(प्रस्तावना) पालकसंस्था : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | समन्वयक : प्रवीण प्र. देशपांडे | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
प्रदीर्घ अशा अश्मयुगानंतर मानवाने केलेल्या धातुविज्ञानातील प्रगतीमुळे संस्कृती- चा विकास झपाटयाने होत गेला. अठराव्या शतकात औद्योगिकीकरणास चालना मिळून अनेक अवघड असे अभियांत्रिकी प्रकल्प मार्गी लागले. धातुविज्ञानातील या सर्व प्रगतीचा संक्षिप्त आढावा मराठी विश्वकोशाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १ ते २० खंडांत घेण्यात आला असून, अनेक मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. २०१७ नंतरच्या वर्षात मूलभूत आणि अनुप्रयुक्त विज्ञानात अनेक शोध लागून या शोधांचा उपयोग धातुतंत्रज्ञानात करण्यात आला आहे. यामुळे अभियांत्रिकीमधील अनेक आधुनिक आविष्कार शक्य होत आहेत. धातुविज्ञान फक्त धातूपुरते मर्यादित न राहाता यात अनेक पदार्थांचा समावेश झाल्यामुळे ते अधिक उपयुक्त आणि सर्वसमावेशक झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्यांचे विविध ज्ञानशाखांबद्दलचे कुतूहल वाढीस लागले आहे. एकविसाव्या शतकात सर्वच ज्ञानशाखांमधील कृतिम भिंती कोसळत असताना समांतर आणि दुसऱ्या ज्ञानशाखेत उपयोगी पडू शकतील अशा बाबींचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विश्वकोशात असलेल्या धातुविज्ञानातील माहितीचे किंवा नोंदीचे अद्ययावतीकरण करणे आणि नवीन संकल्पनाची भर टाकणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट्य निश्चित करण्यात आले. त्यासाठी या विषयाचा पुढील अंगांनी विचार केला गेला आहे : प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुविज्ञानामधील संकल्पना आणि त्यावर आधारित संशोधनाच्या नवीन दिशा, पोलादासारख्या औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिश्र धातुंचे उत्पादन, पृष्ठभाग धातुविज्ञान, भौतिकी आणि रासायनिक धातुविज्ञान, संरचनात्मक धातुविज्ञान आणि प्रगत धातुविज्ञान.
लोखंड-उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल (प्रभार-द्रव्ये) (Raw Materials for Iron Production)

लोखंड-उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल (प्रभार-द्रव्ये) (Raw Materials for Iron Production)

लोखंड-उत्पादनासाठी लोह-धातुक (Iron Ore), ज्वलनासाठी व अपचयनासाठी कोक (Coke) व अभिवाहक (प्रद्रावक; flux) म्हणून चुनखडी (Limestone) ही मुख्य प्रभार-द्रव्ये आहेत ...
लोखंडनिर्मिती : झोतभट्टी पद्धत (Blast furnace)

लोखंडनिर्मिती : झोतभट्टी पद्धत (Blast furnace)

झोतभट्टीमध्ये कोळसा  – कोक या प्रतीचा –  व  लोखंडाचे धातुक चुनखडी अभिवाहासह एकत्र टाकतात आणि कोळशाच्या ज्वलनासाठी खालच्या भागातून हवा ...
लोहमिश्रके : (Ferroalloys)

लोहमिश्रके : (Ferroalloys)

पोलाद उद्योगाच्या दृष्टीने आवश्यक असलेली धातुयुक्त कच्च्या मालाची लोहयुक्त मिश्रणे. मिश्र पोलादे  बनविताना त्यांच्यात विविध मूलद्रव्ये मिसळणे आवश्यक असते. अशा ...
लोहमिश्रके निर्मिती (Ferroalloys)

लोहमिश्रके निर्मिती (Ferroalloys)

पोलाद बनविताना लागणार्‍या काही द्रव्यांना लोहमिश्रके (Ferroalloys) असे म्हणतात, मात्र ही द्रव्ये म्हणजे सतत उद्योगात वापरले जाणारे लोखंडाचे मिश्रधातू (Alloy ...
वर्ख (Foil)

वर्ख (Foil)

धातूच्या पापुद्र्यासारख्या अतिशय पातळ पटलाला वर्ख म्हणतात. वर्ख सामान्यपणे ०·००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो. वर्ख एका धातूचा, मिश्रधातूचा अथवा ...
वातावरणी अपक्षयी पोलाद (Weathering Steels)

वातावरणी अपक्षयी पोलाद (Weathering Steels)

