(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

आंरी फिलिप पेतँ (Henri Philippe Petain)

आंरी फिलिप पेतँ

पेतँ, आंरी फिलिप : (२४ एप्रिल १८५६ – २३ जुलै १९५१). फ्रान्सचा एक सेनानी व मुत्सद्दी. त्याचा जन्म शेतकरी कुटुंबात ...
आर्थर नेव्हिल चेंबरलिन (Arthur Neville Chamberlain)

आर्थर नेव्हिल चेंबरलिन

चेंबरलिन, आर्थर नेव्हिल : (१८ मार्च १८६९ – ९ नोव्हेंबर १९४०). ब्रिटिश मुत्सद्दी आणि १९३७ ते १९४० या काळातील  इंग्लंडचा पंतप्रधान ...
आर्नल्ड जोसेफ टॉयन्बी (Arnold J. Toynbee)

आर्नल्ड जोसेफ टॉयन्बी

टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ : (१४ एप्रिल १८८९–२२ ऑक्टोबर १९७५). जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. आर्नल्ड टॉयन्बी (१८५२–१८८३) ह्या अर्थशास्त्रज्ञांचा पुतण्या. लंडन येथे ...
आर्मांझां द्यू प्लेसी रीशल्य (Armand-Jean du Plessis, Cardinal Richelieu)

आर्मांझां द्यू प्लेसी रीशल्य

रीशल्य, आर्मांझां द्यू प्लेसी  :  (९ सप्टेंबर १५८५ – ४ डिसेंबर १६४२). फ्रान्सचा सतराव्या शतकातील एक थोर मुत्सद्दी व पंतप्रधान ...
आल्‌फ्रेट रोझनबेर्ख (Alfred Rosenberg)

आल्‌फ्रेट रोझनबेर्ख

रोझनबेर्ख, आल्‌फ्रेट : (१२ जानेवारी १८९३ – १६ ऑक्टोबर १९४६). नाझी  तत्त्वज्ञानाचा एक जर्मन पुरस्कर्ता व ॲडॉल्फ हिटलरचा घनिष्ठ सहाध्यायी ...
इंग्रज-अफगाण युद्धे (Anglo-Afgan Wars)

इंग्रज-अफगाण युद्धे

अफगाणिस्तानात स्वतःची किंवा आपल्या अंकिताची सत्ता स्थापन करण्यासाठी इंग्रजांनी अफगाणांबरोबर तीन युद्धे केली. पहिले अफगाण युद्ध : (१८३८–१८४२). पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धप्रसंगी बोलन ...
इंग्रज-गुरखा युद्धे (Anglo-Gurakha War) (Anglo-Nepalese War)

इंग्रज-गुरखा युद्धे

इंग्रज आणि गुरखा (सांप्रत नेपाळ) यांच्यात १८१४ ते १८१६ दरम्यान झालेले युद्ध. हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी ...
इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील (The Anglo-French Struggle) (Carnatic Wars)

इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील

सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्त्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत ...
इंग्रज-शीख युद्धे (Anglo-Sikh Wars)

इंग्रज-शीख युद्धे

इंग्रज-शीख युद्धे : (१८४५–१८५०). इंग्रज व शीख यांच्यात झालेली युद्धे. भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्‌भवलेली ...
इटली-ॲबिसिनिया युद्ध  (Italo-Ethiopian War)

इटली-ॲबिसिनिया युद्ध 

इटली-ॲबिसिनिया युद्ध :  (१९३५-३६). इटली-ॲबिसिनिया (इथिओपिया) ह्यांमध्ये झालेले युद्ध. १८९६ मध्ये ॲबिसिनियाच्या सैन्याने आडूवा येथे इटलीच्या सैन्याचा पराभव केला होता ...
इतिहास (History)

इतिहास

इतिहासाची अधिकात अधिक वस्तुनिष्ठ अशी व्याख्या करायची, तर इतिहास ह्या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तिसिद्ध जो अर्थ आहे, तोच स्वयंपूर्ण आणि प्रमाण ...
इंदूर संस्थान (Indore State)

इंदूर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ २४,६०५ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस ग्वाल्हेर, पूर्वेस देवास व भोपाळ, दक्षिणेस पूर्वीचा मुंबई इलाखा, ...
इब्‍न सौद (Ibn saud)

इब्‍न सौद

इब्न सौद (? १८८० ? – ९ नोव्हेंबर १९५३). सौदी अरेबियाचा संस्थापक व पहिला राजा. पूर्ण नाव अब्दुल अझीझ इब्‍न अब्द रहमान इब्‍न ...
इरफान हबीब (Irfan Habib)

इरफान हबीब

हबीब, इरफान : (१२ ऑगस्ट १९३१). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय मार्क्सवादी इतिहासकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म बडोदा (वडोदरा, गुजरात) येथे एका ...
ई. व्ही. रामास्वामी पेरियार (नायकर) (Periyar E. V. R)

ई. व्ही. रामास्वामी पेरियार

पेरियार (नायकर), ई. व्ही. रामास्वामी : (१७ सप्टेंबर १८७९–२४ डिसेंबर १९७३). द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर ...
ईडर संस्थान (Idar Princely State)

ईडर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ४,३२३ चौ. किमी. चतु:सीमा उत्तरेस  सिरोही  आणि उदयपूर, पूर्वेस दुर्गापूर, दक्षिणेस आणि पश्चिमेस पूर्वीचा ...
उदयपूर संस्थान (Udaypur State)

उदयपूर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील राजस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ३२,८६८ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस अजमीर, मेवाड आणि शाहपूर; पश्चिमेस जोधपूर आणि सिरोही;  दक्षिणेस दुर्गापूर, बांसवाडा आणि ...
उधमसिंग (Udham Singh) 

उधमसिंग

उधमसिंग : (२६ डिसेंबर १८९९–३१ जुलै १९४०). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. बालपणीचे नाव शेरसिंग. त्यांचा जन्म पंजाब राज्यातील संगरुर जिल्ह्यातील सुनाम ...
उमाजी नाईक (Umaji Naik)

उमाजी नाईक

उमाजी नाईक : (७ सप्टेंबर १७९१–३ फेब्रुवारी १८३२). एक प्रसिद्ध क्रांतिकारक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक ...
उषा मेहता (Usha Mehata)

उषा मेहता

मेहता, उषा : (२५ मार्च १९२०–११ ऑगस्ट २०००). छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील ...