(प्रस्तावना) पालकसंस्था : विश्ववेश्वरय्या प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर | विषयपालक : बाळ फोंडके | समन्वयक : आर. आर. येरपुडे | विद्याव्यासंगी : स्नेहा दि. खोब्रागडे
खनन अभियांत्रिकी हा विषय जमिनीतून खनिज काढण्याशी संबंधित आहे. अदिकाळापासून मनुष्याने जी प्रगती केली त्यामध्ये खनन व खनिजांचा सिंहाचा वाटा आहे. असे म्हणतात की, ज्यांचे उपज व उत्पन्न जमिनीवर शेतीने मिळत नाही, तर ते जमिनीमधून खाणकाम करून मिळवावे.

प्राचीन काळापासून खनन हा मनुष्याचा शेती नंतरचा महत्वाचा उद्योग मlनला जातो. आजच्या युगात देखील शेती आणि खनन क्षेत्र जगाला सर्व महत्त्वाचा कच्चा माल पुरवीत आहे. मानवाला सुखसोयीच्या वस्तूंची नेहमी आवश्यकता असते.

या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी शेती व खनन यांच्यापासून मिळविलेले पदार्थ वापरावे लागतात. या दोन मूलोद्योगांच्या जोरावरच आधुनिक संस्कृतीची प्रगती होत गेली आहे. खनिजांचा उपयोग सूक्ष्म सुई तयार करण्यापासून तर मोठी यंत्रे व बांधकामासाठी देखील केला जातो. शेतीला लागणारी अवजारे सुद्धा खनिजांपासून तयार केली जातात. शिवाय जगाच्या उर्जेच्या गरजा पुरवण्याव्यतिरिक्त विविध औद्योगिक उपक्रमांसाठी मौल्यवान कच्चा माल पुरविण्यासाठी खनिजांचा उपयोग होतो.

भारत देशाला खनिज व मौल्यवान हिरेमाणिकांचे दैवी भांडार लाभलेले आहे. परंतु हि धनसंपदा पृथ्वीच्या गर्भामध्ये आहे. तिला जर पृथ्वी मधून वर काढले तरच ती मानवाला उपयोगी पडते. हे खनिज भांडार जमिनीमध्ये कमी जास्त खोलीवर आहे. खनिज काढण्यासाठी पृथ्वीवर खुले किंवा भूमिगत उत्खनन केलेल्या जागेला ‘खाण’ असे म्हणतात आणि खनिज जमिनीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रीयेला ‘खनन’ असे म्हणतात. हे खनिज जमिनीतून बाहेर काढण्याची जवाबदारी खनन अभियांत्रिकी या शाखेची आहे. त्याकरिता खनन अभियंतांना नियोजन करून, जमिनीवरची माती व खडक काढून किंवा जमिनीमध्ये भुयार तयार करून आणि वेगवेगळ्या खनन पद्धती वापरून खनिजे बाहेर काढतो.

खनन कामापासून पुढील पदार्थ मिळतात : (१) दगड, वाळू, मृत्तिका आणि सिमेंट बनविण्यास लागणारे इतर पदार्थ, बांधकामास उपयोगी पडणारे पदार्थ; (२) नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू), दगडी कोळसा, खनिज तेल, किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारे) पदार्थ ही इंधने; (३) गार्नेट, कुरुविंद (कोरंडम) यांसारखे अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठ गुळगुळीत करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ); (४) हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज यांसारखी रत्ने; (५) पोटॅश, फॉस्फेटे, नायट्रेटे यांसारखे खते बनविण्यास उपयोगी पदार्थ; (६) गंधक, ग्रॅफाइट, टाकणखार, अभ्रक ॲस्बेस्टस यांसारखे औद्योगिक पदार्थ; (७) सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, लोह, अॅल्युमिनियम इ. धातूंची धातुके वगैरे.

या निरनिराळ्या पदार्थांपासून युद्धाच्या व शांततेच्या काळी अतिशय महत्त्वाच्या व गरजेच्या वस्तू, अस्त्रे, वाहने वगैरे बनविली जातात. उद्योगामध्ये फरक करण्यासाठी खनिजांचे धातू खनिजे, गैर-धातू खनिजे आणि इंधन खालील प्रकारे वर्गीकरण केले जाते.

खनिज निर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया ही लाखो वर्षांपासून सुरू आहे. ही खनिजे साधन-संपत्तीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. यामुळे खनिजांचे नियंत्रण, उत्पादन, संरक्षण करण्याकरिता महत्त्वाची धोरणे आणि कायदे प्रस्थापित करण्यात आली आहेत. मूलत: खनन प्रक्रियेचा संबध हा प्रत्यक्ष रीत्या निसर्गाशी येत असल्याने खनन देखील अतिशय दक्षतेने, हरित पद्धतीने, सुरक्षेला ध्यानात ठेवून, शाश्वत वाढ व पर्यावरणाला कमीत कमी क्षती पोहोचणार या पद्धतीने करण्याच्या मार्गाचा अवलंब करणे, या सर्व बाबींचे सविस्तर वर्णन खनन अभियांत्रिकी या ज्ञानमंडळात करण्यात येणार आहे.

अयस्कवाहक पोकळी (OREPASS)

अयस्कवाहक पोकळी (OREPASS)

हा एक उभा किवा जवळपास उभा भूमिगत पोकळ मार्ग असतो जो वरच्या भूमीपातळी पासून खालच्या भूमीपातळी पर्यंत तयार केला जातो ...
झालरीभिंत (Hanging Wall) व पायभिंत (Footwall)

झालरीभिंत (Hanging Wall) व पायभिंत (Footwall)

अनुलंबरहित भौगोलिक दोष (प्रस्तरभंग) च्या दोन बाजूंना झालरीभिंत (Hanging Wall) आणि पायभिंत (Footwall) म्हणतात. झालरीभिंत हि प्रस्तरभंगपट्याच्या वरच्या बाजूस तर ...
भूमिगत काट मार्ग (A cross-cut)

भूमिगत काट मार्ग (A cross-cut)

हा एक आडवा भूमिगत मार्ग आहे जो  सामान्यतः मुख्य शाफ्ट पासून ते खनन क्षेत्रापर्यंत जातो. हा मार्ग सर्व खड्काच्या परतीला ...
शाफ्ट (Shaft Mining / Shaft Sinking)

शाफ्ट (Shaft Mining / Shaft Sinking)

खनिकर्मची अशी एक पद्धत. ज्याद्वारे भूपृष्ठापासून ते भूगर्भातील खानिजासाठ्यापर्यंत पोहोचण्याकरिता एका सरळ उभ्या रेषेत खोदकाम करून  विहिरीसारखे केलेले बांधकाम होय ...
Close Menu
Skip to content