(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : सरोजकुमार स. मिठारी
सर्व साधारणपणे अभ्यासक असे मानतात की, आधुनिक इतिहासाची सुरुवात इ. स. १५व्या शतकातील युरोपमधील प्रबोधनकाळानंतर झाली. पुढील काळात या चळवळीमुळे झालेले बदल सर्व जगात प्रसृत झाले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदर्लंड्स यांसारख्या देशांनी लॅटिन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. ह्या युरोपियन देशांच्या वसाहतीकरणाच्या माध्यमातून आधुनिकतेचे बरे वाईट परिणाम सर्व जगभर पसरले. भारतामध्ये देखील ब्रिटिशांनी बंगाल इलाख्यात १८व्या शतकाच्या मध्यास आपली सत्ता स्थापन केली. पुढे १८१८ साली इंग्रजांनी मराठी सत्तेचे केंद्रस्थान असलेली पेशवाई खालसा केली आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी विश्वकोशाच्या ‘आधुनिक इतिहास : जागतिक व भारतीय’ या विभागात आधुनिक जग, आधुनिक भारत व आधुनिक महाराष्ट्र अशा तीन स्तरांतर्गत इतिहासाच्या नोंदी लिहिलेल्या आहेत.

इतिहास माहीत असणे हे महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ समजण्यात मदत होते. आपल्याला भूतकाळ समजला की वर्तमानकाळ समजणे सोपे जाते. आजचे जग का व कसे असे आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर त्याचे उत्तर इतिहासात शोधावे लागते. इतिहास माहीत असला की, आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या संकृतीबद्दल माहिती होते. यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये समंजसपणा निर्माण होतो.

इतिहास म्हणजे नुसत्या सनावळ्या व घटनांची क्रमवार मांडणी नव्हे, तर इतिहास ही संपूर्ण मानवतेची गोष्ट आहे. आपण आत्ता आहोत ते का व कसे आहोत याची गोष्ट म्हणजे इतिहास होय. इतिहास हा स्वतःला, स्वतःच्या समाजाला आणि जगाला समजण्याचा मार्ग आहे. इतिहास अभ्यासल्यामुळे आपल्याला परिवर्तनाची कारणे समजतात. दैनंदिन जीवन का व कशा प्रकारे बदलले हे कळते. भूतकाळातील थोरांच्या गोष्टी कळल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. भूतकाळातील धोकादायक घटना व संकटे समजल्यावर आपण वर्तमान काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज होतो.

इतिहासामुळे आपल्याला स्वतःची ओळख होते. मानवाच्या परिस्थितीमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती मिळते. आपले राष्ट्र आणि नागरिक यांच्या खास वैशिष्ट्यांचे आकलन होते. थोडक्यात इतिहासाच्या माहितीमुळे व्यक्तीमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या समूहाबद्दल जाणीव जागृत होते. इतिहासाची जाणकारी लोकांना राष्ट्र आणि जगाचे नागरिक म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या भूमिकांबद्दल भान निर्माण करते. जगाचा इतिहास आणि जगामध्ये घडणाऱ्या समकालीन घटनांची व घडामोडींची माहिती एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला एक चांगला ‘ग्लोबल सिटीझन’ बनवते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोक मोठ्याप्रमाणात जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करू लागले आहेत. अशा परिस्थितीत समकालीन जागतिक समाजाने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी आधुनिक इतिहासाचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.

बहादुरशाह जफर (Bahadur Shah Zafar)

बहादुरशाह जफर

बहादुरशाह जफर : (२४ ऑगस्ट १७७५–७ नोव्हेंबर १८६२). भारताचा १९ वा व शेवटचा मोगल सम्राट, तसेच तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता ...
बाल्कन युद्धे (Balkan Wars)

बाल्कन युद्धे

एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यूरोपीय राजकारणात ‘पूर्वेकडील प्रश्न’ ही एक गुंतागुंतीची समस्या होती. बाल्कन द्वीपकल्पातील तुर्की साम्राज्याच्या उतरत्या ...
बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai)

बाळासाहेब देसाई

देसाई, दौलतराव उर्फ बाळासाहेब : (१० मार्च १९१० – २४ एप्रिल १९८३). महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकनेते. त्यांचा जन्म सातारा ...
बिरसा मुंडा (Birsa Munda)

बिरसा मुंडा

बिरसा मुंडा (Birsa Munda) : (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म ...
बॅस्तील (Bastille)

बॅस्तील

बॅस्तील :  पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला. बॅस्तील या शद्बाचे दोन ...
बेंजामिन डिझरेली (Benjamin Disraeli)

बेंजामिन डिझरेली

डिझरेली, बेंजामिन : (२१ डिसेंबर १८०४ – १९ एप्रिल १८८१). इंग्लंडचा एक प्रसिद्ध पंतप्रधान व मुत्सद्दी. कादंबरीकार म्हणूनही तो इंग्रजी ...
बेनीतो मुसोलिनी (Benito Mussolini)

बेनीतो मुसोलिनी

मुसोलिनी, बेनीतो : (२९ जुलै १८८३ — २८ एप्रिल १९४५). इटलीचा हुकूमशहा (१९२२–४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म ...
बेहरामजी मेहरवानजी मलबारी (Behramji Malabari)

बेहरामजी मेहरवानजी मलबारी

मलबारी, बेहरामजी मेहरवानजी : (१८ मे १८५३–१२ जुलै १९१२). थोर भारतीय समाजसुधारक, साहित्यिक व पत्रकार. त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा (सध्याचे ...
बॉक्सर बंड (Boxer Rebellion)

बॉक्सर बंड

बॉक्सर बंड : (१८९८-१९००). पाश्चात्त्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध चिनी लोकांनी केलेला सशस्त्र उठाव. या उठावाच्या संघटनेतील बहुसंख्य सदस्य कसरतपटू किंवा बलदंड ...
बोअर युद्ध (Boer war) (South African War)

बोअर युद्ध

बोअर युद्ध : (इ. स. १८९९ ते १९०२). द. आफिकेतील ब्रिटिश आणि डच वसाहतवाल्यांच्या स्पर्धेतून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बोअर युद्ध ...
बोल्शेव्हिक (Bolsheviks)

बोल्शेव्हिक

रशियन साम्यवादी क्रांतिकारी गट. रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (स्थापना १८९८) या मुळातील मार्क्सवादी पक्षाच्या १९०३ मध्ये लंडन येथे भरलेल्या ...
भारतीय विधिमंडळ कायदा, १९०९ (Indian Councils Act of 1909 / Morley-Minto Reforms)

भारतीय विधिमंडळ कायदा, १९०९

ब्रिटिश-भारतातील एक महत्त्वपूर्ण कायदा. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा म्हणूनही परिचित. भारतीयांना भरीव सुधारणा देण्याच्या नावाखाली ब्रिटिशविरोधातील राजकीय चळवळी दडपणे व असंतोष ...
माक्सीमील्यँ फ्रांस्वा रोब्झपिअर (Maximilien Robespierre)

माक्सीमील्यँ फ्रांस्वा रोब्झपिअर

रोब्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा :  (६ मे १७५८ – २८ जुलै १७९४). फ्रान्समधील एक जहाल क्रांतिकारक आणि तत्कालीन जॅकबिन्झ गटाचा एक पुढारी ...
माझा लढा (Mein Kampf / My Struggle)

माझा लढा

जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशाह ॲडॉल्फ हिटलर (१८८९–१९४५) याचे आत्मचरित्र. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत निर्माण झालेल्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर या ...
माधवराव खंडेराव बागल (Madhavrao Bagal)

माधवराव खंडेराव बागल

बागल, माधवराव खंडेराव : (२८ मे १८९५ – ६ मार्च १९८६). महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक आणि ...
माराया टेरिसा (Maria Theresa)

माराया टेरिसा

माराया टेरिसा : (१३ मे १७१७ — २९ नोव्हेंबर १७८०). ऑस्ट्रिया, बोहीमिया व हंगेरीची राणी आणि पवित्र रोमन साम्राज्याची महाराणी ...
मारी आंत्वानेत (Marie Antoinette)

मारी आंत्वानेत

मारी आंत्वानेत : (२ नोव्हेंबर १७५५ — १६ ऑक्टोबर १७९३). फ्रान्सची फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळची प्रसिद्ध राणी आणि सोळाव्या लूईची पत्नी ...
मार्की द लाफाएत (Marquis de Lafayette)

मार्की द लाफाएत

लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ — २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव ...
मालोजीराजे नाईक निंबाळकर (Malojiraje Naik Nimbalkar)

मालोजीराजे नाईक निंबाळकर

नाईक निंबाळकर, मालोजीराजे : (११ सप्टेंबर १८९६ – १४ मे १९७८). महाराष्ट्रातील फलटण संस्थानचे शेवटचे अधिपती. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात ऐतिहासिक जहागिरदार ...
मिठाचा सत्याग्रह (दांडी यात्रा) (Dandi March)

मिठाचा सत्याग्रह

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील म. गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे आणि दीर्घकालीन (१९३०–३४) जनता आंदोलन. ‘दांडी यात्राʼ किंवा ‘दांडी मार्चʼ म्हणूनही हे आंदोलन ...