(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

सर हिलॅरो जॉर्ज बार्लो (Sir George Barlow, 1st Baronet)

सर हिलॅरो जॉर्ज बार्लो

बार्लो, सर हिलॅरो जॉर्ज : (? १७६२ – ? फेब्रुवारी १८४७). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील बंगालचा एक गव्हर्नर-जनरल (कार ...
सरलादेवी चौधरी (Saraladevi Chaudhurani)

सरलादेवी चौधरी

चौधरी, सरलादेवी : (९ सप्टेंबर १८७२ — १८ ऑगस्ट १९४५). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी नेत्या. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) ...
साद झगलूल पाशा (Saad Zaghloul) 

साद झगलूल पाशा

झगलूल पाशा, साद (? जुलै १८५७–२३ ऑगस्ट १९२७). ईजिप्तचा स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रभावी नेता आणि वफ्द पक्षाचा पुढारी. एल् गार्बीया प्रांतातील ...
सीमॉन बोलीव्हार (Simon Bolivar)

सीमॉन बोलीव्हार

बोलीव्हार, सीमॉन : (२४ जुलै १७८३ — १७ डिसेंबर १८३०). दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींचा मुक्तिदाता व कोलंबिया प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष ...
सेसिल जॉन ऱ्होड्स (Cecil Rhodes)

सेसिल जॉन ऱ्होड्स

ऱ्होड्स, सेसिल जॉन : (५ जुलै १८५३ – २६ मार्च १९०२). दक्षिण आफ्रिकेमधील ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार व एक कार्यक्षम इंग्लिश ...
हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेन्स फिशर (Herbert Albert Laurens Fisher)

हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेन्स फिशर

फिशर, हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेन्स : (२१ मार्च १८६५ – १८ एप्रिल १९४०). एक ब्रिटिश इतिहासकार व शिक्षणतज्ज्ञ. लंडन येथील सधन ...
हाइन्‍रिख फोन ट्राइश्के (Heinrich von Treitschke)

हाइन्‍रिख फोन ट्राइश्के

ट्राइश्के, हाइन्‍रिख फोन : (१५ सप्टेंबर १८३४—२८ एप्रिल १८९६). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार आणि राजकीय लेखक. एका सॅक्सन सेनाधिकाऱ्याचा मुलगा. ड्रेझ्‌डेन ...
हॅरिएट बीचर स्टो (Harriet Beecher Stowe)

हॅरिएट बीचर स्टो

स्टो, हॅरिएट बीचर : (१४ जून १८११—१ जुलै १८९६). अमेरिकन कादंबरीकर्त्री. दासप्रथा किंवा गुलामगिरीविरोधी लेखिका म्हणून प्रसिद्ध. जन्म लिचफील्ड, कनेक्टिकट येथे ...
हेन्री टॉमस बकल (Henry Thomas Buckle)

हेन्री टॉमस बकल

बकल, हेन्री टॉमस : (२४ नोव्हेंबर १८२१–२९ मे १८६२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील ली (केन्ट) येथे सधन कुटुंबात जन्म. कडव्या ...
हेन्री लुई व्हिव्हिअन डेरोझिओ (Henry Louis Vivian Derozio)

हेन्री लुई व्हिव्हिअन डेरोझिओ

डेरोझिओ, हेन्री लुई व्हिव्हिअन : (१८ एप्रिल १८०९–२६ डिसेंबर १८३१). बंगालच्या पुनरुज्जीवनवादी चळवळीचे एक प्रमुख नेते आणि प्रसिद्ध इंडो-अँग्लिअन कवी. त्यांचा ...
हेरमान गोरिंग (Hermann Goring)

हेरमान गोरिंग

गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म : (१२ जानेवारी १८९३—१६ ऑक्टोबर १९४६). जर्मन मुत्सद्दी व वायुसेनाप्रमुख. ह्याचा जन्म बव्हेरियातील रोझेनहाइम ह्या गावी मध्यमवर्गीय ...
होरेशो नेल्सन (Horatio Nelson, 1st Viscount Nelson)

होरेशो नेल्सन

नेल्सन, होरेशो : (२९ सप्टेंबर १७५८ – २१ ऑक्टोबर १८०५).  इंग्लंडच्या नौदलातील एक प्रमुख सेनानी आणि ट्रफॅल्गरच्या लढाईतील यशस्वी सूत्रधार. त्याचा ...
ह्यू ट्रेव्हर-रोपर (Hugh Trevor-Roper)

ह्यू ट्रेव्हर-रोपर

ट्रेव्हर-रोपर, ह्यू : (१५ जानेवारी १९१४ — २६ जानेवारी २००३). प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार. त्यांचा जन्म इंग्लंडमधील नॉर्थ अंबरलंड प्रांतात ग्लाटन ...
ॲडॉल्फ हिटलर (Adolf Hitler)

ॲडॉल्फ हिटलर

हिटलर, ॲडॉल्फ : (२० एप्रिल १८८९ — ३० एप्रिल १९४५). जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशहा. त्याचा जन्म ब्राउनाऊ ...
ॲलाबॅमा-प्रकरण (Alabama Claims)

ॲलाबॅमा-प्रकरण

अमेरिकेच्या यादवी युद्धातून उद्भवलेले युद्धनौकांबाबतचे प्रसिद्ध प्रकरण. यादवी युद्धाच्या काळात इंग्‍लंडने बांधलेल्या ‘ॲलाबॅमा’, ‘फ्लॉरेडा’, ‘शेनँडोआ’ वगैरे युद्धनौका अमेरिकेतील बंडखोर घटक-राज्यांच्या गटाने खेरदी ...
ॲल्सेस-लॉरेन (Alsace-Lorraine)

ॲल्सेस-लॉरेन

ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेला फ्रान्सचा ईशान्येकडील एक प्रदेश. क्षेत्रफळ १५,१८५ चौ.किमी. लोकसंख्या २५,०२,१४९ (१९६८). उत्तरेस लक्सेंबर्ग व जर्मनी, पूर्वेस जर्मनी व दक्षिणेस ...