नरम पोलादात (Mild steel) १ ते २.५ वजनी टक्के इतक्या प्रमाणात तांबे, फॉस्फरस, क्रोमियम आणि सिलिकॉन मिसळल्यास (Alloying) वातावरणी अपक्षयी ...
विद्युत् धातुविज्ञान (Electro Metallurgy )

विद्युत् धातुविज्ञान (Electro Metallurgy )

धातू व त्यांची संयुगे यांच्या संस्करणामध्ये विजेचा उपयोग करणारी धातुविज्ञानाची शाखा, खरे तर प्रक्रिया धातुविज्ञानाची ही उपशाखा आहे. काही धातुवैज्ञानिक ...
विद्युत् संवाहक बहुवारिके (Intrinsically Conducting Polymers)

विद्युत् संवाहक बहुवारिके (Intrinsically Conducting Polymers)

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्लॅस्टिके व बहुवारिके यांचे युग अवतरले आणि वीजविरोधक किंवा वीजप्रतिबंधक म्हणून बहुवारिके मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली ...
विभागीय शुद्धीकरण (Zone-refining)

विभागीय शुद्धीकरण (Zone-refining)

विशेषत : मूलद्रव्य व संयुग यांतील अशुद्धी काढून टाकून अतिशुद्ध द्रव्य मिळविण्यासाठी अथवा त्यांचे संघटन नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र ...
विसर्पणरोधक मिश्रधातू (Creep Resistance Alloys or Super Alloys)

विसर्पणरोधक मिश्रधातू (Creep Resistance Alloys or Super Alloys)

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमानाचे महत्त्वाचे सुटे भाग बनविण्याकरिता विसर्पणरोधक मिश्रधातू शोधण्यात आले. हे मिश्रधातू ११००º से. इतके उच्च तापमान सहजपणे ...
वुट्झ पोलाद (Wootz Steel)

वुट्झ पोलाद (Wootz Steel)

कर्नाटक अणि आंध्र प्रदेश या राज्यांतील स्थानिक भाषेत पोलादास ‘उक्कु’ (Ukku) असे म्हणतात. यूरोपीयन प्रवाशांमुळे या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘वुट्झ’ ...
श्वेत धातू (White Metals)

श्वेत धातू (White Metals)

पांढर्‍या रंगाचे अनेक धातू आणि मिश्रधातू असून त्यांचे वितळबिंदू सापेक्षतः कमी असतात. उदा., शिसे, कथिल, अँटिमनी, जस्त; तसेच कथिल व ...
समतल प्रतिविकृती भंग दृढता (Plane Strain Fracture Toughness)

समतल प्रतिविकृती भंग दृढता (Plane Strain Fracture Toughness)

भारामुळे पदार्थाची निष्फलता होऊन निर्माण होणाऱ्या दोन किंवा अधिक तुकड्यांना भंग असे म्हणतात. भंग हा सर्व प्रकारच्या वापरातील परिस्थितीदरम्यान होतो ...
समतोलावस्था आकृत्या (Phase Diagram)

समतोलावस्था आकृत्या (Phase Diagram)

घन, द्रव अथवा वायू रूपातील एक वा अधिक पदार्थांच्या मिश्रणावर तापमान, दाब, विद्राव्यता यांपैकी एका किंवा अधिक गोष्टींचा स्थिर स्वरूपी ...
साचा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी मूळ वाळू (Base Silica Sand)

साचा बनविण्यासाठी वापरण्यात येणारी मूळ वाळू (Base Silica Sand)

साचा बनविण्यासाठी वाळूचे जे मिश्रण केले जाते त्यामध्ये वाळू हा एक महत्त्वाचा घटक आहे. वाळू वापरास योग्य आहे किंवा नाही ...
सिरॅमिक्स (Ceramics)

सिरॅमिक्स (Ceramics)

निसर्गात आढळणाऱ्या मातकट व अतिसूक्ष्मकणी द्रव्यांना सिरॅमिक म्हणजे मृत्तिका म्हणतात. मर्यादित प्रमाणात पाणी मिसळल्यास सिरॅमिक आकार्य (Plastic) होते म्हणजे त्याला ...
सोडियम सिलिकेट पद्धत (Sodium Silicate Method)

सोडियम सिलिकेट पद्धत (Sodium Silicate Method)

ओल्या रेतीत (Green Sand) तयार केलेले साचे पुरेसे कठीण होत नाहीत व त्यांची ताकदही कमी असते. त्यामुळे लहान व कमी ...