(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
मध्ययुग ही इतिहासातील विशिष्ट कालखंड दर्शविणारी एक संज्ञा होय. तिचा प्रदेशपरत्वे कालखंड भिन्न असून मध्ययुगीन कालखंड केव्हा सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची संदिग्धता आढळते; तथापि यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन इतिहासकारांनी रूढ केली व तीच सर्व पाश्चात्त्य देशांत ग्राह्य ठेवली. इ. स. सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात.

भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय. त्यांतून सम्राट हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. त्यानंतर बिल्हणाचे विक्रमांकदेवचरित, हेमचंद्राचे कुमारपालचरित, संध्याकर नंदीचे रामचरित, मेरुतुंगाचा प्रबंध चिंतामणी वगैरे ग्रंथांतून मध्ययुगीन राजसत्तांविषयी माहिती मिळते. कल्हणाच्या राजतरंगिणीत काश्मीरच्या राजवंशाचा इतिहास आहे. हे काही निवडक ग्रंथ सोडले तर या काळाविषयी बखरी, शिलालेख, प्रवासवर्णने, सनदा, नाणी इ. साधनांचा आधार घ्यावा लागतो.

भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची विभागणी तीन भागांत केली जाते. पूर्व मध्ययुग, मध्ययुग आणि उत्तर मध्ययुग. कनौजचा सम्राट हर्षवर्धन (कार. ६०६–सु. ६४७) याचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने पराभव केला. तिथून पूर्व मध्ययुगाची सुरुवात मानली जाते. काही अभ्यासकांच्या मते गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर (इ. स. ५५५) पूर्व मध्ययुगाची सुरुवात होते. मध्ययुगीन कालखंडातील मध्याची सुरुवात १२ व्या शतकात होऊन त्याचा शेवट १६ व्या शतकात होतो. तर मोगल साम्राज्याचा उदय आणि त्यापुढील कालखंड हा उत्तर मध्ययुगीन कालखंड समजला जातो.

एकूणच जागतिक मध्ययुगीन इतिहासाबरोबर भारतातील पूर्व, मध्य आणि उत्तर मध्ययुगीन या कालखंडांतील १. राजवंश, २. राजे, ३. प्रसिद्ध व्यक्ती, ४. परकीय प्रवासी, ५. संत, ६. किल्ले, ७. वास्तू, मंदिरे, मूर्ती, वीरगळ, ८.सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थिती, ९. बखरी / इतिहासाची साधने, १०. उत्खनने आणि ११. मध्ययुगीन लढायांतील आयुधे इत्यादींवर योग्य, स्वतंत्र व संक्षिप्त नोंदी मराठी विश्वकोशाच्या या मध्ययुगीन इतिहास – भारतीय व जागतिक या ज्ञानमंडळात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांतील नोंदींची व्याप्ती त्या त्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन ठरविली आहे. थोडक्यात, इसवी सन ६०० ते इसवी सन १८०० हा काळ या ज्ञानमंडळाचा अभ्यासविषय राहील. मराठी विश्वकोशाच्या परंपरेनुसारच या ज्ञानमंडळातील नोंदींचा दर्जा उच्च राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून सर्व वाचकांसाठी मध्ययुगीन इतिहासातील अद्ययावत ज्ञानाचे दालन आम्ही खुले करीत आहोत. आमच्या या प्रयत्नांचे निश्चित स्वागत होईल, अशी खात्री आहे.

फिरोझशाह बहमनी (Firuz Shah Bahmani)

फिरोझशाह बहमनी

बहमनी साम्राज्याचा आठवा सुलतान (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२). मूळ नाव ताजुद्दीन फिरोझ. फार्सी इतिहासकार फिरिश्ताच्या मते, हा दाऊदशाह ...
फिरोझाबाद (Firozabad)

फिरोझाबाद

भारतीय मध्ययुगीन कालखंडातील दख्खनमधील एक शहर. बहमनी सुलतान फिरोझशाह बहमनी (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२) याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा ...
फ्रान्सिस्क (Francisque)

फ्रान्सिस्क

फ्रान्समधील गुलामगिरीविषयक खटल्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती. मूळचा दक्षिण भारतातील. त्याच्या पूर्व व उत्तरायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला फ्रान्समध्ये घेऊन ...
फ्रान्स्वा बर्निअर (Francois Bernier)

फ्रान्स्वा बर्निअर

बर्निअर, फ्रान्स्वा : (२५ सप्टेंबर १६२० – २२ सप्टेंबर १६८८). मोगल काळात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी. पश्चिम फ्रान्समधील अँजू प्रांतातील ...
फ्रान्स्वा मार्टिन (Francois Martin)

