(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

लॉर्ड जॉर्ज ईडन ऑक्‍लंड (George Eden, earl of Auckland)

लॉर्ड जॉर्ज ईडन ऑक्‍लंड

ऑक्‍लंड, लॉर्ड जॉर्ज ईडन : (२५ ऑगस्ट १७८४ – १ जानेवारी १८४९). ब्रिटिश अंमलाखालील हिंदुस्थानचा १८३५ ते १८४२ या काळातील गव्हर्नर जनरल. ऑक्‍लंडने १८१४ मध्ये बॅरन ...
लॉर्ड जॉर्ज नाथॅन्येल कर्झन (George Nathanial Curzon, The Marquess Curzon of Kedleston)

लॉर्ड जॉर्ज नाथॅन्येल कर्झन

कर्झन, लॉर्ड जॉर्ज  नाथॅन्येल : (११ जानेवारी १८५९–२० मार्च १९२५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८९८ ते १९०५ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय ...
लॉर्ड जॉर्ज फ्रेडरिक सॅम्युअल रॉबिन्सन रिपन (George Fredrick Samuel Robinson, 1st marquess of Ripon)

लॉर्ड जॉर्ज फ्रेडरिक सॅम्युअल रॉबिन्सन रिपन

रिपन, लॉर्ड जॉर्ज फ्रेडरिक सॅम्युअल रॉबिन्सन  : (२४ ऑक्टोबर १८२७ — ९ जुलै १९०९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा उदारमतवादी व्हाइसरॉय (कार. १८८०-१८८४) ...
लॉर्ड टॉमस जॉर्ज बेअरिंग नॉर्थब्रुक (Thomas George Baring, 1st Earl of Northbrook)

लॉर्ड टॉमस जॉर्ज बेअरिंग नॉर्थब्रुक

नॉर्थब्रुक, लॉर्ड टॉमस जॉर्ज बेअरिंग : (२२ जानेवारी १८२६–१५ नोव्हेंबर १९०४). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील १८७२–७६ या काळातील गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय ...
लॉर्ड पामर्स्टन (Henry John Temple, 3rd Viscount Palmerston)

लॉर्ड पामर्स्टन

पामर्स्टन, लॉर्ड : (२० ऑक्टोबर १७८४ – १८ ऑक्टोबर १८६५). इंग्लंडचा एक मुत्सद्दी पंतप्रधान. पामर्स्टनचा जन्म सधन कुटुंबात हँपशर येथे ...
लॉर्ड फ्रीडरिक जॉन नेपिअर चेम्सफर्ड (Frederic John Napier Thesiger, 1st Viscount Chelmsford)

लॉर्ड फ्रीडरिक जॉन नेपिअर चेम्सफर्ड

चेम्सफर्ड, लॉर्ड फ्रीडरिक जॉन नेपिअर : (१२ ऑगस्ट १८६८ – १ एप्रिल १९३३). हिंदुस्थानचा १९१६ पासून १९२१ या काळातील व्हाइसरॉय ...
लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन डफरिन (Frederick Temple Hamilton,1st Marquess of Dufferin and Ava)

लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन डफरिन

डफरिन, लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन : (२१ जून १८२६–१२ फेब्रुवारी १९०२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८८४–८८ या काळातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल ...
लॉर्ड रिचर्ड साउथवेल बूर्क मेयो (Richard Southwell Bourke, 6th Earl of Mayo)

लॉर्ड रिचर्ड साउथवेल बूर्क मेयो

मेयो, लॉर्ड रिचर्ड साउथवेल बूर्क :  (२१ फेब्रुवारी १८२२ – ८ फेब्रुवारी १८७२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (कार ...
लॉर्ड लूई माउंटबॅटन (Louis Mountbatten, 1st Earl Mountbatten)

लॉर्ड लूई माउंटबॅटन

माउंटबॅटन, लॉर्ड लूई : (२५ जून १९००–२७ ऑगस्ट १९७९). भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. त्यांचे पूर्ण ...
लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश बेंटिक (Lord William Bentinck)

लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश बेंटिक

बेंटिक, लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश : (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ...
वसंत शंकर कदम (Vasant Shankar Kadam)

वसंत शंकर कदम

कदम, वसंत शंकर : (२७ डिसेंबर १९३८–१४ मे २०१९). मराठा इतिहासाचे ख्यातनाम अभ्यासक आणि साक्षेपी इतिहासकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे ...
वारसा हक्क धोरण (संस्थानांचे)

वारसा हक्क धोरण

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील ब्रिटिशांचे एक साम्राज्यविस्तारवादी धोरण. यालाच संस्थानांचे ‘व्यपगत धोरणʼ किंवा ‘व्यपगत सिद्धांतʼ असे संबोधले जाते. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी ...
वालचंद रामचंद कोठारी (Walchand Ramchand Kothari)

वालचंद रामचंद कोठारी

कोठारी, वालचंद रामचंद :  (१३ सप्टेंबर १८९२ — १० फेब्रुवारी १९७४). संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक आणि ...
विल्यम पिट ॲम्हर्स्ट (William Pitt Amherst, 1st Earl Amherst)

विल्यम पिट ॲम्हर्स्ट

ॲम्हर्स्ट, लॉर्ड विल्यम पिट : (१४ जानेवारी १७७३ – १३ मार्च १८५७). ब्रिटिशांकित हिंदवी साम्राज्यातील १८२३–१८२८ या काळातील गव्हर्नर जनरल ...
विल्यम पिट, थोरला  (William Pitt, the Elder, 1st Earl of Chatham)

विल्यम पिट, थोरला  

पिट, विल्यम थोरला : (१५ नोव्हेंबर १७०८ – ११ मे १७७८). इंग्‍लंडचा सुप्रसिद्ध युद्धमंत्री व अठराव्या शतकातील थोर मुत्सद्दी. त्याचा ...
विल्यम पिट, धाकटा  (William Pitt, the Younger)

विल्यम पिट, धाकटा  

पिट, विल्यम धाकटा :  (२८ मे १७५९ – २३ जानेवारी १८०६). इंग्‍लंडचा अठराव्या शतकातील एक थोर राजकारणपटू आणि १७८३–१८०१ व ...
विल्यम यूअर्ट ग्लॅडस्टन (William Ewart Gladstone)

विल्यम यूअर्ट ग्लॅडस्टन

ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट : (२९ डिसेंबर १८०९–१९ मे १८९८). प्रसिद्ध ब्रिटिश मुत्सद्दी व इंग्लंडचा इतिहासप्रसिद्ध पंतप्रधान. याचा जन्म लिव्हरपूल (इंग्लंड) ...
विल्यम हिकलिंग प्रेस्कट (William H. Prescott)

विल्यम हिकलिंग प्रेस्कट

प्रेस्कट, विल्यम हिकलिंग : (४ मे १७९६ – २८ जानेवारी १८५९). अमेरिकन इतिहासकार. त्याचा जन्म सधन व सुसंस्कृत घराण्यात सेलेम ...
विष्णुपंत छत्रे (Vishnupant Chatre)

विष्णुपंत छत्रे

छत्रे, विष्णुपंत मोरोपंत : (१८४०-२० फेब्रुवारी १९०५). भारतीय सर्कसचे जनक आणि प्रसिद्ध गायक. छत्रे घराणे मूळचे गणपतीपुळे (रत्नागिरी) जवळील बसणी ...
विष्णुबुवा ब्रह्मचारी (Vishnubuva Brahmachari)

विष्णुबुवा ब्रह्मचारी

विष्णुबुवा ब्रह्मचारी : ( ? १८२५ – १८ फेब्रुवारी १८७१). स्वतंत्र विचारसरणीचे धर्मसुधारक व एक विचारवंत. त्यांचे मूळ नाव विष्णू ...