(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

वेल्लोरचे बंड (Vellore Mutiny)

वेल्लोरचे बंड

वेल्लोरचे बंड : वेल्लोर (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यातील वेल्लोर किल्ल्यात १८०६ मध्ये झालेले हिंदी शिपायांचे बंड. या बंडाची तात्कालिक कारणे धार्मिक ...
व्हीत्तॉर्यो एमान्वेअले ओर्लांदो (Vittorio Emanuele Orlando)

व्हीत्तॉर्यो एमान्वेअले ओर्लांदो

ओर्लांदो, व्हीत्तॉर्यो एमान्वेअले : (१९ मे १८६०—१ डिसेंबर १९५२). प्रसिद्ध इटालियन मुत्सद्दी व विधिज्ञ. पालेर्मो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला ...
शहाजी छत्रपती महाराज (Shahaji Chattrapati Maharaj, Kolhapur)

शहाजी छत्रपती महाराज

शहाजी छत्रपती महाराज : (४ एप्रिल १९१०–९ मे १९८३). कोल्हापूर संस्थानचे शेवटचे अधिपती व मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक. राजर्षी छ. शाहू ...
शार्ल मॉरीस द तालेरां-पेरीगॉर (Charles Maurice de Talleyrand-Périgord ) 

शार्ल मॉरीस द तालेरां-पेरीगॉर

तालेरां-पेरीगॉर, शार्ल मॉरीस द : (२ फेब्रुवारी १७५४–१७ मे १८३८). फ्रेंच राज्यक्रांतीच्या व क्रांत्युत्तर काळातील एक श्रेष्ठ मुत्सद्दी. पॅरिस येथे ...
शार्ल ल्वी द सगाँदा माँतेस्क्यू (Montesquieu)

शार्ल ल्वी द सगाँदा माँतेस्क्यू

माँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा  : (१८ जानेवारी १६८९–१० फेब्रुवारी १७५५). प्रसिद्ध फ्रेंच विधिवेत्ता व राजकीय तत्त्वज्ञ. बॉर्दोजवळच्या ला ब्रेद ...
शिमॉन पेरेझ  (Shimon peres)

शिमॉन पेरेझ 

पेरेझ, शिमॉन : (२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६). इझ्राएलचे एक राष्ट्र्निर्माते; आधुनिक इझ्राएलचे शिल्पकार, मुत्सद्दी आणि शांततेसाठीच्या नोबेल ...
शेतकरी उठाव, १८७५ (Deccan Riots)

शेतकरी उठाव, १८७५

महाराष्ट्रामधील १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचा सामूहिक उठाव. ‘दख्खनचा उठावʼ म्हणूनही ही घटना परिचित. हा उठाव प्रामुख्याने सावकारांच्या विरोधात ...
सदाशिव शंकर देसाई (Sadashiv Shankar Desai)

सदाशिव शंकर देसाई

देसाई, सदाशिव शंकर : (२५ जुलै १९१७ – ३१ मे १९९६). विख्यात साहित्यिक, पत्रकार आणि  इतिहास संशोधक. स. शं. देसाई ...
सय्यिद मुहम्मद लतिफ (Syed Muhammad Latif)

सय्यिद मुहम्मद लतिफ

लतिफ, सय्यिद मुहम्मद : ( ? १८४७ ? – ९ फेब्रुवारी १९०२). पंजाबमधील एक सनदी अधिकारी आणि इतिहासकार. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल ...
सर चार्ल्‌स जेम्स नेपिअर (Sir Charles James Napier)

सर चार्ल्‌स जेम्स नेपिअर

नेपिअर, सर चार्ल्‌स जेम्स : (१० ऑगस्ट १७८२ – २९ ऑगस्ट १८५३). प्रसिद्ध ब्रिटिश सेनापती. याचा जन्म लंडन येथे झाला. कर्नल जॉर्ज ...
सर चार्ल्स मेटकाफ (Charles Metcalfe, 1st Baron Metcalfe)

सर चार्ल्स मेटकाफ

मेटकाफ, सर  चार्ल्स : (३० जानेवारी १७८५ — ५ सप्टेंबर १८४६). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हंगामी गव्हर्नर जनरल. त्याचा ...
सर जेम्स ऊट्रम(Sir James Outram)

सर जेम्स ऊट्रम

ऊट्रम, सर जेम्स : (२९ जानेवारी १८०३ – ११ मार्च १८६३). हिंदुस्थानातील ब्रिटिश लष्कराचा एक सेनापती व मुत्सद्दी. बटर्ली (डर्बिशर) येथील ...
सर जेम्स मॅकिंटॉश (Sir James Mackintosh)

सर जेम्स मॅकिंटॉश

मॅकिंटॉश, सर जेम्स : (२४ ऑक्टोबर १७६५–३० मे १८३२). स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार, पत्रकार आणि कायदेपंडित. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील ऑल्दौरी येथे ...
सर जॉन मॅल्कम (John Malcolm)

सर जॉन मॅल्कम

मॅल्कम, सर जॉन : (२ मे १७६९ – ३० मे १८३३). ब्रिटिश हिंदुस्थानातील लष्करी-मुत्सद्दी, प्रशासक, इतिहासकार व मुंबईचा गव्हर्नर (१ ...
सर जॉन शोअर (Sir John Shore)

सर जॉन शोअर 

शोअर, सर  जॉन : ( ८ ऑक्टोबर १७५१ – १४ फेबुवारी १८३४ ). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १७९३ ते १७९८ ह्या काळातील ...
सर टॉमस रो (Sir Tomas Roe)

सर टॉमस रो

रो, सर टॉमस : (? १५८१ – ६ नोव्हेंबर १६४४). एक इंग्रज मुत्सद्दी व भारतातील मोगल दरबारातील वकील. त्याचा जन्म ...
सर धनजीशा कूपर (Sir Dhanjisha Cooper)

सर धनजीशा कूपर

कूपर, सर धनजीशा : (२ जानेवारी १८७८–२९ जुलै १९४७). स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचे पहिले प्रधानमंत्री. ते पारशी समाजातील होते. त्यांचे ...
सर रॉबर्ट वॉल्पोल (Robert Walpole, 1st earl of Orford)

सर रॉबर्ट वॉल्पोल

वॉल्पोल, सर रॉबर्ट : (२६ ऑगस्ट १६७६ — १८ मार्च १७४५). इंग्लंडचा प्रख्यात मुत्सद्दी आणि संसदपटू. त्याचा जन्म सरदार घराण्यातील कर्नल ...
सर विन्स्टन चर्चिल (Winston Churchill)

सर विन्स्टन चर्चिल

चर्चिल, सर विन्स्टन : (३० नोव्हेंबर १८७४—२४ जानेवारी १९६५). ब्रिटनचा युद्धकाळातील पंतप्रधान, वृत्तपत्रकार, साहित्यिक व एक थोर राजकारणपटू. त्यांचे पूर्ण ...
सर स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेझर (Stuart Fraser)         

सर स्टुअर्ट मिटफर्ड फ्रेझर

फ्रेझर, सर स्टुअर्ट मिटफर्ड : (२ जून १८६४ – १ डिसेंबर १९६३). ब्रिटिशांकित भारत सरकारमधील एक वरिष्ठ अधिकारी, राजनीतिज्ञ तसेच ...