फ्रान्स्वा मार्टिन

मार्टिन, फ्रान्स्वा : (१६३४–१७०६). दक्षिण भारतातील पाँडिचेरी (पुदुच्चेरी) या तत्कालीन फ्रेंच वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा आयुक्त ...
बहमनी सत्तेचा उदय

मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते ...
बाणकोट (हिम्मतगड) (Bankot Fort)

बाणकोट

महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन किल्ला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून ३५ किमी. अंतरावर हा किल्ला असून पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखावर ...
बार्थोलोम्यू दीयश (Bartholomeu Dias)

बार्थोलोम्यू दीयश

बार्थोलोम्यू दीयश : (१४५०-२९ मे १५००). आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या भूशिराचा शोध लावणारा पोर्तुगीज दर्यावर्दी व समन्वेषक. त्याचे ...
बाल्ख मोहीम (Balkh Campaign)

बाल्ख मोहीम

मोगलांची बाल्ख मोहीम : (१६४६-४७). मोगलांनी उझबेकी आक्रमण थोपविण्यासाठी अफगाणिस्तानातील बाल्ख येथे काढलेली एक महत्त्वाची पण अल्पकालीन मोहीम. मोगल साम्राज्याचा ...
बीदर (Bidar)

बीदर

बीदर : (राजकीय इतिहास). कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील एक इतिहासप्रसिद्ध शहर व जिल्ह्याचे ठिकाण. हे हैदराबादपासून १५० किमी. तर मुंबईपासून ...
बीरबल (Birbal)

बीरबल

बीरबल : (१५२८–१५८६). अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व अकबराचा विश्वासू मित्र. त्याचे मूळचे नाव महेशदास. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरपासून ७८ ...
भगवंतराव अमात्य (Bhagvantrao Amatya)

भगवंतराव अमात्य

भगवंतराव अमात्य : ( ७ फेब्रुवारी १६७७— ? १७५५). कोल्हापूर व सातारा संस्थानांचे अमात्य. शिवकाळातील मुत्सद्दी व आज्ञापत्राचे कर्ते रामचंद्रपंत अमात्य ...
भवानीगड (Bhavanigad)

भवानीगड

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील एक किल्ला. हा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून १० किमी. अंतरावरील तुरळ या गावाजवळ आहे. तुरळ गावापासून कडवई ...
भारतात आलेले परकीय प्रवासी  (Foreign Travellers in India)

भारतात आलेले परकीय प्रवासी  

भारतात आलेले परकीय प्रवासी  : (सहावे ते अठरावे शतक). प्राचीन काळापासून जगभरातल्या लोकांना भारतातील समृद्धता, सुबत्ता यांचे आकर्षण होते. याच ...
भारतातील आर्मेनियन (Armenians in India)

भारतातील आर्मेनियन

पश्चिम आशियातील एक महत्त्वाचा देश व पूर्वीच्या सोव्हिएत संघराज्यातील एक घटक राज्य असलेला आर्मेनियाचा इतिहास प्राचीन आहे. इ. स. चौथ्या ...
भैरवगड (Bhairavgad)

भैरवगड

सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोड्या अलग झालेल्या एका डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी ...
मंडणगड (Mandangad Fort)

मंडणगड

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. मंडणगड या तालुक्याच्या गावातून चार किमी. अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर माथ्यापर्यंत जाता येते. या किल्ल्याची ...
मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) (Matsyendranath)

मत्स्येंद्रनाथ

नाथ संप्रदायातील एक थोर योगी. कौल योगिनी संप्रदायाचे प्रवर्तक. चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक महत्त्वाचे सिद्ध. मत्स्येंद्रनाथांना मच्छंद, मच्छघ्नपाद, मच्छेंद्रपाद, मत्स्येंद्रपाद, मीनपाद, ...
मध्ययुगीन नाणकशास्त्र (Medieval Numismatics / Coins of Medieval India)

मध्ययुगीन नाणकशास्त्र

भारतीय तसेच जागतिक इतिहासात नाणकशास्त्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. गुप्तोत्तर काळामध्ये उत्तर भारतात साधारणपणे बाराव्या शतकापर्यंत म्हणजे मुस्लिम राजवटी भारतात ...
मराठा अंमल, आग्रा

मराठा अंमल, आग्रा : (१७८५–१८०३). पेशवाईतील पराक्रमी सेनानी महादजी शिंदे (१७२७–१७९४) यांनी २७ मार्च १७८५ रोजी आग्रा शहर व किल्ला ...