा अधिक विकास झाला व त्यातून विमा गणितशास्त्र ही संख्याशास्त्राची नवीन शाखा उदयास आली.

संख्याशास्त्राचा अर्थशास्त्रात,जीवशास्त्रात,खगोलशास्त्रात, वैद्यकीयशास्त्रात, मानसशास्त्रात अचूक निर्णयासाठी उपयोग केला जातो. संरक्षणशास्त्रातही संख्याशास्त्राचा उपयोग केला जातो. तसेच क्रीडा, कृषी, वाणिज्य, मानव्यविद्या, संगणकशास्त्र, हवामानशास्त्र अशा क्षेत्रातही संख्याशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे.विश्वातील एकही क्षेत्र असे नाही, जेथे संख्याशास्त्राचा वापर होत नाही.जीवनातील प्रत्यक घडामोडीत संख्याशास्त्राचे दर्शन होते. जन्मापासून मृत्यू पर्यंत मानवी जीवनाचा संख्याशास्त्राशी संबंध येतो, म्हणून संख्याशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.

जातस्य हि ध्रुवा संख्या ध्रुवा संख्या मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येSर्थे संख्याशास्त्रं पठाम्यहम् ॥

बहुभुजाकृती (Polygon)

बहुभुजाकृती

मर्यादित सरळ रेषाखंडांपासून बनलेली (अनेक ‘भुजा’ असलेली) बंद द्विमितीय, भूमितीय आकृती म्हणजे बहुभुजाकृती. भुजांची संख्या दर्शवण्यासाठी बहुभुजाकृतीचे नाव ‘संख्या’भुज असे ...
बीजशोधन प्रमेय (Location of Roots Theorem)

बीजशोधन प्रमेय

आलेख क्र. 1 बीजशोधनाचे प्रमेय : या प्रमेयाचे विधान पुढीलप्रमाणे आहे : समजा f हे एक संतत फलन (continuous function) ...
बेजचे प्रमेय (Bayes' Theorem)

बेजचे प्रमेय

ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ सर हॅरॉल्ड जेफ्रीज यांच्या मते, संभाव्यता शास्त्रामध्ये बेजच्या प्रमेयाचे स्थान हे भूमितीमधील पायथॅगोरसच्या प्रमेयाच्या स्थानाइतकेच महत्त्वाचे आहे. या ...
भारतीय गणित (Indian Mathematics)

भारतीय गणित

भारतीय गणित ही भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्राचीन काळापासून भारतात गणिताचा अभ्यास आणि संशोधन मोठ्या प्रमाणावर ...
3x + 5y + xy = 62

प्राचीन भारतीय गणित साहित्यात ‘भावित’ ही संकल्पना आढळून येते. भास्कराचार्य (द्वितीय) यांनी त्यांच्या वयाच्या 36 व्या वर्षी म्हणजे सन 1150 ...
मजकूर-मंथन (Text Mining)

मजकूर-मंथन

शोध संकेतस्थळाद्वारे दिलेल्या शब्दावरून इच्छित संकेतस्थळावर किंवा त्यामधील एखाद्या पानावर जाणे हे मजकूर-मंथन या विद्याशाखेमुळे शक्य होते. संख्या विश्लेषणात संख्यात्मक ...
मध्य मूल्य प्रमेय (Intermediate Value Theorem)

मध्य मूल्य प्रमेय

गणितातील सिद्धांतांची प्रतवारी करणे शक्य नाही; मात्र जे सिद्धांत पुन:पुन्हा उपयोगात येतात अशांना सर्वसामान्यत: अग्रक्रम दिला जातो. मध्य मूल्य प्रमेय ...
मूळ संख्यांचे प्रमेय (Prime Number Theorem)

मूळ संख्यांचे प्रमेय

मूळ संख्यांचे प्रमेय (Prime Number Theorem) सर्वप्रथम १८ व्या शतकात आद्रीअँ मारी लझांद्र आणि कार्ल फ्रीड्रिख गौस (गाउस) यांनी स्वतंत्रपणे ...
रुबिक घन (Rubik's cube)

रुबिक घन

ऐंशीच्या दशकातील अत्यंत लोकप्रिय असा गणिती खेळ. हंगेरियन वास्तुविशारद एर्नो रुबिक यांच्या बुद्धिमत्तेतून १९७४ मध्ये या घनाचा जन्म झाला. विद्यार्थ्यांना ...
वर्ग आणि वर्गमूळ (Square and Square root)

वर्ग आणि वर्गमूळ

वर्ग (Square) : गणितात एखाद्या संख्येने त्याच संख्येला गुणण्याच्या क्रियेला वर्ग करणे असे म्हणतात. कोणत्याही संख्येचा वर्ग करताना त्या संख्येचा घातांक ...
वर्णनात्मक सांख्यिकी (Descriptive Statistics)

वर्णनात्मक सांख्यिकी

सांख्यिकी या विज्ञान शाखेत विदाचे (data) संकलन, वर्गीकरण अथवा सादरीकरण, विश्लेषण आणि अर्थान्वय या चार टप्प्यांचा समावेश होतो. एखाद्या वस्तूच्या ...
वर्तुळ (Circle)

वर्तुळ

एका केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचास वर्तुळ असे म्हणतात. आकृतीत बिंदू O हा केंद्रबिंदू आहे व O या केंद्रबिंदूपासून ...
ax+b = py

कुट्टक म्हणजे कूट प्रश्न. प्राचीन भारतीय गणित साहित्यात अनेक कुट्टके आढळून येतात. सामान्यतः ही कुट्टके (problems) एकचल (one variable), द्विचल(two ...
वारंवारता वितरण ( Frequency Distribution)

वारंवारता वितरण

एखाद्या कारखान्यात कामगार किती दिवस गैरहजर राहतात, यासाठी वारंवारता वितरण या पद्धतीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदा., १ ...
\mathbb{R}

विकलन

फलनाची विकलन ही कलनशास्त्रातील अतिशय मूलभूत संकल्पना आहे. या संकल्पनेला अवकलन असेही म्हणतात. यूरोपमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना थोर गणितज्ञ आयझॅक ...
विमाविज्ञान (Actuarial Science )

विमाविज्ञान

जीवन विमा, अपघाती विमा, प्रवास विमा यासारख्या विमा उत्पादनांशी प्रत्येकाचा संबंध येतच असतो. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, मोटारीचा अपघात, एखादी वास्तू आगीच्या ...
वेन आकृती (Venn Diagram)

वेन आकृती

संच (Set) लिहिण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा वापर केला जातो. अशा आकृत्यांना ‘वेन आकृती’ असे म्हणतात. या पद्धतीचा शोध ...
\pi

प्राचीन काळी मुद्रणकला विकसित झालेली नव्हती. भूर्जपत्रांवरही लेखन करण्याची कला फारशी परिचित नव्हती. सर्व वैज्ञानिक आणि गणिती संकल्पना शब्दबद्ध आणि ...
शुल्बसूत्रांतील गणित

शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या सहा वेदांगांपैकी कल्प या वेदांगाचा श्रौतसूत्र हा एक विभाग आहे. वैदिक संहितांमध्ये व ...
शून्य (Zero)

शून्य

फार प्राचीन काळापासून शून्य ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शून्याच्या संगतीमुळे संख्येच्या किमतीत होणारा बदल हा नेहमीच आनंददायी असतो. शून्य ...